Friday, November 7

पंढरी.!

“पंढरपूरच्या चंद्रभागेच्या काठी उभा विठोबा आणि कार्तिक एकादशीला आलेले भक्त”

आलो पंढरीसी।विठूच्या गावाशी।

चंद्रभागेपाशी।स्थिरावलो।।

पुंडरिका भेटी।परब्रह्म आले।

अठ्ठावीस झाले।युगे धरा।।

वाळवंटी दिसे।वैष्णवांची दाटी।

एकमेका भेटी।प्रेमभावे।।

तीर्थांचे माहेर।विठूची पंढरी।

आमुची वैखरी।विठू नामें।।

सर्व भक्तांसाठी‌।सम आचरण।

समदृष्टी जाण‌। विठोबाची।।

भाव जैसा जैसा।तैसा पावे हरि।

कृपा सर्वावरी।करीतसे।।

आबासाहेब कडू

-आबासाहेब कडू

कार्तिक एकादशी

(२-११-२०२५)

सर्वांना कार्तिक एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.