प्रश्नांची मातृभाषा:मानवी सौंदर्याची सूर्यपौर्णिमा
"माणसं संभ्रमित झाले तर एकवेळ समजून घेता येईल पण कवीनं संभ्रमित होण्याची कोणतीही सोय कवी या शब्दात नाही. माणसं वीझली तर तेही एकवेळ समजून घेता येईल, पण कवीच विझणं कवि या शब्दालाच मान्य नाही. माणसं बेजबाबदार झाली तर एकवेळ समजून घेता येईल पण कवी या शब्दाच्या अर्थामध्ये कोणत्याही बेजबाबदारपणा बसतच नाही. त्यांन असंत्याच्याविरोधात आणि सत्याच्या बाजूने सतत बोलत राहिले पाहिजे. कवीचं हेच जन्म प्रयोजन आहे." कवी यशवंत मनोहर यांनी कवीच्या जीवनाचे नवोनम्षेशन समजून सांगितले आहे. नेमका कवी कोणत्या दिशेने आपला मार्ग धरतो यावर त्याच्या कवीचे यश अवलंबून असते.
कवी युवराज सोनटक्के यांच्या प्रश्नांची मातृभाषा हा कवितासंग्रह मानवी मनाच्या भावविश्वाच्या तळाचा वेध घेत आहे. अग्नीशाळेच्या प्रगल्भ यशानंतर त्याचा हा दुसरा कवितासंग्रह प्रश्नांच्या उकलतेचे नवे क्रांतीसूत्र आहे. सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक व सांस्कृत...
