Saturday, May 9

Tag: #STBus #MaharashtraST #STNews #Darwha #BusStation #CleanlinessTax #STPassenger #MaharashtraNews #BreakingNews #STFacility #मराठीबातम्या #एसटी #दारव्हा #प्रवासी #बसस्थानक

स्वच्छतेच्या नावाखाली एसटी प्रवाशांवर आर्थिक भार; सुविधा मात्र अद्याप अपुऱ्याच.!
News

स्वच्छतेच्या नावाखाली एसटी प्रवाशांवर आर्थिक भार; सुविधा मात्र अद्याप अपुऱ्याच.!

स्वच्छतेच्या नावाखाली एसटी प्रवाशांवर आर्थिक भार; सुविधा मात्र अद्याप अपुऱ्याचगणेशराव देशकरीदारव्हा तालुका | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) नुकतीच प्रत्येक तिकीटामागे दोन रुपयांची वाढ करून “स्वच्छता कर” आकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या अतिरिक्त वसुलीनंतरही बसस्थानकांवरील स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय व्यवस्था आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही ठोस सुधारणा झालेली नसल्याची नाराजी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.दररोज राज्यभरातून लाखो प्रवासी एसटीने प्रवास करतात. ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून प्रत्येकी चार रुपये अतिरिक्त आकारले जात असून, या माध्यमातून महामंडळाला दरमहा कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अनेक बसस्थानकांवर अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि अपुरी स्वच्छतागृहे यामुळे प्रवाशांना मोठा त...