Sunday, December 7

News

अमरावती विभागीय ACUSAT ची कार्यकारीणी घोषित
News

अमरावती विभागीय ACUSAT ची कार्यकारीणी घोषित

अमरावती/डॉ. नरेश इंगळेविद्यापीठ व महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापकांची रजिस्टर संघटना ACUSAT असोसिएशन ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपर ॲनिमेटेड टीचर्स महाराष्ट्र तर्फे अमरावती विभागाची २०२४ ते २०२९ पर्यंतची कार्यकारीणी केंद्रीय अध्यक्ष डॉ एम. ए. वाहुळ (माजी उपसंचालक उच्चशिक्षण) व केंद्रीय सचिव डॉ जे. एम. मंत्री यांनी नुकतीच जाहीर केली आहे.कार्यकारिणी मध्ये मार्गदर्शक म्हणून डॉ.व्ही.एम. जामोदे (माजी प्रकुलगुरू) अध्यक्षपदी डॉ.ए डब्ल्यू राऊत (माजी सचिव श्री शिवाजी शिक्षण संस्था), सचिव पदी डॉ.पी.डब्ल्यू. देवतारे,उपाध्यक्षपदी एस.आर. अमरावतीकर (अकोला) कोषाध्यक्षपदी डॉ. एच. एस लुंगे, सहसचिवपदी डॉ .ए. एम. अविनाशे व कार्यकारणी सदस्य म्हणून डॉ व्हीं जी ठाकरे (माजी प्राचार्य व सचिव श्री शिवाजी शिक्षण संस्था) डॉ डब्ल्यू. एस. बरडे (अमरावती जिल्हा प्रभारी) डॉ.जी. टी. पाटील (यवतमाळ जिल्हा प्रभारी) डॉ. ए...
आंबेडकरी साहित्य ही समतेची चळवळ-डाॅ चंद्रशेखर भारती
News

आंबेडकरी साहित्य ही समतेची चळवळ-डाॅ चंद्रशेखर भारती

गौरव प्रकाशन कल्याण (प्रतिनिधी) : "निसर्ग नियम हा आहे की अन्यायाची परिसीमा होते, तेव्हा विद्रोहाचा जन्म होतो. पिचलेला शोषित माणूस अन्यायाविरुद्ध पेटून उठला. तो प्रश्न विचारू लागला. याचा परिपाक असा झाला की आंबेडकरी साहित्य अविष्कारले. लेखक त्यातून माणसाची संवेदना मांडू लागला. समताधिष्ठित समाज रचना घडविणे आणि समतेची चळवळ चालविणे हेच आंबेडकरी साहित्य होय" असे प्रतिपादन चौथ्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डाॅ चंद्रशेखर भारती यांनी केले.प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, बुद्धभूमी फाउंडेशन, वालधुनी, कल्याणी येथे चौथे आंबेडकरी साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनाचे उद्घाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने व प्रकाशन समितीचे सचिव डॉ. प्रदीप आगलावे होते. संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक निरंजन पाटील होते. तर प्रमु...
असोसिएशन ऑफ स्मॉल ॲण्ड्र मिडिया न्यूज पेपर्स ऑफ इंडियाच्या शेगाव येथील अधिवेशनाचे जय्यत तयारी सुरू
News

असोसिएशन ऑफ स्मॉल ॲण्ड्र मिडिया न्यूज पेपर्स ऑफ इंडियाच्या शेगाव येथील अधिवेशनाचे जय्यत तयारी सुरू

गौरव प्रकाशन शेगाव (प्रतिनिधी) : असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशचे राज्यस्तरीय अधिवेशन शेगाव दिनांक 17 फेब्रुवारी 2025 आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान या एक दिवशीय अधिवेशनामधील कार्यक्रम पत्रिका अशी, सकाळी १०.०० वाजता. संघटनेच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. तसेच मुख्य अधिवेशनला १२.१५ वाजता प्रारंभ होईल दरम्यान कार्यक्रमाचे स्थळी आल्यानंतर सभासदांनी आपल्या आगमनाची नोंद स्वागत कक्षात करणे आवश्यक आहे.आचार्य बाळशास्त्री जांभेकर व सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल.● हे वाचा – दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणीमान्यवरांचे स्वागत समारंभ समारंभानंतर कार्यक्रमाचे प्रास्तविक राज्यसचिव सुभाष लहाने हे करतील. पहिल्या सत्राचे औपचारिक उद्घघाटन मा.मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांचे खाजगी सचिव मा.श्री विद्याधर महालेजी यांचे शुभहस्ते होणार आ...
राजारामजी वरघट यांचे दुःखद निधन
News

