Thursday, November 13

Article

मक्तेदारी…..!
Article

मक्तेदारी…..!

मक्तेदारी.....!क्षेत्र कुठलं ही असू द्या ! अगोदर पासून ठाण मांडुन बसलेले मातब्बर आणि त्या क्षेत्रातील गब्बर व्यक्ती असतात. काही ही झालं तरी लगाम आपल्याच हातात हवा ही त्यांची मानसिकता असते. बाहेर बोलताना फक्त बोलायचं  ह्या क्षेत्रामध्ये नवीन होतकरू तरुणांच स्वागत आहे. अगदी कुठली ही मदत करायला आम्ही तयार आहोत परंतु  मुह में राम और बगल में....अशी त्यांची मानसिकता असते....           मग याला चित्रपट क्षेत्र तरी कसं अपवाद असेल उलट इथं आणि राजकारणात सर्वात जास्त घराणेशाही दिसून येते हे सांगण्याची गरज नाही.  शोधली तर किती तरी  उदा. आपल्याला सापडतील. त्यामुळे ह्या लोकांची मानसिकता कमालीची कोती झाली असून जर दुसरा कुणी ह्या क्षेत्रात येतोय , आणि यशस्वी होतोय  हे ह्यांच्या पचनी पडण  खूप अवघड आहे. नागराज मंजुळे यांचं कधी तोंडभरून कौतुक केलेलं तुम्ही पाहिल का ?कारण त्याने यांची सगळी रेकॉर्ड तर उध्वस...
हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे..!
Article

हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे..!

*हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे ~~~~~~~~~~~~~~~~~जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी सेवन केल्याने कोणते फायदे होतात आणि पाणी कसे तयार करावे. साहित्य : अर्धा लिंबू, अर्धा टि स्पून हळद, गरम पाणी, थोडेसे मध (वैकल्पिक)कृती :एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यामध्ये हळद आणि गरम पाणी मिसळा.यानंतर त्यामध्ये चवीनुसार मध मिसळा. हे मिश्रण तुम्ही हलवत राहा. यामुळे हळद खाली बसणार नाही.घ्या हळदीचे पाणी पिण्याचे 8 आरोग्य फायदे... हे फायदे वाचल्यावर तुम्ही नियमित हळदीचे पाणी पिणे सुरु कराल...*शरीराची सूज कमी करते - शरीरावर कित...
जिव्हाळा..!  (पूर्वीचे लग्न)
Article

जिव्हाळा..! (पूर्वीचे लग्न)

" बालपणीचा काळ सुखाचा "       [ भाग १ ]"जिव्हाळा" (पूर्वीचे लग्न)आमच्या बालपणी लग्न म्हणजे एक आनंद सोहळा असायचा . लग्न एक महिना लांबच आहे तर जवळच्या पाहुण्यांची जमवाजमव सुरू झालेली असायची . आताच्या काळाएवढी  दळणवळण आणि संदेशवहनाची मुबलकता नसल्याने किमान वीस ते पंचवीस दिवस अगोदर पत्रिका पोहचवणे आणि मु-हाळी जाणे या प्रक्रिया सुरू व्हायच्या. जवळचे नातेवाईक जसे आत्या, मावशी, मावस भाऊ, मावस बहिणी ,आते भाऊ,  आत्या बहिणी, चुलत बहिणी, या किमान आठ ते दहा दिवस अगोदर पोहोचलेल्या असायच्या .घर अगदी भरलेले "गोकुळ " होऊन जायचं .सर्व एकत्र आले म्हणजे चालणाऱ्या गमतीजमती आणि हास्यविनोदात सर्व न्हाऊन निघायचे.त्याकाळात एवढी सधनता ,संपन्नता नसली तरी मनाची श्रीमंती मात्र ओसंडून वाहत होती . बारामाही वाहणाऱ्या नद्यांप्रमाणे. घरामध्ये जरी जागा कमी असायची परंतू मनात प्रेमाची उणीव नसायची.मातीची घरं जाऊन सिमे...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन
Article

