📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

मोबाईल तपासल्याचा राग अनावर! पत्नीने ओढणीने गळा आवळून पतीचा केला खून; दिल्लीतील धक्कादायक घटना

On: July 3, 2026 11:10 AM
आम्हाला फॉलो करा:
मोबाईल तपासल्याच्या वादातून पत्नीने पतीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जगतपुरी परिसरात कौटुंबिक वादाचे भीषण रूप समोर आले आहे. मोबाईल तपासण्यावरून झालेल्या वादातून एका २० वर्षीय पत्नीने आपल्या पतीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगतपुरीतील रशीद मार्केट परिसरात राहणारे मुस्तकीम उर्फ साहिल आणि त्याची पत्नी अलीशा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वाद होत होते. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने घरात सतत तणावाचे वातावरण होते.

बुधवारी मध्यरात्री मुस्तकीमने पत्नीचा मोबाईल तपासला. कॉल रेकॉर्ड आणि इतर माहिती पाहिल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

चौकशीदरम्यान अलीशाने पोलिसांना सांगितले की, पतीने तिला मारहाण केली होती. त्यानंतर संतापाच्या भरात तिने पतीला खाली पाडले, त्याच्या छातीवर बसून ओढणीने गळा आवळला. काही वेळातच मुस्तकीम बेशुद्ध पडला.

आरडाओरडा ऐकून मुस्तकीमची आई खोलीत आली. मुलाची गंभीर अवस्था पाहताच तिने मदतीसाठी हाक मारली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

घटनेनंतर आरोपी अलीशा घटनास्थळावरून फरार झाली होती. पोलिसांनी विशेष पथक तयार करून शोधमोहीम सुरू केली. अखेर गुरुद्वाराजवळ लपून बसलेल्या अलीशाला अटक करण्यात आली. सध्या तिची चौकशी सुरू असून जगतपुरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!