📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

धामणगावात विद्यार्थ्यांसाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन यशस्वी; नगरपरिषदेला झुकावे लागले, बसेस पुन्हा सुरू

On: July 3, 2026 12:51 PM
आम्हाला फॉलो करा:
धामणगाव छत्रपती शिवाजी महाराज चौकात विद्यार्थ्यांसाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

निखील देशमुख धामणगाव रेल्वे प्रतिनिधी :

धामणगाव शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणींविरोधात धामणगाव तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी तसेच विद्यार्थी व पालकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलेले ठिय्या आंदोलन अखेर यशस्वी ठरले. आंदोलनाच्या दबावामुळे नगरपरिषदेला अखेर आगार व्यवस्थापकाला पत्र देऊन बसेस पूर्ववत सुरू करण्यास भाग पाडले गेले.

माहितीनुसार, धामणगाव शहरात येणाऱ्या बसेस रस्त्याच्या कामाचे कारण देत नगरपरिषदेकडून मंगरूळ फाट्यावरून वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मंगरूळ फाट्यापासून शास्त्री चौकापर्यंत सुमारे तीन किलोमीटर पायी प्रवास करावा लागत होता. यामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, नगरपरिषदेकडील अनियमित कारभार आणि कमिशनखोरीमुळे 2024 पासून सुरू असलेले रस्त्याचे काम 2026 पर्यंतही पूर्ण झाले नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, विद्यार्थी आणि पालकांनी नगरपरिषदेला निवेदन देत छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले. “जोपर्यंत बसेस सुरू होत नाहीत आणि आगार व्यवस्थापकाला पत्र दिले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.

सुमारे दोन ते अडीच तास आंदोलन सुरू राहिले. सुरुवातीला प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मात्र पत्रकार, शहरातील नागरिक आणि वाढता दबाव यामुळे अखेर नगरपरिषदेला आगार व्यवस्थापकाला बसेस सुरू करण्यासाठी पत्र द्यावे लागले.

या आंदोलनात ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज वानखडे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंदू डहाणे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष शिंदे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष मयूर डुबे, निवृत्ती वैद्य, शुभम भोंगे, गोपाल मांडूळकर, पवन खुरपडे, राजेश कांबे, सुधीर शेळके, अशोकराव गोफने, गणेश खैर, नितेश खंडारे, अमोल भेंडे, सुभाष सावंत, विशाल डुबे, सागर धांदे, रमेश ठाकरे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी केळी, चॉकलेट, बिस्कीट आणि पाण्याची व्यवस्था केली होती. याबद्दल सर्व आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

अमरावती येथे १८-१९ जुलै २०२६ रोजी आयोजित चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अधिकृत पोस्टर

अमरावतीत १८-१९ जुलैला चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन; साहित्य, गझल, कवी संमेलन आणि परिसंवादाची मेजवानी

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावतानाचे प्रतीकात्मक छायाचित्र

विधानसभेत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र, आता राज काय उत्तर देणार?

भाजपच्या नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्र सरकारवर वाढलेला राजकीय दबाव दर्शवणारे प्रतीकात्मक छायाचित्र

भाजपच्या वाचाळवीरांमुळे सरकार अडचणीत? वारंवारच्या वादांवर राजकीय चर्चांना उधाण

परीक्षा गैरव्यवहाराविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषण करताना सोनम वांगचुक

सोनम वांगचुकांचे आमरण उपोषण तीव्र; परीक्षा गैरव्यवहाराविरोधात आंदोलनाला देशभरातून पाठिंबा

अहमदनगर जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील गटात अंतर्गत नाराजीच्या चर्चांवर आधारित राजकीय बातमी

जिल्हा बँक निवडणुकीआधी विखे गटात नाराजीच्या चर्चा? राजकीय वर्तुळात रंगल्या नव्या समीकरणांच्या चर्चा

मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचे राजकारण तापले; शिंदे गटाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

मराठी अस्मितेच्या मुद्द्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले; शिंदे गटाला नवी राजकीय संधी?