📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

विधानसभेत कौतुकाची थाप… अन् काही तासांतच तुकाराम मुंढेंची मोठ्या जबाबदारीतून मुक्तता.!

On: June 24, 2026 12:07 PM
आम्हाला फॉलो करा:
तुकाराम मुंढे यांना परभणी जिल्ह्याच्या पालक सचिव पदावरून मुक्त केल्याची बातमी दर्शविणारे छायाचित्र

मुंबई : राज्याच्या विधानसभा अधिवेशनात अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईची जोरदार चर्चा रंगली असतानाच शासनाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भेसळमुक्त महाराष्ट्रासाठी कठोर मोहीम राबवणारे तुकाराम मुंढे यांना परभणी जिल्ह्याच्या पालक सचिव पदाच्या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.

एफडीए आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मुंढे यांनी राज्यभरातील दूध, खवा, खाद्यपदार्थ आणि औषधांमधील भेसळीविरोधात मोठी मोहीम सुरू केली. अनेक ठिकाणी अचानक धाडी टाकून कारवाई करण्यात आली. त्यामुळे भेसळमाफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या कार्यशैलीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दरम्यान, राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार परभणी जिल्ह्याच्या पालक सचिव पदावर आता ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे ही अतिरिक्त जबाबदारी फेब्रुवारी २०२६ पासून होती.

प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार, पालक सचिव पद प्रामुख्याने मंत्रालयातील कार्यरत सचिवांकडे दिले जाते. सध्या मुंढे हे मंत्रालयातील सचिव नसून एफडीए आयुक्त म्हणून कार्यरत असल्याने तांत्रिक कारणास्तव त्यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, विधानसभा सभागृहात त्यांच्या कामाचे कौतुक झाल्यानंतर काही तासांतच हा निर्णय आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. काहींच्या मते हा केवळ प्रशासकीय बदल असून, एफडीएमधील वाढत्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन त्यांना पूर्णवेळ काम करण्याची संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला गेला असावा.

तुकाराम मुंढे यांच्या नावाभोवती कायमच चर्चेचे वलय राहिले आहे. त्यामुळे या नव्या निर्णयानंतरही राज्यभरात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून आगामी काळात एफडीएमधील त्यांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!