राजारामजी वरघट यांचे दुःखद निधन

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : मूळचे रामगाव रामेश्वर ता. दारव्हा जि यवतमाळ  येथील रहिवाशी व किरण नगर,अमरावती येथील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी सैनिक राजारामजी वरघट  यांचे दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले,मृत्यू समयी त्यांचे वय ८४  वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी बेबिबाई, मुले बाळू उर्फ मनोहर, विनोद, विजय मुलगी सौ.रेखा हजारे, स्नुषा सौ.ज्योती,सौ. वैशाली, सौ.कविता, नातवंडं  आशू, तनु, आस्था, दानी, राणी,स्वराज, प्रिया मोखळे ,शुभम असा आप्त परिवार आहे.अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा...
ऊर्जायान : वर्तमान धर्मांधतेला उत्तर देणारे मुखपत्र -यशवंत मनोहर
News

ऊर्जायान : वर्तमान धर्मांधतेला उत्तर देणारे मुखपत्र -यशवंत मनोहर

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : "ऊर्जायान हा विशेषांक पूर्वीच प्रकाशित व्हायला हवा होता. पण तो आज प्रकाशित झाला. त्यालाही संदर्भ आहेत. वर्तमान धर्मांधतेने ग्रासलेला असताना एक नवा सर्वकल्याणकारी विचार लोकांपर्यंत घेऊन जाणारे लेखन ऊर्जायानात यायला हवे. असे झाले तर ऊर्जायन हे वर्तमान धर्मांधतेला प्रखर बुद्धिवादी उत्तर देणारे मुखपत्र ठरेल" असे विचार प्रख्यात तत्त्वज्ञ डॉ. यशवंत मनोहर यांनी मांडले. भीमा कोरेगाव शौर्यदिन व मुलींच्या शिक्षणाच्या आरंभदिनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या संदीप गायकवाड संपादित 'ऊर्जायान विशेषांक - २०२५' चे प्रकाशन करताना  अध्यक्ष या नात्याने बोलत होते. ते पुढे म्हणाले, "ऊर्जायन भविष्यात समाजप्रबोधनाचे काम करणारे नियतकालिक व्हावे, वर्तमानातील वणव्याचे प्रतिबिंब रेखाटणारे आणि भारतीय समाजाला नवी दिशा देणारे मुखपत्र व्हावे आणि जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व भा...
चंद्रपूरचे कवी एम.ए.रहीम(बंदी) याचे अभंगास प्रथम पुरस्कार
News

चंद्रपूरचे कवी एम.ए.रहीम(बंदी) याचे अभंगास प्रथम पुरस्कार

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : नुकतेच ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र आयोजित तिसरे राज्यस्तरीय युगस्री. फातिमाबी शेख मुस्लीम मराठी साहित्य संमेलन दिनांक १२-०१-२०२५ रविवारी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक येथे सुप्रसिद्ध साहित्यिक कवयित्री मलेका महेबुब शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.उद्घाटन प्रसिद्ध विचारवंत मा.प्राचार्य नागोराव कुंभार यांनी वृक्षाला जलदान देवून केले.या संमेलनात प्रमुख पाहुणे प्रा.फ.म.शहाजिंदे सर ज्येष्ठ साहित्यिक,मोईजभाई शेख, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे लातूर, केंद्रीय अध्यक्ष ॲड.हाशम पटेल, संस्थापक कवी, लेखक श्री.शफी बोल्डेकर सर, संस्था उपाध्यक्ष युवा कवी खाजाभाई बागवान, पहिल्या संमेलनाध्यक्षा कवयित्री अनीसा सिकंदर शेख, डॉ.ई.जा.तांबोळी, डॉ.एहसानुल्ला कादरी, ज्येष्ठ कवी जाफर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाण...
सुधाकर कांबळे यांना आचार्य पदवी
News

