Sunday, March 8

Article

पोतराज…
Article

पोतराज…

पोतराजपोतराज हा मरीआई या ग्रामदेवतेचा उपासक. तो जातीने महार वा बहुधा मातंग असतो. पोतराज हा शब्द म्हणजे पोत्तुराजु या तमिळ शब्दाचे रूपांतर होय. शब्दाप्रमाणेच पोतराजाचे आचरण, पूजापद्धती, नृत्य इत्यादींवरही द्रविड संस्कृतीचा प्रभाव दिसतो. दक्षिणेत सात बहिणी या नावाच्या ग्रामदेवी प्रसिद्धआहेत. त्यांचा भाऊ असलेल्या एका ग्रामदेवाला पोत्तुराजु म्हणतात. मरीआईला लक्ष्मीआई असेही म्हणतात. त्यामुळेच पोतराजाला मरीआईवाला व लक्ष्मीआईवाला अशीही नावे आहेत.पोतराज व त्याचा परिवार गावात येतात, तेव्हा कडकलक्ष्मी आली असे म्हटले जाते. मरीआई ही कडक देवी असल्यामुळे तिला कडकलक्ष्मी म्हणतात. पोतराजाच्या हातातील कोरड्याला ‘कडक’ असे नाव असल्यामुळे तिला कडकलक्ष्मी हे नाव मिळाले, असे सरोजिनी बाबर यांचे मत आहे. लक्ष्मी हा शब्द येथे विष्णुपत्नी या अर्थाने आलेला नसून, अंबाबाई या अर्थाने आला आहे.पोतराज पुरुष असूनही तो...
मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो?
Article

मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो?

मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो?माणूस मेल्यानंतर सुरुवातीला त्याचे स्नायू शिथिल होतात व शरीर सैल पडते. ही अवस्था ३ ते ४ तास राहते. त्यानंतर मात्र शरीरात काही बदल घडून येतात. स्नायूंतील बदलांमुळे मृतदेह कडक होतो.स्नायूंमध्ये मायोसीन आणि ॲक्टिन नावाचे तंतू असतात, त्यांच्या आकुंचन प्रसरणामुळेच स्नायूंचे आकुंचन प्रसरण होत असते. आकुंचन पावल्यानंतर स्नायू कडक होतात तर प्रसरणामुळे शिथिल होतात. मृत्यूनंतर शरीरात, स्नायूंमध्ये ऊर्जेची निर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे मायोसिन व ॲक्टीन हे तंतू एक दुसऱ्यात मिसळून त्यांचे निर्जलीकरण होऊन एक कडक पदार्थ तयार होतो. साहजिकच या तंतूचे आकुंचन प्रसरण थांबते व स्नायू व पर्यायाने मृतदेह कडक होतो. या प्रक्रियेला इंग्रजीत रायगर माॅर्टीस असे म्हणतात.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!भारतात मृतदेह कडक होण्याची प्रक्रिया मरणानंतर २ ते ३ तासांनी सुरू ह...
कुंभारकामाचा झाला असा प्रवास…
Article

कुंभारकामाचा झाला असा प्रवास…

कुंभारकामाचा झाला असा प्रवास...पाषाणांतुन जी संस्कृती उगवली तिला अश्मयुग असे म्हटले जाते. दगडाची हत्यारे, तासण्या, टोचण्या ते रंगीबेरंगी दगड-गारगोट्यांचे अलंकार या काळात बनवले जात होते. या काळात माणूस शिकारी व पशुपालक अवस्थेत होता. सभोवतालच्या उपलब्ध नैसर्गिक संसाधनांना कल्पकतेने आणि कष्टाने जीवनोपयोगी बनवण्याची कला ही मानवी बुद्धीची एक झेपच होती. पण याच काळात माणूस केवळ पत्थर नव्हे तर मातीचाही कल्पकतेने उपयोग करायला शिकला. त्या कलेलाच आपण कुंभारकाम म्हणतो. आज मानवाचा पुरातन इतिहास कळण्याची दोनच साधने आहेत. दगडी हत्यारे व वस्तु तसेच उत्खननांत मिळणारी खापरे.भारतात या कलेची सुरुवात तीस हजार वर्षांपुर्वी झाली. सिंधुपुर्व कालापासुनचे कुंभारकामाचे नमुने आपलयाला मिळून येतात. त्या खापरांवरुन त्या कालातील पर्यावरण ते पीके याचीही माहिती मिळते. कुंभारकामाचा प्रवास हाताने घडवलेली मडकी व वस्तुंपास...
शरीरासाठी गरम पाणी किती आवश्यक?
Article

शरीरासाठी गरम पाणी किती आवश्यक?

