📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

शैलेश लोढा यांच्या लेकीचं थाटामाटात लग्न; डान्स आणि गाण्यांनी रंगली मेहफिल, व्हिडीओ व्हायरल

On: July 4, 2026 10:28 AM
आम्हाला फॉलो करा:
Shailesh Lodha dancing at daughter Swara Lodha wedding viral video

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत ‘तारक मेहता’ ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते, कवी आणि लेखक शैलेश लोढा सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या मुलगी स्वरा लोढा हिचा नुकताच थाटामाटात विवाह पार पडला असून या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

लेकीच्या लग्नाचा आनंद शैलेश लोढा यांनी मनापासून साजरा केला. एका व्हायरल व्हिडीओमध्ये ते लोकप्रिय गायक कैफ साबरी यांच्यासोबत “तेरे जैसा यार कहाँ” हे गाणं गाताना दिसत आहेत. याशिवाय त्यांनी बॉलिवूड गाण्यांवर उत्साहात डान्सही केला. त्यांच्या या खास क्षणांना चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.

निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा असा साधा पण आकर्षक पेहराव केलेल्या शैलेश लोढा यांचा आनंद प्रत्येक व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. मुलगी स्वरा मात्र नेहमीच प्रकाशझोतातून दूर राहिली आहे. ती एक लेखिका असून तिने तिची आई डॉ. स्वाती लोढा यांच्यासोबत ’54 Reasons Why Parents Suck’ या पुस्तकाचे सहलेखन केले आहे.

दरम्यान, स्वराच्या पतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र लग्नातील आनंदी वातावरण, कुटुंबातील भावनिक क्षण आणि शैलेश लोढा यांचा उत्साही डान्स यामुळे हे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

विशेष म्हणजे, 2022 मध्ये निर्मात्यांसोबत झालेल्या मतभेदांनंतर शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला रामराम ठोकला होता. त्यानंतरही त्यांची लोकप्रियता कायम असून चाहत्यांकडून त्यांना आजही भरभरून प्रेम मिळत आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!