Monday, March 2

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
तळेगावची धग…
Article

तळेगावची धग…

तळेगावची धग...मी पंचाहत्तर साली नागपुरात असताना एका वाचनालयात उद्धव ज. शेळकेंची ' धग ' कादंबरी माझ्या हातात पडली. खरं तर पाच वर्षांपासून मी ह्या पुस्तकाच्या शोधत होतो. पण सापडत नव्हते. त्याला कारणही तसेच होते. काय झाले की एकदा आई वडिलांचे खूप भांडण झाले. अधूनमधून ते व्हायचेच. असे भांडण झाले की वडील रागे भरत. मग त्यांचे जेवण बंद, म्हणजे उपोषण. अशी उपोषणं आणि सत्याग्रह घराघरातून सुरू असतातच. नवराबायकोचे भांडण झाले की दोघांपैकी एक रुसतो आणि दुसरा समजावत राहतो.वडील उपोषणाला बसले की त्यांना समजावण्याची जबाबदारी माझ्याकडे असे. खूप प्रयत्नानंतर ते उपोषण सोडायला राजी होत. आधी आईची खूप निंदा करत , मी हो ला हो लावत ऐकून घेई. मत प्रदर्शन मात्र करत नसे. कारण आईची बाजू घेतली तर त्यांचा राग अजूनच वाढण्याची भीती. आईच्या निंदेत सहभागी झालो तरीही पंचाईत. कारण आई स्वयंपाक खोलीच्या दाराआड बसून सारे ...
बदाम-काजूवर जगणारा ८ कोटींचा विधायक!
News

बदाम-काजूवर जगणारा ८ कोटींचा विधायक!

बदाम-काजूवर जगणारा ८ कोटींचा विधायक!मुंबई: उत्तर प्रदेश मेरठच्या किसान मेळ्यात चर्चेचा विषय बनला तो ना मंत्री, ना अभिनेता, तर ‘विधायक’ नावाचा मुर्रा जातीचा रेडा! या रेड्याची किंमत ऐकून उपस्थित शेतकरी आणि पशुपालक थक्क झाले ८ कोटी रुपये!हरियाणाचे पद्मश्री पुरस्कार विजेते शेतकरी नरेंद्र सिंह यांचा हा रेडा आपल्या आकर्षक शरीरयष्टीमुळे आणि दमदार लुकमुळे सगळ्यांचे लक्ष वेधतो. त्याला पाहण्यासाठी लोक दूरदूरहून मेळ्यात आले आणि मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा स्पर्धा सुरू झाली.विधायकची खासियत नरेंद्र सिंह सांगतात, “आमचा विधायक रोज बदाम, काजू, देशी तूप, सरसोंचे तेल खातो आणि ८ ते १० लीटर दूध पितो.” याच आहारामुळे तो मेळ्यात सलग दोन वर्षे ओव्हरऑल चॅम्पियन ठरला आहे.मालक नरेंद्र सिंह यांनी सांगितले की, ‘विधायक’ला विकायचा नाही, पण त्याच्या वीर्य विक्रीतून (Semen Sale) ते दरवर्षी लाखोंची कमाई करत...
कुस्तीचा रंग की कुर्त्याविना संग? प्रशिक्षकाच्या ‘नग्न’ कारनाम्याने महाराष्ट्र दंग!
News

कुस्तीचा रंग की कुर्त्याविना संग? प्रशिक्षकाच्या ‘नग्न’ कारनाम्याने महाराष्ट्र दंग!

