उपेक्षित मराठवाडा
भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले. कोणत्याही देशाचं इतिहास पहाता देशाच्या जीवनात हा काळ फार मोठा नाही. पण दिडशे वर्ष गुलामीत जगलेल्या, गुलामी सहन केलेल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे देशाच्या जीवनात सोनेरी क्षणच आहे. स्वातंत्र्याच क्षण हे आनंदाचं क्षण आहे. प्रत्येक भारतीय आज आनंदाने आपल्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत आहे.केंद्र व राज्यस्तरावर विधिव कार्यक्रम घेवून हे वर्ष साजरे करत आहेत . भारत स्वतंत्र झाला. आपण गुलामीतून , गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झालो. संपूर्णजग झोपले होते तेव्हा भारत जागा होता. स्वातंत्र्याचा अनमोल क्षण साजरा करत होता ;पण भारतातील त्याकाळातील काही असंतुष्ट आत्मे भारतात सामिल होण्यास नकार देत होते. त्यांना त्यांचा स्वतंत्र कारभार थाटायचा होता. स्वातंत्र्यापूर्वी भारतात ५६५ संस्थान होते. त्यापैकी ५६२ संस्थान भारतात विलीन झाले ....