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन

"डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन " ----------------------------------------  प्रा. डॉ.नरेश शंकरराव इंगळे मु. भांबोरा ता. तिवसा जिल्हा अमरावती. मोबाईल- ९९७०९९१४६४ ----------------------------------------      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचे विविध असे पैलू आहेत.मानवाचा सर्वांगीण विकास आणि कल्याणाच्या दृष्टीने विविध विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण असे भाष्य केले.एकाच वेळी सामाजिक परिवर्तन आणि जातीय निर्मूलनाची लढाई लढताना त्यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाकडे येनकेन प्रकारे विसर पडल्यागत झाला. थोर समाजसुधारक,शिक्षणतज्ञ,उत्तम पत्रकार,भारतीय घटनेचे शिल्पकार,महिला व बहुजन समाजाचे उद्धारकाबरोबरच ते एक उत्तम अर्थशास्त्री सुद्धा होते.त्यांचा अर्थशास्त्रीय व्यासंग आणि अभ्यास व्यापक स्वरूपाचा होता.त्यांच्यातील अर्थशास्त्रीय दृष्टिकोन अतिशय सुस्पष्ट आणि भारताच्या सर्वांगी...
डॉ. बाबासाहेब यांची तत्वनिष्ठ पत्रकारिता
Article

डॉ. बाबासाहेब यांची तत्वनिष्ठ पत्रकारिता

डॉ. बाबासाहेब यांची तत्वनिष्ठ पपत्रकारितासमाज जागृती व समाज परिवर्तनाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणजे वृत्तपत्र .लोकांवर होणा-या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडणे व जनतेला आपल्या हक्कांची जाणीव करून देण्याचे काम वृत्तपत्रे करीत आहेत. वृत्तपत्रांमुळे ज्ञान, माहिती, रंजन व प्रबोधन होते. ते लोकशाहीचा चौथा खांब आहे.कोणत्याही चळवळीमध्ये वर्तमानपत्रे खूप महत्त्वाची भूमिका फार पाडीत असतात.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या निश्चित भुमिकेतूनच पत्रकारितेकडे वळले होते. १९१७ साली विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी शासनाने साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असावे असे वाटले. ”पंखाश...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर   आपल्या भारत देशाचा इतिहास महान आहे. ह्या पवित्र भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशातील बांधवांसाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्या महान कार्याचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा त्या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.   भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व आई भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी इंदूर जिल्ह्यातील महू या गावात झाला.    रामजी वडिलांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले होते. त्यांना स्वतःला वाचनाची आवड  असल्याने घरात ग्रंथसंग्रह होते.  त्याच बरोबर मुलांना ही चांगली पुस्तके ते आणून द्यायचे. त्या कारणाने बाबासाहेबांना  वाचनाची, अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय लागली असावी.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तकांचे खरे ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतील शब्द न शब्द हे अन्यायग्रस्तांन साठी अमृत ठेवा
Article

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतील शब्द न शब्द हे अन्यायग्रस्तांन साठी अमृत ठेवा

 भिमजयंती निमित्याने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतील शब्द न शब्द हे अन्यायग्रस्तांन साठी " अमृत ठेवा - यशस्वी व उज्जवल मार्गासाठी "   महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिनांक १४ एप्रिल १८९१ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी आयुष्यभर अपार कष्ट करून ज्ञानसाधना करून अनेक विषयात ज्ञानशांखावर त्यांनी प्रभुत्व संपादन केले याद्वारे त्यांनी स्वतःची शैक्षणिक उन्नती तर साधलीच सोबतच समग्र भारतीयांच्या जीवनात महान क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी अहोरात्र कष्ट केले.    महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे  शोषितांचे मुक्तिदाते म्हणून सुपरिचित आहेत शिक्षणाच्या बळावर एकूणच समग्र भारतीयांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणण्याचे काम महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी केले असून एक प्रकारे भारताची पायाभरणी केली आहे.अन्यायग्रस्त समाजासाठी त्यांनी मोलाचे अतुलनीय कार्य ...
वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरील आव्हाने व त्यांचे समाधान.!
Article

वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरील आव्हाने व त्यांचे समाधान.!

वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरील आव्हाने व त्यांचे समाधान     क्रांतिघोष करून आंदोलनाचा चालून जा रे आंबेडकर वीरांनो मृत्यूतत्त्ववादी बंडलबाजाचा फसवा चेहरा उजागर करा वीरांनो ...   प्रस्तावना : आंबेडकरवाद हा एक मुलतः परिवर्तनीय महाऊजेचा मुख्य स्त्रोत आहे. भारतीय समाजाला व जगातील सर्व मानवाला नव्या मूल्यमंथनाचा नवा अविष्कार देणारा महाप्रकल्प आहे. आंबेडकरांच्या क्रांतीत्त्वाने भारतीय समाजाचा ,शिक्षणाचा, राजकारणाचा, धर्माचा व विज्ञानाचा चेहरामोहराच बदललेला आहे. आंबेडकरवादी आंदोलनाने देशाला नवी मूल्यसंहिता दिली आहे .धगधगत जळणाऱ्या मानवाला धम्माची शांतता देण्याचे काम आंबेडकरवादी आंदोलनाने केलेले आहे. आंबेडकरवादी आंदोलन हे समता मुलक मानवतावादी विचारांचा मूल्यजागर आहे.     भारतीय समाजातील विषमतामय मुळांना आग लावून समतेचे मानवीय सरोवर निर्माण करणारा संवेदनशील आविष्कार म्हणजेच आंबेडकरवाद होय .आंबेडक...
Article

युगद्रष्टा सत्यशोधक डॉ.पंजाबराव देशमुख  एक संग्राह्य ग्रंथ

युगद्रष्टा सत्यशोधक डॉ.पंजाबराव देशमुख  एक संग्राह्य ग्रंथ आज दि.10 एप्रिल 2023 ला असलेल्या डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त " युगद्रष्टा सत्यशोधक डॉ.पंजाबराव देशमुख एक संग्राह्य ग्रंथ " हा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत. -------------------------------------आज दि.10 एप्रिल 2023 रोजी असलेल्या शिक्षण महर्षी -कृषी महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. भाऊसाहेब देशमुख यांना लहानपणापासूनच शेतकऱ्यांविषयीची जाण होती, कळवळा होता कारण ते जन्माने आणि कर्माने भूमिपुत्र होते . शेतकऱ्यांच्या सहवासात त्यांचे बालपण गेले म्हणून त्यांना भारतीय शेती जगाच्या तुलनेत मागे असल्याची जाणीव होती . भारताचा विकास शेतीच्या विकासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.हा त्यांचा विचार आजही तेवढाच मोलाचा आहे,त्यांनी तत्कालीन काळात  शेतकऱ्यांसाठी र...
गुड फ्रायडे…
Article

गुड फ्रायडे…

गुड फ्रायडे...   गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे. ख्रिश्चन धर्मातील समजूतीप्रमाणे याच दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉस वर चढवण्यात आले होते. याची आठवण ठेवून ख्रिस्ती धर्मात हा दिवस शोक दिवस मानला जातो. या दिवसाला गुड फ्रायडेला होली फ्रायडे, ब्लॅक फ्रायडे किंवा ग्रेट फ्रायडे म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी काही ख्रिश्चन बांधव उपवास ठेवतात, ख्रिश्चनांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ म्हणजे लेंट सिझन दरवर्षीं मार्च-एप्रिल याच काळात येतो. नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद असतो.   या काळात मांस खाल्ले जात नाही, परंतु फळे, भाज्या, मासे, दूध, अंडी आणि गहू यांचे सेवन केले जाते.  जेरुसलेम प्रांतात भगवान येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्माचा प्रसार, प्रचार करत होते. ख्रि...