📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

आई-वडील..!

On: October 5, 2025 7:57 PM
आम्हाला फॉलो करा:
आई-वडील..!
मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले. वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला…अगं… छान लापशी बनव,तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत… शालांत परिक्षेत..!
आई किचनमधुन पळत पळत येत म्हणाली,”बघुया मला दाखवा.”
 इतक्यात,मुलगा पटकन बोलला ,”बाबा तिला कुठे Result दाखवताय?तिला काय लिहता वाचता येते का.? अशिक्षित आहे ती…!”
भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली.
ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली.मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले,”हो रे…! ते पण खरच आहे.”
तु पोटात असताना तिला दुध बिल्कुल आवडत नसताना तु सुदृढ व्हावास म्हणून नऊ महीने ती रोज दुध पित होती
अशिक्षित होती ना…
तुला सकाळी सात वाजता शाळेत जावं लागायचं म्हणजे स्वतः सकाळी पाच वाजता उठुन तुझ्या आवडीचा नाष्ता आणि डबा बनवायची.
अशिक्षित होती ना…
तु रात्री अभ्यास करता करता झोपून जायचा तेव्हा येऊन ती तुझी वह्या पुस्तक बरोबर भरुन तुझ्या अंगावर पांघरुन नंतरच झोपायची…
अशिक्षित होती ना…
तू लहानपणी बहुतेकवेळा आजारी असायचास,तेव्हा रात्र-रात्र जागुन ती परत सकाळी तिची कामं चोख करायची.
अशिक्षित होती ना…
तुला Branded कपडे घेउन द्या म्हणून माझ्या मागे लागायची आणि स्वतः मात्र एकाच साडीवर वर्षे चालवायची.
अशिक्षित होती ना….
बाळा….
चांगली शिकलेली लोकं पहिला स्वतःला स्वार्थ आणि मतलब बघतात,पण तुझ्या आईने आजवर कधीच तो बघितला नाही.
अशिक्षित आहे ना ती…
ती जेवण बनवुन आपल्याला वाढता वाढता कधी कधी स्वतः जेवायच विसरुन जायची,म्हणून  मी अभिमानाने सांगतो की ‘तुझी आई अशिक्षित आहे.’
हे सगळं ऐकुन मुलगा रङत रडत आईला बिलगुन बोलतो,”आई मी तर फक्त पेपरवर ९०% मार्क मिळवलेत.पण माझ्या आयुष्याला १००% बनवणारी तु पहिली शिक्षक आहेस,आणि ज्या शिक्षकांची मुलं ९०% मार्क मिळवतात त्या शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा मी कधी विचार केलाच नाही.
आई आज मला ९०% मार्क्स मिळवुन पण मी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडे PHD च्या पण वरची Degree  आहे.
कारण मी आज माझ्या आईच्या रुपात डॉक्टर,शिक्षक,वकिल,माझे कपडे शिवणारी Dress Designer, Best Cook ह्या सगळ्यांच दर्शन घेतल.
बोध:… 
* प्रत्येक मुलां- मुलींनी,जे आईवडिलांचा अपमान करतात,शुल्लक कारणावरुन रागवतात.त्यांनी विचार करावा.त्यांच्यासाठी काय काय सोसलय.
*लेखक-अज्ञात

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment