📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

मी बालमजूर बोलतोय

On: June 12, 2025 1:54 PM
आम्हाला फॉलो करा:
मी बालमजूर बोलतोय

मी बालमजूर बोलतोय

 बालपण आमचं हरवलंय घरकामात, शेतीत, गुरं वळण्यात!

हॉटेलात, भीक मागण्यात, चिखल मळण्यात!!

 आमचे चिमुकले हात राबतात—

 पेपर वाटपात, कोळसा खाणीत,

 बूट पॉलिशसाठी!

 तुमच्या महागड्या गाड्या पुसण्यासाठी!

 भंगार कचरा वेचण्यासाठी!!

कामाला जुंपलं जातं घाण्याच्या बैलागत!

व्यक्तिमत्व आमचं गोठलं ध्रुवीय बर्फागत!!

पण—–

व्यथा आमच्या जीवाच्या

कुणा कळणार कशा?*आगपेटी कारखान्यात जळतो आम्ही!

काच बनविताना तडकतो आम्ही !!

तयार करता करता फटाके! आयुष्याची झाली स्फोटके!!

वीट भट्टीवर बालपण करपलं!

भंगार वेचतच आयुष्याचं भंगार झालं!!

आम्ही घडवितो शाळेच्या पाट्या

पण अक्षर नाही कळत!

पुरते पशु बनलोय ढोरा मागे पळत!!

कुस्करल्या जातात कोवळ्या कळ्या

धुनी भांडी करताना!

अपंगत्व लादलं जातं भिक्षेसाठी फिरताना!!

हिऱ्यांना पैलू पाडणारे आम्ही

आमच्या पैलूच काय?

ढोर मेहनत आमची दुसरेच खाती साय!

अन्यायग्रस्त जगणं आमचं

कधी मिळेल न्याय?

– प्रा. रमेश वरघट

करजगाव जि. यवतमाळ

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now