📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

नारगांवडी MSEB कार्यालयावर ग्रामस्थांचा संताप; ’24 तासात 12 तास वीज बंद, तरीही हजारोंचे बिल.!’

On: July 2, 2026 6:36 PM
आम्हाला फॉलो करा:
कामणापूर घुसळी, काशी खेड आणि वाढोणा गावातील ग्रामस्थांचा नारगांवडी MSEB कार्यालयावर संताप व्यक्त करताना

निखील देशमुख गौरव प्रकाशन न्यूज

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील कामणापूर घुसळी, काशी खेड आणि वाढोणा या तिन्ही गावांतील नागरिकांनी आज दि. 02 जुलै 2026 रोजी नारगांवडी येथील एमएसईबी कार्यालयावर मोठ्या संख्येने धडक देत तीव्र संताप व्यक्त केला. ग्रामीण भागात सतत रात्रभर वीजपुरवठा खंडित राहणे, लाईन वारंवार ये-जा करणे आणि दिवसातील तब्बल 12 तास वीज बंद असतानाही ग्राहकांना 4 ते 5 हजार रुपयांची वीजबिले येत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा लेखी निवेदने देऊनही अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. आज नागरिक समस्या मांडण्यासाठी कार्यालयात पोहोचले असता एकही अधिकारी उपस्थित नव्हता. अधिकाऱ्यांना फोन केल्यावर त्यांनी “रजेवर आहोत” असे कारण सांगितल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला.

तिन्ही गावांतील नागरिकांनी आरोप केला की, संबंधित अधिकारी मुख्यालयात मुक्कामी राहत नाहीत. सर्व अधिकारी अमरावती येथून ये-जा करतात. त्यामुळे स्थानिक समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून, विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

याशिवाय, गावातील अनेक विद्युत दिपे (स्ट्रीट लाईट) नादुरुस्त अवस्थेत असून ग्रामीण भाग अंधारात आहे. नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधून स्पष्ट इशारा दिला की, “यापुढे वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर एमएसईबी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्यात येईल.”

सध्या या तिन्ही गावांतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन वीज समस्या मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

मीरा रोडवरील ठाकूर मॉलजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, हिट अँड रन अपघात

मीरा रोडवर भीषण हिट अँड रन; कारने तरुणाला फरफटत नेले, जागीच मृत्यू, आरोपी फरार

मुंबईच्या महापौर ऋतु तावडे विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना पत्रकार परिषदेत बोलताना

मी रील स्टार की रिअल स्टार? मुंबईकरच निर्णय घेतील; महापौर ऋतु तावडे यांचा विरोधकांना जोरदार टोला

रुग्णालयात आजारी चिमुकल्याला भेटताना अरिजित सिंग | Arijit Singh meets sick child in hospital

जीवन-मरणाच्या संघर्षातील चिमुकल्यासाठी अरिजित सिंग धावले; माणुसकीने जिंकली लाखोंची मनं

नाशिकच्या कळवण येथील आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी प्रकरणाबाबत प्रतीकात्मक छायाचित्र

नाशिक हादरलं! आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला दिला जन्म; नात्यातील अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

अमरावती येथे १८-१९ जुलै २०२६ रोजी आयोजित चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अधिकृत पोस्टर

अमरावतीत १८-१९ जुलैला चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन; साहित्य, गझल, कवी संमेलन आणि परिसंवादाची मेजवानी

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावतानाचे प्रतीकात्मक छायाचित्र

विधानसभेत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र, आता राज काय उत्तर देणार?