
काल मुंबईमध्ये एक चांगला कार्यक्रम संपन्न झाला. उपेक्षित बालकांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालकल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरे तसेच महिला बालकल्याण राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर व बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती सुशीबेन शहा यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगली उपस्थिती होती. या पुरस्काराचे जे मानकरी ठरलेले आहेत त्यामध्ये संभाजीनगरचे कर्तव्यदक्ष क्रियाशील व उपक्रमशील जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांचा समावेश आहे. माननीय मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत श्री दिलीप स्वामी साहेब यांना बालस्नेही पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने गौरविले आहे. यापूर्वी देखील विधानसभा निवडणुकीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना गौरविले आहे.
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी माननीय श्री दिलीप स्वामी हे आपल्या स्वभावामुळे कार्यशीलतेमुळे कर्तव्यदक्षतेमुळे सतत चर्चेत राहिलेले आहेत. वेळोवेळी महाराष्ट्र शासनाने त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे पुरस्कार देऊन गौरविले आहे. त्यामुळे त्यांचा काम करण्याचा उत्साह अजून वाढला आहे.
खरं म्हणजे लहान मुलांसाठी काम करणं थोडे अवघड काम असते .त्यातही उपेक्षित बालकामगार विट भट्टीवर काम करणारे बालक .कुपोषण. आरोग्य. बालमृत्यू असे कितीतरी विषय अतिशय कुशलतेने हाताळून दिलीप स्वामी साहेबांनी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बालकांच्या संदर्भात जी जनजागृती केलेली आहे ती खरोखरच नोंदणीयाआहे व त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आहे.
● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र
या कामी दिलीप स्वामी साहेबांनी जो पुढाकार घेतला आणि बालकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यासाठी उपाययोजना केल्या ते महत्त्वाचे आहे. आज महाराष्ट्रात सर्वत्र शिक्षणाचे सार्वत्रिकरण जरी झालेले आहे तरी बरीचशी मुले ही शाळाबाह्य आहेत. संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी साहेबांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करून या मुलांसाठी काय करता येईल याचे नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे वीट भट्टीवर बरेच बालमजूर काम करतात .तसेच ऊस तोडी कामगार व त्यांचे मुलं हे देखील त्यांच्या नजरेसमोर होते. या दोघांनाही नजरेसमोर ठेवून वीट भट्टी बालक कामगार व ऊस तोडणी बालक कामगार त्यांच्यासाठी त्यांनी योजना आखल्या व त्या अमलात आणण्यासाठी नियोजन केले.
खरं म्हणजे आता बालमृत्यूचे प्रमाण खूप कमी झाले आहे. अगोदरचा काळ असा होता की त्या काळात फारशा सुविधा नव्हत्या .अध्ययवत दवाखाने नव्हते. पण आता संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये संभाजीनगर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात बऱ्याचशा सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. बालमृत्यूचे प्रमाण कमीत कमी व्हावे. गरोदर स्त्रियांना शासकीय योजनांची माहिती मिळावी. त्यांचे योग्य संगोपन व्हावे आणि बालमृत्यू टाळावेत यासाठी साहेबांनी संबंधित यंत्रणेला कामाला लावले. त्यामुळे संभाजीनगर व संभाजीनगर जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण हे बऱ्याच प्रमाणात कमी झाले .
आज आपण पाहतो जे लोक दारिद्र्यरेषेखाली काम करतात किंवा वीस भट्टी वीट भट्टी ऊस तोडणी मजूर म्हणून काम करतात. त्यांच्या मुलांचे पालन पोषण नीट होत नाही. त्यामुळे ही मुले कुपोषित राहतात. या मुलांसाठी त्यांचे पालकत्व घेऊन काही करता येईल काय ? आणि तो विचार अमलात आणता येईल का ? त्यासाठी साहेबांनी मनापासून प्रयत्न केले. अशा मुलांचे पालकत्व देण्याचाही त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला.
ग्रामीण व अशिक्षित लोकांमध्ये आरोग्याविषयी जे जनजागृती असायला पाहिजे ती अध्यापही पुरेशी प्रमाणात झाली नाही. लोकांचे लक्ष या गोष्टीकडे लागावे त्याप्रमाणे त्यांनी आरोग्याचा सातबारा हा एक उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत मुलांचे आरोग्य व त्याचा तपशील संकलित करण्यात आला. एक आरोग्याचा सातबारा समोर आल्यानंतर त्याला भविष्यामध्ये आरोग्य विषयक काही अडचणी आल्या तर त्या आरोग्याच्या सातबारा वरून त्या पटकन लक्षात येतात. त्याच्या पूर्वीचे आजार लक्षात घेऊन त्याच्यावर उपचार केले जातात .हा आरोग्याचा सातबारा मला असं वाटते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतात राबवण्याची गरज आहे. शेतीचा सातबारा असला म्हणजे त्या शेतीची पूर्ण जंत्री आपल्या लक्षात येते .तसा आरोग्याचा सातबारा हा उपाय म्हणजे खरोखरच एक आगळीवेगळी देण आहे.
