पत्रकार, साहित्यिक व आदर्श शिक्षक : गुरुवर्य प्रा. जैमिनी शारदा कडू
पत्रकार, साहित्यिक व आदर्श शिक्षक : गुरुवर्य प्रा. जैमिनी शारदा कडू विसाव्या शतकातील सत्तरच्या दशकापासून अव्याहतपणे पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या निर्भय, घणाघाती व चौफेर शब्दाने आणि वाणीने युवकांच्या मनात आपले वेगळे आगळे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या जैमिनी शारदा कडू उर्फ प्राध्यापक जैमिनी कडू यांचा जन्म व मृत्यू एकाच दिनांकास म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी झाला. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील तुळजापूर गढी (तालुका मोर्शी) या गावचे ते रहिवासी असले तरी जैमिनी कडू यांचा जन्म मात्र छत्तीसगडच्या किर्र जंगलातील एका आदिवासी महिलेच्या झोपडीत रात्री अकरा बाराच्या सुमारास झाला. शिक्षक वडील भाऊसाहेब कडू यांना 1942 च्या एका आंदोलनात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीसांकडून अटक होऊ नयेत म्हणून ते छत्तीसगड (म.प्र) राज्यातील रायगढ गावाजवळील जंगलात भूमिगत झाले होते. त्यां...









