कविवर्य सुरेश भट : जसे दिसले तसे
कविवर्य सुरेश भट : जसे दिसले तसे मुंबईचे दादर मधील शिवाजी रंगमंदिर. कविवर्य सुरेश भट रंगमंचावर विराजमान झालेले. बाजूला तत्कालीन सुप्रसिद्ध कवी व मंच संचालक प्रा.शंकर वैद्य. कविवर्य सुरेश भट यांना मदत करायला मी देखील त्यांच्या बाजूला रंगमंचावर बसलेला. पहिल्या लाईनमध्ये शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे. आशा भोसले लता मंगेशकर उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर बसलेले.श्री शिवाजी रंगमंदिर तुडुंब भरलेले.त्या दिवशीचा तो कार्यक्रम अविस्मरणीय असाच झाला. मराठीतील दिग्गज मंडळी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील व नाट्यसृष्टीतील मान्यवर मंडळी सभागृहामध्ये होते. एकाहून एक सरस कविता गझल सुरेश भट रसिकांसमोर सादर करीत होते. कार्यक्रमाच्या मध्यंतरात श्रीमती आशा भोसले ह्या रंगमंचावर आल्या. त्यांनी भट साहेबांचे अभिनंदन केले. आणि त्या भट साहेबाला म्हणाल्या साहेब तुमचे गायन ऐकून माझा मूड लागलेला आहे...