सुधाकर कांबळे यांना आचार्य पदवी

पिंपळखुटा/ स्वाती इंगळे    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलोडी (दारव्हा) येथील मुख्याध्यापक सुधाकर रा.कांबळे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा नुकताच राज्यशास्त्र या विषयात आचार्य पदवी बहाल केली आहे.शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावतीचे डॉ.कुंवरलाल वासनीक यांच्या मार्गदर्शनाखाली "भारताच्या परराष्ट्रीय धोरणात अलिप्तवादी चळवळीचे चिकित्सक अध्ययन" या विषयावर संशोधन करून ही पदवी प्राप्त केली आहे.प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सुधाकर कांबळे यांनी आपले पदवी व पदव्युत्तर शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नासिक आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली विद्यापीठातून पूर्ण केले आहे.तसेच त्यांनी राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र व इंग्रजी या विषयात प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली पात्रता नेट सेट या परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केल्या आहेत.डॉ. सुधाकर कांबळे ...
स्व. प. गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त ‘स्वरगोविंद’ शास्त्रीय संगीत मैफिल संपन्न
News

स्व. प. गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त ‘स्वरगोविंद’ शास्त्रीय संगीत मैफिल संपन्न

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी): सुर सप्तक म्युझिक ट्रस्ट आणि बाबाज थिएटर्स नाशिक आयोजित स्वर गोविंद या शास्त्रीय संगीताच्या मैफलीत प्रथम पुष्प डॉ जस्मीत कौर यांनी गुंफले. त्यांनी राग पुरिया सादर केला. यानंतर राग जनसंमोहीनी सादर केला. शेवटी देवाचिया द्वारी हा अभंग सादर केला.यानंतर पंडित विश्वनाथ कान्हेरे यांनी एकल संवादिनी वादन केले. आपल्या जादूई वादनाने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प श्री विनायक हेगडे यांनी गुंफले. त्यांनी राग जोगकौंस मध्ये विलंबित एकतालात पारंपरिक सुघर बरपा हा खयाल सादर केला त्याची जोड म्हणून तीन तालामध्ये पीर पराई ही बंदिश सादर केली.कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ कलाकार पंडित जयंत नाईक आणि पंडित शंकरराव वैरागकर यांचा सत्कार करण्यात आला.मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाबाज थिएटर्स चे प्रशांत जुन्नरे तसेच सुर ...
अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला!
News

अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला!

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन (Dr. Manmohan Singh Passes Away) झालं आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. आता त्यांचं निधन झालं आहे. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली. सन 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान ब...
निशा खापरे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न पुरस्काराने सन्मानित
Quiz, News

निशा खापरे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न पुरस्काराने सन्मानित

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : मदत सामाजिक संस्थेद्वारे निशा खापरे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गुरुदेव सेवा मंडळ येथील दालनात 24 डिसेंबर 2024 ला या संस्थेचे अध्यक्ष नील लाडे सचिव दिनेशभाऊ वाघमारे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.निशा खापरे या गेली नऊ वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असून त्या काव्यप्रेमी शिक्षक मंच या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी आतापर्यंत या संस्थेच्या बॅनरखाली सात काव्य संमेलन आयोजित केलेली आहे. ज्या स्त्रियांनी देशासाठी मोलाचे योगदान दिले त्यांच्या कार्याचा जागर व्हावा या उद्देशाने त्या दरवर्षी "स्त्री शक्तीचा जागर" ही नऊ दिवसीय स्पर्धा नवरात्रीत गेली चार वर्षापासून राबवत आहे. विविध उपक्रम राबवून त्या लिहित्या हातांना बळ देण्याचे कार्य सतत करीत असतात. साहित्यातून समाज प्रबोधनाचे काम करणे...