📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

अमरावती आदिवासी विभागातील 500 कोटींच्या योजना रखडल्या? विधानसभेत सुलभाताई खोडकेंची चौकशीची मागणी

On: July 2, 2026 7:17 PM
आम्हाला फॉलो करा:
अमरावती आदिवासी विकास विभागातील 500 कोटींच्या टेंडर प्रकरणावर विधानसभेत सुलभाताई खोडके यांनी चौकशीची मागणी केली.

एटीसी पदावरील वारंवार बदल्यांमुळे विकासकामांवर परिणाम; नव्या अधिकाऱ्याने 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याची मंत्र्यांची घोषणा

मुंबई | 2 जुलै : अमरावती आदिवासी विकास अपर आयुक्त कार्यालयातील सुमारे 500 कोटी रुपयांच्या विविध योजनांची निविदा प्रक्रिया रखडल्याचा मुद्दा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजला. आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी या प्रकरणात अनियमितता झाल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.

सभागृहात बोलताना त्यांनी सांगितले की, अमरावती आदिवासी विकास अपर आयुक्त कार्यालयातील अतिरिक्त आदिवासी आयुक्त (ATC) हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत या पदावरील अधिकाऱ्यांनी शासनाने निश्चित केलेला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. वारंवार बदल्या झाल्यामुळे अमरावती आणि नागपूर विभागातील 12 जिल्ह्यांतील आदिवासी योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम झाल्याचा आरोप त्यांनी केला.

खोडके यांनी पुढे सांगितले की, या कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सुमारे 500 कोटी रुपयांच्या योजनांची निविदा प्रक्रिया थांबली असून, अनेक कामांमध्ये विलंब होत आहे. तसेच आश्रमशाळांमधील भोजन व्यवस्था आणि इतर योजनांवर योग्य नियंत्रण नसल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असून, भरती प्रक्रिया पूर्ण होऊनही अनेकांना अद्याप नियुक्ती आदेश मिळाले नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

या प्रश्नावर उत्तर देताना राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले की, अमरावती येथे नव्याने नियुक्त करण्यात आलेले एटीसी संदीप गोलाईत शासनाने निश्चित केलेला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मंत्र्यांनी स्पष्ट केले की, 500 कोटी रुपयांच्या बजेटमधील विविध आदिवासी विकास योजना प्रकल्प अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार भोजन योजना किंवा इतर शैक्षणिक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता आढळलेली नाही. मात्र सर्व योजनांवर प्रभावी नियंत्रण राहावे यासाठी एटीसी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

या चर्चेमुळे अमरावती आदिवासी विकास विभागातील प्रशासन, रखडलेल्या निविदा प्रक्रिया आणि आदिवासी विकास योजनांबाबत पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

मीरा रोडवरील ठाकूर मॉलजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, हिट अँड रन अपघात

मीरा रोडवर भीषण हिट अँड रन; कारने तरुणाला फरफटत नेले, जागीच मृत्यू, आरोपी फरार

मुंबईच्या महापौर ऋतु तावडे विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना पत्रकार परिषदेत बोलताना

मी रील स्टार की रिअल स्टार? मुंबईकरच निर्णय घेतील; महापौर ऋतु तावडे यांचा विरोधकांना जोरदार टोला

रुग्णालयात आजारी चिमुकल्याला भेटताना अरिजित सिंग | Arijit Singh meets sick child in hospital

जीवन-मरणाच्या संघर्षातील चिमुकल्यासाठी अरिजित सिंग धावले; माणुसकीने जिंकली लाखोंची मनं

नाशिकच्या कळवण येथील आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी प्रकरणाबाबत प्रतीकात्मक छायाचित्र

नाशिक हादरलं! आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला दिला जन्म; नात्यातील अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

अमरावती येथे १८-१९ जुलै २०२६ रोजी आयोजित चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अधिकृत पोस्टर

अमरावतीत १८-१९ जुलैला चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन; साहित्य, गझल, कवी संमेलन आणि परिसंवादाची मेजवानी

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावतानाचे प्रतीकात्मक छायाचित्र

विधानसभेत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र, आता राज काय उत्तर देणार?