📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात प्रा. दादासाहेब कोते यांची ‘फुलपाखरू’ कविता; सलग चार इयत्तांच्या पुस्तकांत स्थान मिळविण्याचा दुर्मिळ मान

On: June 27, 2026 11:31 PM
आम्हाला फॉलो करा:

गौरव प्रकाशन शिर्डी | प्रतिनिधी

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दादासाहेब कोते यांच्या साहित्यिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या अमराठी माध्यमाच्या “दोस्ती करूया मराठीशी” या इयत्ता चौथीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या “फुलपाखरू” या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.

प्रा. दादासाहेब कोते यांनी लोणी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली आहे. तसेच त्यांनी भाषा विभाग प्रमुख म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे.

त्यांचे साहित्यिक योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या “चंद्रगाणी” आणि “फुला मुलांच्या कविता” हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. याशिवाय “मॉडर्न मराठी पोएट्री” खंड सहामध्ये त्यांच्या एका कवितेचा इंग्रजी अनुवाद समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच “शतकाची बालकविता” आणि “निवडक किशोर” या संपादित काव्यग्रंथांमध्येही त्यांच्या कवितांना स्थान मिळाले आहे.

यापूर्वी नव्या शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकात “भोपळा”, इयत्ता दुसरीच्या सुलभ भारतीमध्ये “फुलपाखरू” आणि इयत्ता तिसरीच्या सुलभ भारतीमध्ये “झोका” या कवितांचा समावेश करण्यात आला होता.

विशेष म्हणजे, इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी अशा सलग चार इयत्तांच्या मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये कविता समाविष्ट होण्याचा मान मिळविणारे प्रा. दादासाहेब कोते हे दुर्मिळ उदाहरण ठरले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय साहित्यिक यशाबद्दल साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!