📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती पर्वावर ग्रंथप्रकाशन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

On: December 9, 2025 9:49 AM
आम्हाला फॉलो करा:
“ऐतिहासिक पुस्तक प्रकाशन!” “संताजी जयंती उत्सव 2025” “अमरावतीत भव्य सोहळा!”
“ऐतिहासिक पुस्तक प्रकाशन!” “संताजी जयंती उत्सव 2025” “अमरावतीत भव्य सोहळा!”

अमरावती : संत परंपरेचा अमोल वारसा जपणाऱ्या श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती पर्वानिमित्त “श्री संताजी जगनाडे महाराज : संतत्व व कवित्व” या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आज (८ डिसेंबर २०२५) संताजी भवन, उषा कॉलनी, MIDC रोड येथे अत्यंत उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. वसंत शंकरराव जामोदे (माजी उपकुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ) यांच्या शुभहस्ते झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून श्री शंकरराव हिंगासपुरे, श्री रंगराव भागवत, श्री रामेश्वर गोदे आणि श्री अण्णासाहेब नालसे यांची मान्यवर उपस्थिती लाभली.

प्रा. विजय जयसिंगपुरे यांनी संताजी महाराजांच्या जीवनकार्याचा सखोल मागोवा घेतलेले हे पुस्तक संताजी सेना बहुउद्देशीय संस्था, अमरावतीच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री अरुणभाऊ गासे यांनी केले, तर पुस्तकाची मनोज्ञ ओळख श्री मा. बा. राऊत यांनी करून दिली.

व्यासपीठावरील मान्यवरांनी संताजी महाराजांच्या सामाजिक कार्य, कीर्तन परंपरा, भक्तीभाव आणि लोकजागरणातील योगदानाची विशेष आठवण करून देत पुस्तकप्रकाशनाचे महत्व अधोरेखित केले. डॉ. जामोदे यांनी संताजी महाराजांच्या जीवनपटावर प्रकाश टाकताना “आध्यात्मिकतेसोबतच सामाजिक परिवर्तनाचे भलेमोठे धडे संताजींच्या कार्यातून मिळतात” असे सांगत ग्रंथलेखनाबद्दल लेखकाचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाला विविध भागातून आलेल्या समाजबांधवांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. प्रमोद गोधनकर, जयंंत मुळे, आशिष खोडके, अमित जामोदे, रमेश बोके, शितल राऊत, सौ. मीना गासे यांसह संताजी सेना बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने परिश्रम घेतले.

उपस्थित मान्यवरांचे आभार मानून, अल्पोहार-चहापाण्याने कार्यक्रमाचा सौहार्दपूर्ण समारोप करण्यात आला. संतत्व, साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाचा संगम असलेल्या या ग्रंथप्रकाशन सोहळ्याने अमरावतीत एक आगळा ठसा उमटवला.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!