📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रायव्हसी 

On: September 24, 2024 9:54 AM
आम्हाला फॉलो करा:
प्रायव्हसी 
 मुळात आपल्या इकडे मुल व्हायची किती घाई . दोन वर्ष तरी वेळ द्यावा एकमेकांना  आणि मुलगी 18 /19  वर्षाची असेल तर पाच वर्ष .जुनी खोडं तशीच ओरडू द्यावी .त्यांना नातवंडांचे तोंड बघायची खूप घाई . मुलं व्हायच्या आधीची प्रायव्हसी मुलं झाल्यावर रहात नाही मग काय करावे ?
 माझी बहिण कॉलेजला शिकत असताना तिने मला एक किस्सा सांगितला होता .तिच्या मैत्रिणीचे आईवडील त्यांच्या प्रत्येक मॅरेज ऍनिव्हार्सरीला सकाळी सहा वाजता घरातून निघून जातात आणि थेट रात्री 10 /11 ला घरी येतात . त्यांच्या दोन मुली घरीच असतात आणि आई बाबा कुठे गेले हे त्यांना माहीत नसते .त्या दिवशी त्या बहिणी घर सांभाळतात. ही सवय त्यांना लहापणापासूनच लावली गेली. माझ्या एका नात्यातील मावशीकडे मी लहान असताना गेले होते .शहरात घर लहान आणि घरात माणसं भरपूर. स्वतः ची मुलं ,नणंद आणि जावेची मुलं शिकायला घरी आणि सासू.
 संध्याकाळी सगळे मिळून जेवायचे पण सकाळी दोघे नवराबायको मिळून स्वयंपाक करायचे. सगळ्यांना बसवून जेवू घालायचे आणि नंतर सगळे उठून आपापल्या कामाला लागायचे आणि मग हे दोघे एकत्र गप्पा मारत जेवायचे .
  माझ्या स्वतःच्या घरात मी ,माझा मुलगा , मुलगी आणि नवरा नेहमी येता जाता एकमेकांना मिठ्या मारतो. त्याची आता एवढी सवय झाली की आम्ही वेगळं काही करतो असं आम्हाला वाटत नाही आणि पाहणाऱ्यांना ते सवयीचं झालं .
 एकदा  सर्वेक्षण करायला एक  शिक्षक आमच्याकडे आले होते .“मॅडम मी 3 दिवसांपूर्वी आलो होतो पण तुम्ही दोघं महाबळेश्वर ला गेला होता .” आणि त्यानंतर सासू आणि दोन छोटी मुलं घरी ठेवून तुम्ही दोघच कसं जाऊ शकता म्हणून अर्थ तास डोकं खाल्लं .“सासू अष्टविनायक यात्रेला जाऊन आली ,मुलं पण सहलीला जाऊन आली. आता आम्ही गेलो .त्यात काय?” पण ते काय त्या बिचाऱ्याला पचनी पडले नाही लेकरं घरी ठेवून बाई जावूच कशी शकते ?
 नवरा बायकोने सोबत जेवणे ,घास भरवणे,गप्पा मारत चहा घेणे ,एकमेकांना टाळी देणे ,पाठीवर थाप मारणे ,गालांना स्पर्श करणे,अगदी नजरेने एकमेकांना पहाणे यात पण मजा आहे ,एकमेकांचे डोके ,पाय चेपून देणे हे चोरून लपून नाही नाही मुलांच्या समोर झाले पाहिजे.या क्रिया सहज घडल्या पाहिजे .एकमेकांबद्दल प्रेम आपुलकी व्यक्त करतात हे स्पर्श ते करताना अपराधी भावना मनात बाळगण्याचे काही कारण नाही.
  या उलट मुलं तुम्हाला अगदी एकमेकांच्या जवळ बसलेले पण बघणार नाहीत आणि रात्री अचानक इंटरकोर्स करताना मुलं जागी होतात .तेंव्हा त्यांना काय वाटत असेल ? लहानपणी अचानक पाहिलेली ती गोष्ट त्यांच्या मनावर विचित्र पद्धतीने कोरली जाते . त्यापेक्षा स्पर्शातून सहजता त्यांना ही शिकवा.
 प्रायव्हसी ही डायरेक्ट इंटरकोर्स करताना लागते फोर प्ले किंवा आफ्टर प्ले साठी नसली तरी चालते.  पूर्वी मानव कोठून या सगळ्या गोष्टी शिकत असेल.शिकू द्या मुलांना प्रेमळ स्पर्श ,काळजी घेणं म्हणजे या गोष्टींची त्यांना किळस , अनादर, हिडीस न वाटता आल्हाददायक वाटतील. ज्या गोष्टी पाहिल्या किंवा मिळाल्या नाहीत त्या ओरबाडून घेतो माणूस किंवा बाहेर शोधतो.
 खरे विचित्र काय आहे हे आपण ओळखायला शिकले पाहिजे. बहुतांश स्त्रियांचा अनुभव 25 ते 40 वर्षाची स्त्री गुंतलेली संसारात ,मुलांमध्ये , घरकामात आणि त्याच वेळी त्या वयाचे पुरुष कामात असतातच पण स्वतःला एकटे समजतात ,जास्त वेळ मित्रांसोबत घालवतात ,बायको सोबत प्रायव्हसी नाही म्हणून काही जण व्यवसायात पुर्णतः अडकवून घेतील स्वतःला ,वेश्यागामन करतील ,काही जण बाहेर अफेअर्स करतील ,काहीजण व्यसनी बनतील .पण नवरा बायको मिळून चर्चेतून तोडगा काढणार नाहीत .
काही उपाय 
1.घरात वडीलधारी मंडळी असेल तर मुलांना त्यांच्या जवळ झोपायची सवय लावा .
2.5/6 वर्षानंतर बेडरूम उपलब्ध असेल तर बेडरूम किंवा नसेल तर वेगळा बेड देवून मुलांना स्वतंत्र एकटे झोपायला शिकवा .
3.6 व्या वर्षानंतर घरात मुलांना काही सूचना देवून ,नातेवाईक ,किंवा अन्य काही व्यवस्था करून अधून मधून सुट्टीचा दिवस दोघेच घालवा .
4.मॅरेज अनिव्हार्सरी किंवा काही स्पेशल डे दोघे मिळून साजरे जरा .मुलांची व्यवस्था करा .त्यात कसलाही अपराधी भाव बाळगू नका .
5.नेहमी लक्षात ठेवा आपले आई वडील एकमेकांवर प्रेम करतात ,एकमेकांसोबत आनंदी रहातात हे मुलांना आवडत असतं .नकळत आपण त्यांना ते शिकवत असतो..
6. मी सासू सासऱ्यांची मदत घेणारच नाही आणि त्यांचे टोमणे पण ऐकून घेणार नाही असले दुराभिमान बाळगू नका .माणूस परस्परावलंबी असतो .
7.आपल्याला मिळणाऱ्या अनमोल क्षणासाठी वडील धारी जुन्या विचारांची मंडळी टोमणे मारत असले तरी सहन करा ,दुर्लक्षित करा . दीड दमडीच्या टोमण्यांच्या नादी लागून किंवा इरीटेट होऊन अनमोल क्षण गमावू नका .
8.नातेवाईकांचे लग्न किंवा समारंभ अटेंड करायला जोडीने जा . जाता येता कुठेतरी थांबुन एकमेकांसोबत वेळ घालवा .
9.हनिमून फक्त एकदाच नसतो .सेकंड हनिमून वर आवश्य जा .
10.बायकोला डिनर डेटला न्या किंवा नवऱ्याला डिनर डेटवर नेवून सरप्राईज.
11.अचानक नवऱ्याच्या/बायकोच्या  ऑफिसला भेट देवून कॉफिला न्या .
12.शेती करत असाल तर रात्री पिकांना पाणी द्यायला , दारं धरणे म्हणतो आम्ही त्याला घेवून जा कारभरणीला.
 स्त्री ला शरीर सुखाची ओढ तेंव्हाच वाटेल जेंव्हा फोर प्लेला तुम्ही महत्व द्याल.ती स्वतः तुमच्या सहवासाचे निमित्त शोधेल म्हणून फोर प्ले स्किप करू नका. प्रायव्हसी कशी मिळवायची ,नाविन्य कसे टिकवून ठेवायचे तुमच्या हातात आहे .स्त्री जेंव्हा अशी फोरप्ले मध्ये फुलते ती स्वतः जोडीदाराला सेक्स ची मागणी करते. स्त्रियांनी पण हे अनमोल क्षण घालवून पार 40 ओलांडून 45 वर्षानंतर गळे काढण्यापेक्षा थोडे लवकर भानावर यावे . आयुष्य कसं पारिजातका सारखं जगावं थोडं असलं तरी सुगंधी.
-प्राजक्ता पाटील

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now