नग्नकुस्तीचा रंग की कुर्त्याविना संग? प्रशिक्षकाच्या ‘नग्न’ कारनाम्याने महाराष्ट्र दंग!अकोला : जिल्ह्यातील आंतरशालेय कुस्ती स्पर्धेत घडलेला एक विकृत प्रकार सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडत आहे. कुस्तीच्या रिंगणात घाम गाळायचा, पण इथे तर संस्कारच गाळले गेले! चौदा वर्षांच्या अल्पवयीन कुस्तीपटूचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या प्रशिक्षकाच्या कारनाम्याने पालक, शिक्षक आणि क्रीडाप्रेमी थक्क झाले आहेत.अकोला पोलिस हॉलमध्ये जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्यावतीने ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी आंतरशालेय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नेहमीप्रमाणे कुस्तीपटूंचं वजन घेण्याची प्रक्रिया सुरू होती. तेव्हा उपस्थित असलेल्या प्रशिक्षक कुणाल माधवे यांनी चौदा वर्षांच्या विद्यार्थ्याला विवस्त्र अवस्थेत उभं करून त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपला. एवढ्...
‘वचपा’ कादंबरीचा प्रवास: नांदेड ते मुंबई; राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंतची साहित्ययात्रा
Article

‘वचपा’ कादंबरीचा प्रवास: नांदेड ते मुंबई; राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंतची साहित्ययात्रा

'वचपा' कादंबरीचा प्रवास: नांदेड ते मुंबई; राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंतची साहित्ययात्रा दोन तीन तारखेला मुंबई ठाणेहून सारखं फोन येत होतं. निनावी आसल्यामुळे मी फोन उचललो नाही.शेवटी विवेकनं फोन घेतला.समोरून एक बाई बोलत होत्या.बोलताना त्राससिक आवाजत बोलत होत्या.''दोन दिवसापासून फोन लावत आहे तुम्ही फोन घेत नाही.तुमच्या वचपा कादंबरीला पुरस्कार जाहीर झालेलं आहे.तुम्ही हजर राहणार का ?विवेक माझ्याकडे पहात हसत उत्तर दिलं , " हो ताई मी निश्चित येणार आहे." एका दिवस अगोदर जाण्याचं ठरलं.नातेवाईक मित्रमंडळी यांना भेटता येईल या अपेक्षेने मी दिनांक ४.१० .२०२५ सकाळी लवकर उठलो.घरात कारभारनीचा गजर झाला," मुंबईला जायचं आठ वाजलेत."आणि माझं मन एका वेगळ्याच उत्साहात रमलं.आजचा दिवस माझ्यासाठी साधा नव्हता.माझ्या “वचपा” कादंबरीसाठी मला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार स्विकारण्यासाठी (मुंबई ) ठाणे गाठायचं होतं.माझ्या...
शेतकऱ्यांची शेती गेली वाहून, सरकार गेलं झोपून ! बँका मात्र उठल्या आहे तगादा लावून !
News

शेतकऱ्यांची शेती गेली वाहून, सरकार गेलं झोपून ! बँका मात्र उठल्या आहे तगादा लावून !

शेतकऱ्यांची शेती गेली वाहून, सरकार गेलं झोपून ! बँका मात्र उठल्या तगादा आहे सुरू!औरंगाबाद : मराठवाड्याच्या मातीने पुन्हा एकदा रक्त गाळलं आहे… पण सरकारकडे अजूनही झोपेचे डोळे आहेत. घरदार, शेती, संसार सगळं वाहून गेलं; पण ‘मदत’ मात्र अद्याप कागदावरच. अतिवृष्टीने हजारो शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला, पण बँकांचे नोटीस पाठवणारे फोन अजूनही थांबलेले नाहीत.“घरदार गेलं, शिवार गेलं… पण बँका आमच्या जिवाला लागल्या!” हा मराठवाड्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा आक्रोश आहे. शिवार हेल्पलाईनवर आलेले ५४४६ फोन सांगतात की, ही केवळ आपत्ती नाही, तर ‘मानसिक दुष्काळ’ आहे. सरकारचे आश्वासन ओघळलेल्या पावसासारखे आणि बँकांचा तगादा वीज कोसळावी तसे सुरू आहे.अजूनही १७०० शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. हातात काहीच नाही, अंगावर कपडे तेवढे शिल्लक. “साहेब, थोडा आधार द्या, नाहीतर आम्ही नकोच जगायला…” या विनवणीतही ...
समाज माध्यमावरील सीरियल्सच्या भावनिक आक्रमणामुळे नवतरुण पिढीच्या मन-मेंदूत सुखी जीवनाची संभ्रमणावस्था!
Article

समाज माध्यमावरील सीरियल्सच्या भावनिक आक्रमणामुळे नवतरुण पिढीच्या मन-मेंदूत सुखी जीवनाची संभ्रमणावस्था!

