Thursday, March 5

Article

इस्लामच्या पाच स्तंभाची माहिती देणारी कलाकृती – इस्लाम परिचय
Article

इस्लामच्या पाच स्तंभाची माहिती देणारी कलाकृती – इस्लाम परिचय

इस्लामच्या पाच स्तंभाची माहिती देणारी कलाकृती – इस्लाम परिचयउद्या सोमवारी जगातील मुस्लिम समाजात साजरा केला जाणारा सण म्हणजे रमजान ईद.  गेल्या एक महिन्यापासून जगभरात रमजान या पवित्र सणाच्या निमित्ताने मुस्लीम बांधवांचे उपवास चालू आहेत. अतिशय खडतर असणाऱ्या या उपवासाची सुरुवात  ज्या दिवशी चंद्राची कोर दिसेल त्यादिवसापासून पहिला दिवस सुरु होतो यालाच चांदरात म्हणतात. रमजानचा चंद्र दिसला की "(रोजे) उपवास ठेवायला मुस्लिम लोक सुरुवात करतात.. या रमजानच्या पवित्र मुहूर्तावर लेखक मौलाना वहीदुद्दीन खान यांनी लिहलेली इस्लाम परिचय नावाची मराठी भाषेतील कलाकृती वाचनात आली. अतिशय अर्थपूर्ण असलेल्या या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील संदर्भ मला खूपच भावले.इस्लाम परिचय या कालाकृतीच्या मुखपृष्ठावर वाळवंटातील निरव शांतता, अंतहीन वाळू आणि वर आकाश,विस्तीर्ण माळरानातून दोन पदरी रस्ता क्षितिजाकडे चढत्य...
फक्त १ रुपयात प्रशिक्षण व निवासी व्यवस्था !
Article

फक्त १ रुपयात प्रशिक्षण व निवासी व्यवस्था !

फक्त १ रुपयात प्रशिक्षण व निवासी व्यवस्था !गुजरातला माझे एक मित्र आहेत .श्री रामजीभाई पटेल हे त्यांचे नाव. ते हिऱ्याचे व्यापारी आहेत. साधारणपणे एक हजार कोटी रुपयांची त्यांची  उलाढाल आहे .ते मला नेहमी म्हणायचे .काठोळे साहेब गुजरातको आओ, पाटीदार भवन देखो .केवल एक रुपये मे बच्चो को आय ए एस का ट्रेनिंग दिया जाता है .मला उत्सुकता होती .त्यामुळे मुंबईतील माजी शालेय शिक्षण मंत्री मा.ना.प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्याकडचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मी थेट अहमदाबादला निघालो. अहमदाबादला उमिया माता संस्थान आहे .येथे देखील आय ए एस चे प्रशिक्षण चालते . अजून तेथे मंदिर तयार व्हायचे आहे .पण IAS सेंटर मात्र तयार झाले, वसतिगृह तयार झाले.या आयएएस ट्रेनिंग सेंटर मधील उमेद वारांना प्रशिक्षण दे ण्यासाठी आयपीएस ऑफिसर नेमले गेले .मंदिर नंतर पण आयएएस सेंटर अगोदर .खरा हा गुजरातचा पॅटर्न मला खूप आवडला. त्या प्रशि...
सायबर गुन्हेगारी व त्यावर उपाय.!
Article

सायबर गुन्हेगारी व त्यावर उपाय.!

सायबर गुन्हेगारी व त्यावर उपाय.!बऱ्याच दिवसांपासून आपल्या मोबाईलवर फोन डायल केल्यावर रिंग टोन वाजते ती ही की " आपल्याला बनावट ई.डी., पोलीस यंत्रणेवरून कॉल्स येत असतील तर त्याला बळी पडू नका. म्हणजे काय तर ह्या चोरटयांनी पोलीस यंत्रणेला सुद्धा सोडले नाही, असो.सायबर गुन्हेगारांनी आपल्या मानसिकतेचा संपूर्ण अभ्यास केला आहे. त्यांना माहित आहे आपले नागरिक हे लवकरच भाऊक होतात, लगेच विश्वास ठेवतात. त्यांना भावनिक ब्लॅकमेल केले की ते लगेच त्यांच्या जाळ्यात अडकतात. आता इथे थोडे आपल्याला लगेच विश्वास ठेऊन चालणार नाही तर आपण लगेच सतर्क झाले पाहिजे.मोफत ह्या अफूच्या गोळीवर आपण नियंत्रण ठेवले पाहिजे. आपल्याला मोफत म्हटले की तोंडाला लगेच पाणी सुटतं आणि ह्या मोफतच्या जाळ्यात आपण लगेच अडकतो आणि आपली सायबर शिकार होते. ह्या जगात मोफत काही मिळत नाही ह्यावर आपण ठाम असले पाहिजे.हे सायबर गुन्हेगार...
एक कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी
Article

