Cold Beer Side Effects : उन्हाळ्यात किंवा प्रचंड उकाड्यात अनेकजण तहान भागवण्यासाठी थंड बियर पिणे पसंत करतात. थंड बियर शरीराला गारवा देईल आणि उष्णतेपासून आराम मिळेल, असा अनेकांचा समज असतो. मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते हा समज चुकीचा असून थंड बियरमुळे शरीरावर उलट गंभीर परिणाम होऊ शकतात.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, बियरमध्ये असलेले अल्कोहोल मूत्राचे प्रमाण वाढवते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. उन्हामुळे आधीच घामाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असताना बियरचे सेवन केल्यास डिहायड्रेशन (निर्जलीकरण) होण्याचा धोका अधिक वाढतो.
तज्ज्ञ डॉ. समीर भाटी यांच्या म्हणण्यानुसार, अनेकांना थंड बियर पिल्याने शरीर थंड राहते असे वाटते. प्रत्यक्षात मात्र अल्कोहोलमुळे शरीरातून अधिक पाणी बाहेर पडते. त्यामुळे तहान कमी होण्याऐवजी शरीरातील पाण्याची कमतरता वाढते.
याशिवाय, अल्कोहोलमुळे मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येतो. शरीरात पाणी टिकवून ठेवणाऱ्या व्हॅसोप्रेसिन या हार्मोनच्या कार्यावरही त्याचा परिणाम होतो. परिणामी शरीरातील द्रव संतुलन बिघडू शकते.
डिहायड्रेशनची लक्षणे कोणती?
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास काही सामान्य लक्षणे दिसू शकतात.
- वारंवार तहान लागणे
- तोंड कोरडे पडणे
- गडद रंगाची लघवी होणे
- लघवीचे प्रमाण कमी होणे
- चक्कर येणे
- थकवा जाणवणे
- डोकेदुखी
तज्ज्ञांच्या मते, केवळ बियरच नव्हे तर कॅफिनयुक्त पेये जसे की जास्त प्रमाणातील कॉफीचे सेवनही काही प्रमाणात शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडवू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात पुरेसे पाणी, ताक, लिंबूपाणी, नारळपाणी किंवा इतर द्रवपदार्थांचे सेवन करणे अधिक सुरक्षित मानले जाते.Cold Beer Side Effects : उन्हाळ्यात किंवा प्रचंड उकाड्यात अनेकजण तहान भागवण्यासाठी थंड बियर पिणे पसंत करतात. थंड बियर शरीराला गारवा देईल आणि उष्णतेपासून आराम मिळेल, असा अनेकांचा समज असतो. मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते हा समज चुकीचा असून थंड बियरमुळे शरीरावर उलट गंभीर परिणाम होऊ शकतात.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, बियरमध्ये असलेले अल्कोहोल मूत्राचे प्रमाण वाढवते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. उन्हामुळे आधीच घामाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असताना बियरचे सेवन केल्यास डिहायड्रेशन (निर्जलीकरण) होण्याचा धोका अधिक वाढतो.
तज्ज्ञ डॉ. समीर भाटी यांच्या म्हणण्यानुसार, अनेकांना थंड बियर पिल्याने शरीर थंड राहते असे वाटते. प्रत्यक्षात मात्र अल्कोहोलमुळे शरीरातून अधिक पाणी बाहेर पडते. त्यामुळे तहान कमी होण्याऐवजी शरीरातील पाण्याची कमतरता वाढते.
याशिवाय, अल्कोहोलमुळे मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येतो. शरीरात पाणी टिकवून ठेवणाऱ्या व्हॅसोप्रेसिन या हार्मोनच्या कार्यावरही त्याचा परिणाम होतो. परिणामी शरीरातील द्रव संतुलन बिघडू शकते.
डिहायड्रेशनची लक्षणे कोणती?
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास काही सामान्य लक्षणे दिसू शकतात.
- वारंवार तहान लागणे
- तोंड कोरडे पडणे
- गडद रंगाची लघवी होणे
- लघवीचे प्रमाण कमी होणे
- चक्कर येणे
- थकवा जाणवणे
- डोकेदुखी
तज्ज्ञांच्या मते, केवळ बियरच नव्हे तर कॅफिनयुक्त पेये जसे की जास्त प्रमाणातील कॉफीचे सेवनही काही प्रमाणात शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडवू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात पुरेसे पाणी, ताक, लिंबूपाणी, नारळपाणी किंवा इतर द्रवपदार्थांचे सेवन करणे अधिक सुरक्षित मानले जाते.