समाज माध्यमावरील सीरियल्सच्या भावनिक आक्रमणामुळे नवतरुण पिढीच्या मन-मेंदूत सुखी जीवनाची संभ्रमणावस्था!समाज माध्यमे, टीव्हीवर जी काही अनैतिक, असामाजिक तत्त्वांची अकारण पेरणीची माथापच्ची सुरू आहे, याचे सामाजिक परिणाम आता वास्तविक जीवनामध्ये ढवळाढवळ करून तरुणाईच्या मनाची संभ्रमणावस्था वाढविण्यासाठी अधिक पोषक ठरत आहेत; नव्हे, ही पिढी नैराश्याच्या गर्तेमध्येच अधिक वावरताना दिसत आहे.आधीच मोबाईल फोनमुळे इथल्या तरुणांनी घरातील किंवा कुटुंबातील एकमेकांचा संवाद तोडून, आपल्या 'मुठीत' आलेल्या जगाशी 'मुकसंवाद' सुरू केलेला आहे. जवळच्या व्यक्तीशी ते बोलत नाहीत, तर अनोळखी व्यक्तीसोबत ते वारंवार न थकता रात्रंदिवस निष्फळ चर्चा करत असतात आणि आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ आपल्यासमोर जे वाढून ठेवलेले 'रील' असेल, ते पाहण्यात अकारण गमावत आहेत.टीव्ही वाहिन्यांवर दाखवण्यात येणाऱ्या सिरीयल, ज्यातून अधिकाध...
लष्करात नेमणूक, गावात मिरवणूक; नियुक्तीपत्र निघालं बनावट, गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरलं सावट!
News

लष्करात नेमणूक, गावात मिरवणूक; नियुक्तीपत्र निघालं बनावट, गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरलं सावट!

लष्करात नेमणूक, गावात मिरवणूक; नियुक्तीपत्र निघालं बनावट, गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरलं सावट!लखनऊ : देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या एनसीसी कॅडेटच्या जीवनात अभिमानाचा क्षण काही तासच टिकला. लष्करात निवड झाल्याच्या आनंदात गावानं ढोल-ताशांसह मिरवणूक काढली, पण काही दिवसांतच त्या नियुक्तीपत्राचं खरं रूप समोर आलं आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू सावटात बदललं.महाराजगंज जिल्ह्यातील डोमा गावातील नगमा ही बारावीतील विद्यार्थिनी आणि एनसीसी कॅडेट. देशसेवेत जाण्याचं तिचं स्वप्न होतं. एनसीसी प्रशिक्षणादरम्यान भेटलेल्या धीरज नावाच्या तरुणानं तिला लष्करात नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. “तुझं काम चांगलं आहे, मी तुला लष्करात भरती करून देईन,” असं सांगत त्यानं तिचा विश्वास संपादन केला.सप्टेंबर महिन्यात नगमाला गोरखपूरला बोलावण्यात आलं. तिथे तिला लष्करी गणवेश देण्यात आला, धावण्याची आणि वैद्यकीय चाचणी...
करवा चौथ का साजरा केला जातो? त्यामागील कथा काय आहे?
Article

करवा चौथ का साजरा केला जातो? त्यामागील कथा काय आहे?