शरीरासाठी गरम पाणी किती आवश्यक? सध्या सगळीकडे थंडीचे दिवस सुरु आहेत. या कडाक्याच्या थंडी पासून वाचण्यासाठी लोक गरम पाणी पीत पितात. थंडीचा त्रास कमी होण्यासाठी काही लोक नियमित गरम पाणी पितात. खरंतर, गरम पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते, पण अनेकदा थंडीत फार गरम पाण्याचे सेवन केले जाते. त्यामुळे शरीरावर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. एवढेच नाही तर शरीरात इतरही अनेक समस्या सुरू होतात.*अन्ननलिकेचे नुकसान होते गरम पाणी प्यायल्याने अन्ननलिकेवर सर्वाधिक परिणाम होतो. तोंड आणि पोट यांना जोडणारी ही अन्ननलिका आहे. गरम पाणी प्यायल्याने या अन्ननलिकेतून दाणे बाहेर पडू लागतात. यासोबतच त्यात जळजळही सुरू होते. ही वेदना दीर्घकाळ असते.*हार्ड स्टूल गरम पाणी प्यायल्याने तुमच्या लक्षात आले असेल की स्टूल कठीण होते, त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होते. जेव्हा तुम्ही खूप गरम पाणी प्याल तर ते पोट ग...
 मोबाईलचे तंत्रज्ञान शाप की वरदान ?
Article

 मोबाईलचे तंत्रज्ञान शाप की वरदान ?

 मोबाईलचे तंत्रज्ञान शाप की वरदान ?आजच्या काळात सर्वच क्षेत्रातील तंत्रज्ञान फारच विकसित झालेले आहे. मोबाईलचे तंत्रज्ञान तर इतके वाढले आहे कि ती एक मोठी क्रांतीच झालेली जाणवते. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलेला आहे. घराघरातील प्रत्येक व्यक्ती जवळ मोबाईल पहावयास मिळत आहे. त्यातही विलक्षण अशी विविधता आलेली आहे. घरातल्या फोनची जागा या मोबाईलने केव्हाच घेतली आहे. अशा या मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे कधी कधी मोबाईल नकोस वाटू लागतो. त्यातूनच प्रश्न निर्माण होतो, मोबाईल शाप कि वरदान?पण, ज्यावेळी एखादे नवीन तंत्रज्ञान निर्माण होते तेव्हा ती मानवी सुखसोयी या दृष्टीनेच उदयास येते. मानवाचे कल्याण साधणे हाच एकमेव हेतू या तंत्रज्ञानामागे असतो. मोबाईल सुद्धा एक विकसित स्वरुपाचे तंत्रज्ञान आहे, ते शाप कसे असेल? ते एक फार मोठे वरदानच आहे. फक्त मोबाईलचा नको तितका आणि नको तसा अतिरिक्त वापर केला जातो, त...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरआपल्या भारत देशाचा इतिहास महान आहे. ह्या पवित्र भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशातील बांधवांसाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्या महान कार्याचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा त्या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व आई भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी इंदूर जिल्ह्यातील महू या गावात झाला. रामजी वडिलांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले होते. त्यांना स्वतःला वाचनाची आवड असल्याने घरात ग्रंथसंग्रह होते. त्याच बरोबर मुलांना ही चांगली पुस्तके ते आणून द्यायचे. त्या कारणाने बाबासाहेबांना वाचनाची, अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय लागली असावी.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य ...
एकच साहेब बाबासाहेब
Article

एकच साहेब बाबासाहेब

एकच साहेब बाबासाहेब           ३१ जुलै १९५६ ची सायंकाळ. नानकचंद टपाल घेऊन बाबसाहेबांकडे आलेले. बाबासाहेब ओसरीत बसून स्टूलवरच्या उशीवर पाय ठेवून नानकचंद यांना डिक्टेशन देत होते. मधातच त्यांनी डोळे, डोके खुर्चीच्या पाठीवर टेकवले आणि त्यांना झोप लागली. थोड्या वेळाने त्यांना पुन्हा जाग आली. रत्तु यांनी वाचून दाखविलेल्या पत्रांची उत्तरे त्यांनी भराभर डिक्टेट केली. नंतर नानकचंद यांच्या खांद्यावर हात ठेवून ते झोपायच्या खोलीत गेले आणि अंथरुणावर त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या दुसऱ्या हातातील पुस्तक गळून पडले. काही वेळ ते काहीच बोलले नाही. नानकचंद घाबरले. त्यांनी डोक्याला, पायांना मसाज केले. त्यामुळे बाबासाहेब थोडे शांत वाटत होते.गेल्या काही दिवसांपासून हे घडत होतं. शेवटी मोठया धाडसाने नानकचंद यांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला, "सर, अलीकडे आपण एवढे दुःखी आणि खिन्न का दिसता ? अधूनमधून डोळ्...
महानायकाच्या महापरिनिर्वाणापूर्वीचे पाच दिवस..
Article

महानायकाच्या महापरिनिर्वाणापूर्वीचे पाच दिवस..