एक कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी

एक कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी२५ मार्च हा संभाजी नगरचे जिल्हाधिकारी श्रीरोजी छत्रपती संभाजी नगरचे नवीन जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांचा वाढदिवस . यावर्षीचा वाढदिवसाला विशेष महत्त्व आहे कारण त्यांना लागोपाठ तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत त्यापैकी दोन पुरस्कार हे शासनाचे असून तिसरा पुरस्कार दैनिक लोकसत्तेने दिलेला निवडणूक कामात त कर्तव्यदक्ष राहून केलेल्या तत्पर कारवाई बद्दल श्री दिलीप स्वामी यांना महाराष्ट्र शासनाने गौरविले आहे त्यानंतर बालकांसाठी घेतलेल्या अभिनव उपक्रमाबद्दल परत महाराष्ट्र शासनाने त्यांना गौरविले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये मोलाचे स्थान बजावणाऱ्या दैनिक लोकसत्ताने त्यांना पहिल्या क्रमांकाचे जिल्हाधिकारी म्हणून प्रथम क्रमांकाने त्यांचा नुकताच जाहीर सत्कार घेतला आहे.संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्याप...
विज्ञानाला माणुसकीची झालर गरजेची.!
Article

विज्ञानाला माणुसकीची झालर गरजेची.!

विज्ञानाला माणुसकीची झालर गरजेची.!प्रख्यात शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांच्या अभूतपूर्व शोधाला सन्मानित करण्यासाठी २८ फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. रमण इफेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रख्यात शास्त्रज्ञाच्या शोधाला १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. ज्यामुळे पहिल्यांदाच एखाद्या भारतीय शास्त्रज्ञाला हा प्रतिष्ठित सन्मान मिळाला.विज्ञान म्हणजे ज्ञानाची प्रणाली, सामान्य सत्ये किंवा मूलभूत कायद्याचे ज्ञान. विज्ञान हे एक पद्धतशीर आणि कठोर शिस्त असलेली ज्ञान शाखा आहे. विज्ञान म्हणजे विश्वातील घटना आणि घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ आणि कार्यकारणाधिष्टित असे आकलन. विज्ञान म्हणजे आपल्या शरीरात, मनात, आसमंतात, त्यापलीकडे जे काही घडते ते कसे का घडते? त्याचा अर्थ शोधणे. विज्ञान म्हणजे निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन यांचा वापर करून सत्यश...
मूल्यसंस्कृतीची पेरणी करणारा; अभंग सरीता
Article

मूल्यसंस्कृतीची पेरणी करणारा; अभंग सरीता

मूल्यसंस्कृतीची पेरणी करणारा, दर्जेदार सामाजिक अविष्काराचा अनुभव संग्रह म्हणजे...'अभंग सरीता'यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील तरनोळी सारख्या छोट्या गावातील माझे मित्र अजय चव्हाण. सह्याद्री कवी एकसंघ यांनी माझ्या कविमित्राला "शब्दसखा" पदवीने सन्मानित केलेले आहे.'अजय चव्हाण' यांचा "अभंग सरीता" हा अभंग संग्रह नुकताच वाचण्यात आला. त्यासाठी हा लेखनप्रपंच!एकुण ऐंशी अभंग रचना समाविष्ट असलेल्या संग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून नवलेखक अनुदान प्राप्त झालेले आहे. त्यासाठी माझ्या मित्रांचे प्रथम अभिनंदन नि कौतुक!● हे वाचा - भूक छळते तेव्हा... एक संघर्ष गाथामागिल काही काळात काही साहित्यिक ग्रूप मधून मी अजयचे अभंग सातत्याने वाचत आलो आहे. आशयाच्या अगदी खोलात जाऊन संस्कारांची पेरणी करणे,हे अजयच्या लेखणीचे वैशिष्ट्ये. विविध वृत्तपत्रात मासिकात अजय लिहितो....
मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे : जसे दिसले तसे
Article

मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे : जसे दिसले तसे

मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे : जसे दिसले तसेमहाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस यांचे  अपर मुख्य सचिव असलेले मा. श्री विकास खारगेसाहेब यांचा १७ मार्चला वाढदिवस आहे . श्री विकास खारगेसाहेबांची माझी पहिली भेट ते यवतमाळला जिल्हाधिकारी असताना झाली .आणि तीअजूनही कायम आहे. आमच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या कामाची सुरुवातच बारा मे 2000 रोजी अमरावतीला झाली. या कार्यक्रमाला मा. श्री विकास खारगेसाहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .त्याचबरोबर आयकर आयुक्त श्री अभिनय कुंभार  आय आर एस मनपा आयुक्त श्री धनराज खामतकर आय.ए.एस. हे देखील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.खारगेसाहेब हे आमच्या अमरावती विभागातील यवतमाळला कलेक्टर होते .दोन हजार साली हॉटेल,विश्राम भवन वगैरे या गोष्टी फारशा प्रचलित नव्हत्या. खारगेसाहेबांचे...
पत्रकार, साहित्यिक व आदर्श शिक्षक : गुरुवर्य प्रा. जैमिनी शारदा कडू 
Article