करवा चौथ का साजरा केला जातो? त्यामागील कथा काय आहे?करवा चौथचा शब्दशः अर्थ 'पत्नीने तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी ठेवलेला उपवास' असा होतो. हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे ज्यामध्ये महिला सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास पाळतात आणि त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. या सणाचे महत्त्व पौराणिक कथांवर आधारित आहे, विशेषतः करवा माता आणि द्रौपदीच्या कथांवर, ज्या एका समर्पित पत्नीच्या शक्ती आणि श्रद्धेचे चित्रण करतात.करवा चौथ हा सर्व विवाहित महिलांसाठी एक महत्त्वाचा सण आहे. पत्नी आपल्या पतीच्या सुरक्षेसाठी उपवास ठेवतात. दिवसभर पाणी न पिता आणि काहीही न खाता उपवास करणे सोपे नसते, परंतु प्रेमळ पत्नी आपल्या पतींबद्दल खूप प्रेम आणि आदराने हे सर्व विधी करतात.करवा चौथचा अर्थ स्त्रीच्या पतीप्रती असलेल्या प्रेम, निष्ठा, भक्ती आणि पवित...
प्रिय वसुंधरा…! निसर्गाच्या वेदनेतून उमटलेले अंत:करणस्पर्शी पत्र
Article

प्रिय वसुंधरा…! निसर्गाच्या वेदनेतून उमटलेले अंत:करणस्पर्शी पत्र

प्रिय वसुंधरा…! निसर्गाच्या वेदनेतून उमटलेले अंत:करणस्पर्शी पत्रप्रिय वसुंधरा…!तुझे पत्र मिळाले.वाचून मी खरेच अंतर्मुख झालो.तुझ्यावर आणि तुझ्या लेकरांवर, माझ्याकडून कळत..नकळत झालेल्या अन्यायाबद्दल मी तुझी माफी मागतो…पण का गं प्रिये…मी हा जो उच्छाद मांडला म्हणतेस त्याला फक्त मी एकटाच जबाबदार आहे का..?तुझं नि माझं नातं तर अगदीच प्राचीन…विश्वाची उत्पत्ती झाल्यापासून आपण एकमेकांचे सहचर…एकमेकांना जिवापाड जपणारे…तुझ्या अस्तित्वाला चैतन्य देण्याचं काम हजारो..लाखो वर्षे करत आलो आहे.!पण मी का क्रोधित आहे…माहीत आहे…? अगं ज्यांना तू आपली प्रिय लेकरं मानते,त्या तुझ्या दिवट्यांनी विकासाच्या नावाखाली जो हैदोस घातला आहे ना तो मला उघड्या डोळ्यांनी बघवत नाही.पहिल्यांदा त्यांनी कधी शेतीच्या, कधी वस्तीच्या तर कधी औद्योगिकीकरणाच्या नावाखाली तुझे हिरवेगार वस्त्र काढून तुला कुरूप करण्याचा प्रयत्न सु...
कोजागिरी.!
Poem

कोजागिरी.!

कोजागिरीकोजागिरीच्या दुधानंअशी शक्ती द्यावीआम्ही धष्टपुष्ट व्हावेआमची बेरोजगारी जावीनोकरी नाही मिळाली तरीआम्ही कमजोर नसावेकोणतेही कामधंदेआम्ही स्वखुशीनं करावेदारिद्र्यातील बापालाहीअर्थ प्राप्त व्हावाआईचं धूरपाटनजरेसमोर चालता व्हावायावे सुखमय दिवसअनंत काळासाठीशेतकरीही आमचा दाताराहावा कधी न उपाशीआमची बहिण अंचलासुरक्षीत व्हावीकोणी कलीने केव्हाहीकधी अब्रू न लुटावीचंद्राची चांदणीहीसुखमय व्हावीहुंड्यासाठी चांदणीकधी न जळावीते दिवस परतीचेआधार व्हावा मुलांचावृद्धाश्रमात पित्यांचाकधी अंत न व्हावाऐसेच दिन यावेरामराज्य दिसावेअनाथ अपंगांचेकधी स्वप्न न तुटावेअंकुश शिंगाडेनागपूर ९३७३४५९४५०हे वाचा-गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप...