📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2026 जाहीर 

On: May 23, 2026 11:56 AM
आम्हाला फॉलो करा:
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार 2026 विजेत्यांची यादी
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार 2026 विजेत्यांची यादी
IMG 20260513 125316
Oplus_131072

येवला प्रतिनिधी : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती पाचव्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे निकाल दि. ०१ मे २०२६ रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून निकाल जाहीर झाले असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ यांनी कळविले आहे.

पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या स्मृतीदिनानिमित्त पाचव्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातून कविता संग्रह- १०३, कथा संग्रह-४१, कादंबरी -२२ आणि ललित लेखसंग्रह- २० अशा एकूण १८६ साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी प्राप्त झाल्या होत्या. या कलाकृतीतून प्रत्येक साहित्य प्रकारातील कलाकृतीला खालीलप्रमाणे पुरस्कार जाहीर झालेले आहेत.

कवितासंग्रहासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार : नांदगाव जि नाशिक येथील कवयित्री प्रतिभा सुरेश खैरनार यांच्या “वंशावळीच्या प्राचीन सरीतून” तर उत्तेजनार्थ पुरस्कार धुळ्याचे कवी अरविंदा भामरे यांच्या शापित कोलाहलाच्या नोंदी या कलाकृतीसाठी कथासंग्रहासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार राहुरी जि अहिल्यानगर येथील लेखक सयाजी शिंदे यांच्या “चरैवेति, तर उत्तेजनार्थ सोलापूर येथील लेखिका संध्या धर्माधिकारी यांच्या बेरं या कलाकृतीसाठी कादंबरीसाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कडेगाव जि. सांगली येथील लेखक राजेश चौरे यांच्या “जिद्द पेरतांना” तर उत्तेजनार्थ पारनेर जि अहिल्यानगर येथील अशोक पवार यांच्या …आणि रामा कलेक्टर झाला या कलाकृतीसाठी ललित लेखसंग्रहासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार फलटण जि सातारा येथील लेखक मा डॉ अशोक शिंदे यांच्या गाव पांढरीच्या वैभवखुणा तर उत्तेजनार्थ अमरावती येथील अरुणा सबाने यांच्या उमेद जगण्याची या कलाकृतीसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.

वरील प्रमाणे पुरस्कार जाहीर झाले असून या सर्व कलाकृती पुरस्कार निवडीसाठी परिक्षक अनुक्रमे कवितासंग्रहासाठी प्रा. अमोल चिने, कोपरगाव (अहिल्यानगर), कथासंग्रहासाठी डॉ प्रकाश कारभारी शेवाळे (नाशिक), कादंबरीसाठी मा. प्रा. डॉ. आर.जे. इंगोले, चांदवड (नाशिक) तर ललित लेखसंग्रहासाठी मा राम गायकवाड, कोपरगाव (अहिल्यानगर) यांनी परीक्षण केले. परिक्षकांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून प्रतिष्ठानने पुरस्कारार्थीचे अभिनंदन केले आहे.


पुरस्कार प्राप्त सर्व कलाकृतींचा सन्मान दि. ४ जून २०२६ रोजी पिंपळगाव जलाल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात होणार असल्याचे अध्यक्ष संजय वाघ यांनी कळविले आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!