कु. अनुश्री गणेशराव देशकरी सुवर्ण पदकाने सन्मानित

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : नुकताच दि. 24/2/2025 ला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे विविध विषयात सम्पूर्ण महाराष्ट्रातून दहा (10) प्रथम क्रमांक मिळवलेल्या प्रावीन्य प्राप्त गुणवंत विध्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल C. P. राधाकृष्णन यांनी सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले. यामध्ये कु. अनुश्री सौ. संध्याताई व गणेशराव देशकरी चिखली यांची लेक तथा सौ. संध्याताई व गणेशराव कावळे भुलाई यांची होणारी लेक सुनबाई हिला M. Sc. ( Master of mathematics ) या विषयात विद्यापीठात महाराष्ट्रातून प्रवीण्यांसह प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल महामहिम राज्यपाल C. P. Radhakrishnan याचे हस्ते सुवर्णं पदक प्रदान करून सन्मान करण्यात आला.

● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे  कारंजे ....आधुनिक कारंजा महात्म्य

कु. अनुश्री चे प्राथमिक शिक्षण यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील  मुळगावी चिखली (रामनाथ) येथे झाले माध्यमिक शिक्षण दहावी पर्यंत एडेड हायस्कुल दारव्हा येथे, अकरावी, बारावी जगदंबा जुनिअर कॉलेज यवतमाळ  B.Sc. पदवी पर्यंत V. M.V. (विदर्भ महा विद्यालय) अमरावती येथे झाले तर M. Sc. मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा जि. यवतमाळ येथून उत्तीर्ण केले. अमरावती येथे B. ed. (सर्व अभ्यासक्रम व डिग्री, प्रथम श्रेणित उत्तीर्ण) सध्या भाटेगाव, ता. हदगांव जि. नांदेड येथे पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.

        कु. अनुश्री ला मिळालेल्या यशाचे श्रेय हे वरील सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राचार्य आणी कर्मचारी वृंदाना जाते. विशेषतः श्री संजय भोयर सर (P.hd mathematics )  तसेच प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मार्गदर्शन करणाऱ्या सुज्ञ हितचिंतकांचे  या निमित्य सर्वांचे आजीवन ऋणी असेल असे उद्गार अनुश्रीने याप्रसंगी काढले.  प्राथमिक शिक्षण हे गावच्या जिल्हा परिषद मराठी शाळेत घेणारे विध्यार्थी सुद्धा जिद्द, चिकाटी, परिश्रम असेल तर गोल्ड मेडलिस्ट होतात. मुलीने सुवर्ण पदक मिळविले याचा आनंद आई वडिलांना व जवळच्या मंडळींना होतो ते साहजिकच आहे. पण यातून सर्व विध्यार्थ्यांना, पालकांना प्रेरणा घेण्याची आज गरज आहे.

● हे वाचा –Dr. Sujay Patil : डॉ सुजय पाटील – 'ध्येयवेडा डॉक्टर'

        सुवर्णं पदक गौरव सोहळा उत्साहात पार पडला  आमच्या  जीवनातील सर्वात मोठया खुशिच्या दुर्मिळ क्षणात , देशकरी कुटुंबाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी  बंधूतुल्य ऋणानुबंधी सन्माननीय श्री गणेशराव कावळे सर  आणी स्नेही मित्र गजाननराव गावंडे सर या प्रसंगाचे साक्षीदार झाले. अनुश्रीला  आजवर आपण दिलेल्या कौतुकाचे पाठीवरील थापेमुळे ऊर्जा मिळून हा सन्मान झाल्याची जाणीव आहेच, सोबत दिलेल्या शुभेच्छा व केलेल्या अभिनंदनाबद्दल  आभार श्री गणेशराव देशकारी यांनी व्यक्त केले. आपल्या कर्तुंवाने कुटुंबासह सर्वांची मान उंचावणाऱ्या कर्तृत्वान लाडल्या लेकीचे सर्वत्र सहृदय अभिनंदन करण्यात येत आहे. गौरव प्रकाशन अमरावती कडून अनुश्रीला भावी यशासाठी शुभेच्छा व सदिच्छा..!

Leave a comment