● हे वाचा – नागपूरच्या कर्तव्यदक्ष विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी
बहुतांश पालक मुलांना शाळेत टाकले म्हणजे आपले काम संपले. त्यांना शिकवणे त्यांना वळण लावणे त्यांच्यवर संस्कार करणे हे शिक्षकांचे काम आहे मला काय त्याचे .ही भूमिका घेतात. पण दिलीप स्वामी साहेबांनी माझे मुल माझी जबाबदारी हा उपक्रम राबवून पालकांमध्ये त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आणि शिक्षकांएवढीच किंवा त्यापेक्षा जास्त जबाबदारी ही पालकांची आहे त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाकडे विशेष लक्ष दिले पाहिजेत यासाठी त्यांनी जनजागृती केली आणि ती यशस्वी करून दाखवली.
जिल्हा परिषदची शाळा असो की अनुदानित शाळा असो की अनुदानित शाळा असो यामध्ये गुणवत्ता सर्वांगीण विकास झाला पाहिजे .खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे काम केल्या गेले पाहिजे. अध्यापकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांचे वेळोवेळी प्रशिक्षण आयोजित केले पाहिजे. यासाठी साहेबांनी एक दशसूत्री कार्यक्रम तयार केला आणि आपल्या यंत्रणेमार्फत तो राबवण्यासाठी पुढाकार घेतला. खरं म्हणजे जिल्हाधिकारी यांच्यासमोर भरपूर कामे असतात. परंतु त्यांनी बालकांचे जे प्रश्न आहेत मग ते आरोग्य विषयक असो की शिक्षण विषयक असो त्या प्रश्नांना प्राधान्य देऊन संभाजीनगर जिल्ह्यात एक अमुलाग्र बदल घडून आणला. शासनाने देखील त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाची लगेच दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे.
एक उपक्रमशील सनदी अधिकारी म्हणून श्री दिलीप स्वामी यांचा संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक आहे . राजपत्रित अधिकारी असताना देखील त्यांनी केलेले काम दखलपात्र ठरले आहे .तसेच त्यांच्या त्या कार्यावर वेळोवेळी प्रसार माध्यमांनी दखल घेऊन त्यांच्या कार्याला चांगली प्रसिद्धी दिली आहे. यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये पुसद येथे उपजिल्हाधिकारी असताना साहेबांनी या शेतकऱ्यांसाठी जे उपक्रम राबवले त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या .त्यांच्या या उपक्रमावर एक पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
सोलापूरला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी असताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या परिषदेच्या शाळांमध्ये अमुलाग्र बदल करून दाखविला. त्या बदलाची दखल तत्कालीन महाराष्ट्र शासनाने घेतली आणि त्यांनी केलेला बदल हा संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषदेमध्ये राबविण्यात यावा असा संदेश उपमुख्यमंत्री नामदार श्री अजित पवार यांनी श्री दिलीप स्वामी साहेब यांचा सन्मान करताना दिला.
दिलीप स्वामी साहेब यांच्या सुरुवातीचा काळ हा अमरावती विभागात गेला. अमरावतीला ते उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी नगरपालिका उपायुक्त अशा विविध पदावर दीर्घकाळ होते. अमरावती जिल्ह्यात देखील त्यांनी इतके चांगले काम केले आहे की आजही अमरावतीकर त्यांची आठवण काढतात. ज्या गावात ज्या जिल्ह्यात ते जातात ते आपल्या कर्तुत्वाने त्या जिल्ह्यावर आपली छाप पाडून जातात. अमरावती असो बुलढाणा असो पुसद असो सोलापुर असो की संभाजीनगर असो प्रत्येक ठिकाणी साहेबांनी आपल्या अनन्यसाधारण कार्यामुळे यशाचे शिखर गाठले आहे. वेळोवेळी महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केलेला आहे आणि काल महाराष्ट्र शासनाने त्यांना बालस्नेही पुरस्कार देऊन गौरविले आहे ही तुमच्या आमच्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी ही आनंदाची व नोंदणीय बाब आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.!
– प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे, संचालक
मिशन आय ए एस.
जिजाऊ नगर महापौरांच्या बंगल्यासमोर. विद्यापीठ रोड अमरावती कॅम्प. 9890967003