महाकुंभात मृत्यूचा मेळा.!
मौनी अमावस्येनिमित्त गंगातिरी पवित्र शाही स्नान करण्याकरता जमलेल्या भाविकांमध्ये बुधवारी (२८/१/२५) पहाटे चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. यात अनेकजण गंभीर जखमी असून अनेक८-१० भाविकांचा मृत्यू झाल्याचीही भीती वर्तवली जात आहे.याआधीही कुंभमेळ्यात अनेक चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत.प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळाव्यात मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मौनी अमावस्येला स्नान करण्यासाठी अनेक भाविक संगमावर जाण्यासाठी गर्दी करू लागले. त्यावेळी मोठी चेंगराचेंगरी अनेकांचा मृत्यू झाला असून भक्तांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीनंतर भाविकांचा सर्वत्र आक्रोश दिसून आला.महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्...









