कारंजा बार असोसिएशनची कार्यकारीणी गठीत

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : वकिलांच्या हितांना प्रोत्साहन देण्यासाठी,व्यावसायिक मानके आणि नीतिमत्ता नियंत्रित करणे, वकील नियमांचे पालन करतात आणि व्यावसायिकपणे वागतात याची खात्री करणे, कायदेशीर व्यवस्था सुधारणांचे समर्थन करणे व सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन सामाजिक कार्यात सहभागी होऊन सामाजिक दायित्व पार पाडण्याच्या हेतूने बार असोसिएशनची निर्मिती झाली आहे.


त्याच धर्तीवर कार्य करण्याच्या हेतूने कारंजा (लाड) न्यायपालिका कार्यक्षेत्राकरीता कारंजा बार असोसिएशनच्या कार्यकारिणीचे नूतनीकरण करण्यात येऊन नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.

● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे  कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य


नवीन गठीत झालेल्या कारंजा बार असोसिएशनच्या कार्यकारणीत अध्यक्षपदी ॲड.अविनाश वैद्य साहेब, उपाध्यक्षपदी ॲड. नितल रामटेके मॅडम,सचिवपदी ॲड. राहुल मनवर साहेब,कोषाध्यक्षपदी ॲड. धम्मानंद देवळे साहेब यांची सर्वानुमते निवड करून नियुक्ती करण्यात आली.

कारंजा न्यायपालिकेच्या क्षेत्रातील सर्व वकील मंडळींनी कार्यकारिणीच्या सन्माननीय सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कारंजा बार असोसिएशनची कार्यकारणी गठीत झाल्याचे वृत्त ॲड. सुभान खेतीवाले यांनी देऊन नविन कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या.

आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

बंडूकुमार धवणे

संपादक गौरव प्रकाशन

Leave a comment