या पाच देशात खाद्यपदार्थांवर आहे बंदी.!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
या पाच देशात खाद्यपदार्थांवर आहे बंदी.! 
सिमोलीया, फ्रान्स, अमेरिका, युनायटेड किंगडम, सिंगापूर या पाच देशात विविध खाद्यपदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. तर जाणून घेऊया, असे कोणते खाद्यपदार्थ आहेत.
* सामोसा :
सिमोलिया या देशात समोसा या पदार्थांवर बंदी घातली आहे. यादेशातील अल-शबाब या पक्षाच्या नेत्यांना समोसे हे आक्षेपार्ह वाटतात. त्यांच मत असे आहे की, समोसाचा आकार हा त्रिकोणी आहे. हा आकार ख्रिश्चन धर्माच्या ट्रिनिटीसारखा आहे. म्हणून येथे या पदार्थाला बंदी आहे.
* केचअप :
फ्रान्स देशात केचअप या पदार्थावर बंदी आहे. पकोडे, कटलेट असे अनेक पदार्थ आपण खाताना केचअप घेत असतो. त्याशिवाय असे पदार्थ स्वादिष्ट लागत नाहित. मात्र फ्रान्स देशात या पदार्थाला बंदी आहे. या देशाचे असे म्हणणे आहे की, फ्रान्सच्या पारंपरिक पाकशैलीला या पदार्थाचा धोका आहे. या पदार्थामुळे फ्रेंच स्वादाचीलोकप्रियता कमी होईल.
* किंडर जॉय :
अमेरिका या देशात अनेक कडक नियम आपल्याला माहिती आहे. लहान मुलांना स्पर्श केला तरी येथे कारवाई होते असे म्हणतात. पण येथे लहान मुलांचा आवडता पदार्थ किंडर जॉयवर बंदी घातली आहे. लहान मुलांना या किंडर जॉयमुळे अनेक खेळणी  मिळतात त्यामुळे हा पदार्थ लहान मुलांसाठी खुप आवडीचा ठरतो. पण अमेरिकेतील लहान मुलांना हा आंनद लुटता येत नाही. कारण  किंडर जॉयच्यामध्ये  असणारे प्लास्टिकचं खेळणं हे लहान मुलांसाठी धोक्याचे आहे. लहान मुलांनी गिळू नये म्हणून अमेरिकेतील सरकारने बंदी घातली आहे.
*च्युविंग गम :
सिंगापूर आपल्या स्वच्छतेसाठी जगप्रसिद्ध आहे. स्वच्छतेबाबत हा देश काटेकोर आहे. नियमांचे उल्लघन केल्यास दंड केला जातो. स्वच्छेतेच एक हिस्सा म्हणुन च्युविंग गम या पदार्थावर येथे बंदी घालण्यात आली आहे. रस्त्यावर खाऊन टाकल्यास ३२००० रूपये इतका दंड आहे. २००० साला पासून हा नियम लावण्यात आला आहे.
– संकलन : प्रविण सरवदे,
कराड

Leave a comment