📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

जोतीराव फुले यांना काव्यमय अभिवादन | क्रांती, शिक्षण आणि समानतेचा संदेश | जयंती विशेष कविता

On: April 11, 2026 7:24 PM
आम्हाला फॉलो करा:
Mahatma Jyotiba Phule portrait social reformer education pioneer Marathi
महात्मा जोतीराव फुले जयंती कविता | स्त्री शिक्षण आणि सामाजिक समतेचा संदेश

जोतीराव ,
तुम्ही झुगारलेत गुलामगीरीचे बंध
तोडलेत जातिभेदांचे साखळदंड
आणि घातलात पाया स्त्रीशिक्षणाचा रूढी, परंपरांना तोडून

तुम्ही वंचितांचे, उपेक्षितांचे, शोषितांचे , अस्पृश्यांचे क्रांतिबा आणि क्रांतिमा होऊन ओढलात आसूड तत्कालीन व्यवस्थेवर

तुमच्या बंडानेच आज स्त्री घेतेय सर्वच क्षेत्रांत गगनचुंबी भरारी
तुमचा वारसा चालवित बाबासाहेबांनीही त्याला कायद्याने बळकटी दिली

आज तुमची दूरदृष्टी दिसते सर्वांगीण विकासातून
म्हणून होतोय तुमचा जयजयकार सर्वच स्तरांतून

मात्र आम्ही कृतघ्न होऊ नयेत कधिही
तुमच्या परिवर्तनाशी -एवढंच वाटतय !

अरुण विघ्ने

(जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन )

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now