📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात प्रा. दादासाहेब कोते यांची ‘फुलपाखरू’ कविता; सलग चार इयत्तांच्या पुस्तकांत स्थान मिळविण्याचा दुर्मिळ मान

On: June 24, 2026 10:45 AM
आम्हाला फॉलो करा:
प्रा. दादासाहेब कोते यांची फुलपाखरू कविता इयत्ता चौथीच्या दोस्ती करूया मराठीशी पाठ्यपुस्तकात समाविष्ट

गौरव प्रकाशन शिर्डी | प्रतिनिधी

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दादासाहेब कोते यांच्या साहित्यिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या अमराठी माध्यमाच्या  “दोस्ती करूया मराठीशी” या इयत्ता चौथीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या “फुलपाखरू” या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.

प्रा. दादासाहेब कोते यांनी लोणी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली आहे. तसेच त्यांनी भाषा विभाग प्रमुख म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे.

त्यांचे साहित्यिक योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या “चंद्रगाणी” आणि “फुला मुलांच्या कविता” हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. याशिवाय “मॉडर्न मराठी पोएट्री” खंड सहामध्ये त्यांच्या एका कवितेचा इंग्रजी अनुवाद समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच “शतकाची बालकविता” आणि “निवडक किशोर” या संपादित काव्यग्रंथांमध्येही त्यांच्या कवितांना स्थान मिळाले आहे.

यापूर्वी नव्या शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकात “भोपळा”, इयत्ता दुसरीच्या सुलभ भारतीमध्ये “फुलपाखरू” आणि इयत्ता तिसरीच्या सुलभ भारतीमध्ये “झोका” या कवितांचा समावेश करण्यात आला होता.

विशेष म्हणजे, इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी अशा सलग चार इयत्तांच्या मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये कविता समाविष्ट होण्याचा मान मिळविणारे प्रा. दादासाहेब कोते हे दुर्मिळ उदाहरण ठरले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय साहित्यिक यशाबद्दल साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

गौरव प्रकाशन न्यूजच्या प्रतिनिधी सभेत दारव्हा तालुका प्रतिनिधी खुबराम चव्हाण आणि दारव्हा शहर प्रतिनिधी शशिकांत रोडगे यांची नियुक्ती करताना पदाधिकारी.

गौरव प्रकाशन न्यूजच्या प्रतिनिधी सभेत मोठ्या नियुक्त्या; खुबराम चव्हाण, शशिकांत रोडगे यांची निवड

कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत माहिती देताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी 2026

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्त्वाची माहिती

दारव्हा येथे विदर्भ मंडल यात्रेचे स्वागत करताना काँग्रेस पदाधिकारी व ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोराम

दारव्ह्यात विदर्भ मंडल यात्रेचे जल्लोषात स्वागत; ओबीसी जातीनिहाय जनगणनेच्या मागणीला काँग्रेसचा ठाम पाठिंबा

LPG सिलेंडरवर नवीन कर लागू होणार का? सरकारच्या प्रस्तावामुळे किंमत वाढण्याची शक्यता

LPG सिलेंडर महागणार? सरकार नव्या शुल्काच्या तयारीत असल्याची चर्चा; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

ग्रामीण वातावरणात आनंदाने नृत्य करणारे जोडपे – सोशल मीडियावर व्हायरल झालेला डान्स व्हिडिओ

ग्रामीण जोडप्याच्या साध्या डान्सने जिंकली लाखो मनं; सोशल मीडियावर व्हिडिओची जोरदार चर्चा

छत्रपती संभाजीनगर येथे CJP बैठकीपूर्वी अभिजीत दिपके माध्यमांशी संवाद साधताना

CJP ची आज निर्णायक बैठक; अभिजीत दिपके म्हणाले – ‘राजकारणात जाण्याची इच्छा नाही, पण…’