कधी काळी पारनेर ची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणारा कणा म्हणजे चिठ्ठीवाला.!
“चिठ्ठी वाला हा शब्द पारनेर, जुन्नर ,आंबेगाव ह्या भागात कुणाला माहीत नाही, अस होणार नाही. कधी काळी मुंबईनगरी मध्ये घाटावरच्या ह्या लेकरांना मिल कामगार, बेस्ट” आणि त्या खालोखाल खाजगी रोजगार जर कुणी दिला असेल आणि त्याच जगणं सुसाह्य केलं असेल तर ह्याच चिठ्ठीवाल्या “लाईन ने. आता हा चिठ्ठीवाला म्हणजे तरी नेमकं काय ? “सीमा शुल्क एजंट “अर्थात( cha) ह्या फर्म च्या मालकांनी. आपल्या ऑफिस मध्ये कामा साठी ठेवलेला कर्मचारी मग तो गोदी मध्ये प्रत्यक्ष काम करणारा असू देत अथवा शिपिंग कंपनी मध्ये जाऊन डिलिव्हरी ओर्डर काढणारा असू देत.पारनेर बद्दल जर बोलायचं झालं तर भौगोलिक परिस्थिती पहाता दुष्काळी भाग . शिवाय काही दशकापूर्वी रोजगाराची साधन काहीच नसल्या मूळे ,जे तरुण कमी शिक्षित अथवा ज्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत नसतं ती सर्व मंडळी, मुंबईत गेलं की कुठ तरी ह्या लाईनमध्ये हमखास कुणीतरी चिकटत असत.
पूर्वी शिक्षणाची काही खास अट नव्हती. त्या मुळे अनेक जणांनी ह्या क्षेत्रात आपलं नशीब आजमावल पैसा तर खूप कमावला त्याच बरोबर आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहर ही उमटवली.त्यामुळे आपल्याला आपल्या पारनेरची वेगळी छाप ह्या ठिकाणी ह्या क्षेत्रात ,आपल्याला हमखास पहायला मिळते. ह्या व्यवसायाशी अथवा क्षेत्राशी निगडित असणारा व्यवसाय म्हणजे ट्रान्सपोर्ट व्यवसाय . सीमा शुल्क एजंट( cha, ) अर्थात चिठ्ठीवाला ह्या विभागात काम करणारे आपले पारनेरकर जास्त असल्या मुळे त्याचा फायदा देखील “मुंबई स्थित असणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असणाऱ्या पारनेरकर जनतेसाठी खूप फायदेशीर ठरला”, असून इथे ही वेगळी छाप पारनेरकर मंडळींनी निर्माण केली आहे.
जस जेएनपीटी बंदर निर्माण झालं.त्याच बरोबर मुबंई मधील बंदरातून काम ही कमी कमी होत गेलं.त्या मुळे सहाजिकच काळा चौकी ,घाटकोपर, चेंबूर , गोवंडी , मानखुर्द ह्या ठिकाणी राहणारा हा पारनेर कर “चिठ्ठीवाला” ही हळू हळू” नव्या मुबंई मधील उपनरात स्थिरावला मग ते नेरुळ , सानपाडा ,असो अथवा नव्याने विकसित झालेल्या कामोठे ,खारघर , उलवा”, असो . ह्या ठिकाणी तो स्थिरावला गेला. इथून जे .एन. पी. टी. बंदर जवळ असल्या मुळे नवी मुंबई त्याच्या दृष्टीने सोयीस्कर ठिकाण झाले. जिथुन गावी जाण ही सोपं झालं. मुंबईत असणारी छाप नव्या मुंबईत निर्माण करण्यातही तो यशस्वी झाला ,अस म्हंटल तर वावग ठरणार नाही.
कधी काळी “सुवर्णयुग ” अनुभवलेला हा चिठ्ठीवाला मात्र सरकारच्या बदलत असलेल्या धोरणानुसार व असंघटित कामगार असल्या मुळे, आज मात्र भयानक वळणावर उभा आहे. ह्या कामाचा ठराविक वेळ नसल्या मूळे, अवेळी जेवण पुरेशी न झालेली झोप ,व्यसन ह्या सर्वांचा त्याच्या तब्येतीवर विपरीत परिणाम झाला असल्याचं समोर येत आहे. “त्याच बरोबर पूर्वी मिळणारी भरमसाठ वर कमाई ” त्यामूळे ह्या क्षेत्रात आज ही पगार जास्त नाही. उलट आता वरकमाई चे मिळणारे पैसे ही बंद झाले आहेत. शिवाय डी. पी. डी. धोरण ही त्याच्या मुळावर आलं असून अनेक ठिकाणी विभागल गेलेलं काम आज एक दोन ठिकाणी(cfs )मालक फिरवत आहे. त्यामुळे आज त्याच्या डोक्यावर नोकरी जाते का राहते ही टांगती तलवार आहे.
“पारनेर” जुन्नर ,आंबेगाव मधील अनेक गाव ह्या चिठ्ठी वाल्या मूळे विकसित झाली आहेत. अनेक गावातील आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही त्याची मोलाची मदत झाली असून कधी काळी ह्या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणारा हा कणा आज मात्र पूर्णपणे वाकून गेला आहे. त्याला त्याची व उद्याच्या त्याच्या पुढच्या पिढीची चिंता सतावत असताना अचानक पणे किती तरी जणांनी ह्या तणावामूळे ह्रदयविकार व इतर आजार ह्या मूळे जगाचा निरोप घेतला आहे.
काही जरी असले तरी ही ज्या वेळी भूतकाळात आपण डोकावतो त्या वेळी हा चिठ्ठीवाला आणि त्याच पारनेर च्या ग्रामीण अर्थव्यस्थे मध्ये असणार योगदान दुर्लक्षित करून अजिबात चालणार नाही. पारणेरच्या विकासात त्या काळी महत्वाची भूमिका बजावणारा घटक म्हणून इतिहास नक्कीच ह्या चिठ्ठीवाल्याची नोंद घेईल.
अशोक पवार
8369117148
गटेवाडी पारनेर नगर.