पत्रकार, साहित्यिक व आदर्श शिक्षक : गुरुवर्य प्रा. जैमिनी शारदा कडू 

पत्रकार, साहित्यिक व आदर्श शिक्षक : गुरुवर्य प्रा. जैमिनी शारदा कडू       विसाव्या शतकातील सत्तरच्या दशकापासून अव्याहतपणे पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या निर्भय, घणाघाती व चौफेर शब्दाने आणि वाणीने युवकांच्या मनात आपले वेगळे आगळे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या जैमिनी शारदा कडू उर्फ प्राध्यापक जैमिनी कडू यांचा जन्म व मृत्यू एकाच दिनांकास म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी झाला. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील तुळजापूर गढी (तालुका मोर्शी) या गावचे ते रहिवासी असले तरी जैमिनी कडू यांचा जन्म मात्र छत्तीसगडच्या किर्र जंगलातील एका आदिवासी महिलेच्या झोपडीत रात्री अकरा बाराच्या सुमारास झाला. शिक्षक वडील भाऊसाहेब कडू यांना 1942 च्या एका आंदोलनात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीसांकडून अटक होऊ नयेत म्हणून ते छत्तीसगड (म.प्र)  राज्यातील रायगढ गावाजवळील जंगलात भूमिगत झाले होते. त्यां...
फाल्गुनातील बंजारा होळी उत्सव !
Article

फाल्गुनातील बंजारा होळी उत्सव !

फाल्गुनातील बंजारा होळी उत्सव !चालोरे डायसाणें होळीर...खेला! भारत वर्षात होळी हा सण प्रामुख्याने सर्व जाती-जमातीची लोक साजरा करतात. परंतु बंजारा समाजात होळीचा सण साजरा करण्याची प्रथा फारच  वेगळी असून मनाला अति आनंद देणारी आहे. मुळातच नाच-गाण्यात मदमस्त जीवन जगणारी ही गोरबंजारा जमात होळी सणात आपली पूर्ण हाऊस भागून घेते. गोरबंजारा गणात सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे होळी म्हातारे-कोतारे माणसाला होळी तारुण्य देते. उनाड तरणीबांड पोराना ती चावटपणा देते. मोहाच्या फुलाची (पेलेधारे) फुल दारू पिऊन पक्षपात, वैयक्तिक स्वार्थ, हेवेदावे विसरून होळी खेळावी ती गोरबंजारा  समाजांनीच. फाल्गुन महिना लागला रे लागला की डपाच्या आवाजांनी  होळी हळू हळू तांडया कडे येते. शेतामध्ये राब राब राबून थकून गेलेले लोक  रोज रात्रीला गोलाकार बसल्याजागी बैठे लेंगी गीत गातात.डफ धीरो वजारे तारी जाणीं ढळजा, डफ धीरो......
कविवर्य सुरेश भट : जसे दिसले तसे 
Article

कविवर्य सुरेश भट : जसे दिसले तसे 

कविवर्य सुरेश भट : जसे दिसले तसे मुंबईचे दादर मधील शिवाजी रंगमंदिर. कविवर्य सुरेश भट रंगमंचावर विराजमान झालेले. बाजूला तत्कालीन सुप्रसिद्ध कवी व मंच संचालक प्रा.शंकर वैद्य. कविवर्य सुरेश भट यांना मदत करायला मी देखील त्यांच्या बाजूला रंगमंचावर बसलेला. पहिल्या लाईनमध्ये शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे. आशा भोसले लता मंगेशकर उषा मंगेशकर आणि हृदयनाथ  मंगेशकर बसलेले.श्री शिवाजी रंगमंदिर तुडुंब भरलेले.त्या दिवशीचा तो कार्यक्रम अविस्मरणीय असाच झाला. मराठीतील दिग्गज मंडळी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील व नाट्यसृष्टीतील मान्यवर मंडळी सभागृहामध्ये होते. एकाहून एक सरस कविता गझल सुरेश भट रसिकांसमोर सादर करीत होते. कार्यक्रमाच्या मध्यंतरात श्रीमती आशा भोसले ह्या रंगमंचावर आल्या. त्यांनी भट साहेबांचे अभिनंदन केले. आणि त्या भट साहेबाला म्हणाल्या साहेब तुमचे गायन ऐकून माझा मूड लागलेला आहे...