महानायकाच्या महापरिनिर्वाणापूर्वीचे पाच दिवस..६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे प्रचंड वादळ शांत झाले. भारतीय राजकारणातील आयुष्यभर उन्हात उभे राहून तमाम दलितांना मायेची सावली देणारी कोट्यवधी दलितांची माऊली पोरके करून निघून गेली. पण जाताना भारताला राज्यघटना आणि अशोकचक्राची देणगी देऊन गेली. धर्म नसलेल्या माणसाला धम्म देऊनगेली. आयुष्यभर संघर्ष करून मिळवून दिलेल्या अधिकाराचे जतन करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची मांडणी करून गेली. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ऐतिहासिक ग्रंथाला पूर्णत्व देऊनच आपल्या ऐहिक जीवनाची समाप्ती केली. गुरुवार, दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी सकाळी सहा वाजता एक पाय उशीवर, डोक्याजवळ हस्तलिखित कागद काही महत्त्वपूर्ण ग्रंथ,चष्मा एक इंजेक्शन सिरिज, एक औषधाची बाटली या अवस्थेत माईसाहेबांनी बाबासाहेबांना पाहिले.निद्रावस्थेत बाबांचे देहावसान झाले होते. हे कळल्यावर सात कोटी दलि...
म्हातारपण लवकर नको ?
Article

म्हातारपण लवकर नको ?

म्हातारपण लवकर नको ? तारुण्य टिकवण्यासाठी ‘हे’ करा 5 आयुर्वेदिक उपाय.....तरुणांनाच काय, तर वयोवृद्धांनाही आपण चिरतरुण राहावे, असे वाटत असते. यासाठी म्हातारपण लवकर येऊ नये, यासाठी काय करायला हवे, अँण्टीएजिंग प्रोसेस कशी करावी, याविषयी आयुर्वेदात माहिती देण्यात आली आहे. म्हातारपण येऊ नये किंवा आलेलं दिसू नये, यासाठी काय करायला हवं, याविषयी आयुर्वेदात 5 उपाय सांगण्यात आले आहेत. जाणून घेऊया...* भरपूर ऑक्सिजन शरीराला मिळेल, हे पाहा... शरीराला जेवढा ऑक्सिजन मिळेल तेवढी प्रत्येक पेशीला नवीन ऊर्जा मिळेल. झाडाला पाणी मिळालं की, ते तरारून वर येतं. त्याचप्रमाणे शरीरालाही ऑक्सिजनची आवश्यकता असते. प्रत्येक पेशीला ऑक्सिजनची आवश्यकता असते. लिवर, किडनी, फुफ्फुस, मेंदू अशा सगळ्या अवयवांना ऑक्सिजन मिळाला की, हे सगळे अवयव चिरतरुण राहण्याकरिता मदत करतात. यासाठी दीर्घ श्वसन करा. जाणीवपूर्वक श्वास घेऊन श्वा...
वाळवंटातच तेलांचे साठे का मिळतात ?
Article

वाळवंटातच तेलांचे साठे का मिळतात ?

वाळवंटातच तेलांचे साठे का मिळतात ?हा प्रश्न तितकासा बरोबर नाही कारण तेल केवळ वाळवंटातच मिळतं नाही असं नाही. ते अंटार्क्टिक प्रदेशातही मिळतं तसंच सागरी आखातात किंवा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशातही मिळतं. आपल्या बॉम्बे हाय आणि कृष्णा, गोदावरी खोऱ्यातील तेलांचे साठे याची प्रचिती देतात. तरीही वाळवंटात तेल मिळण्याच्या शक्यता जास्त आहेत, यात शंका नाही या काही भौगोलिक प्रदेशात ते का मिळतं हा प्रश्न उरतोच.याची दोन कारणं आहेत तेलाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि ते तयार झाल्या नंतर त्याचे साठे हलवले जाण्याची प्रक्रिया. पहिल्या प्रक्रियेसाठी सूक्ष्मजीव झटपट आणि ऑक्सिजन विरहित वातावरणात गाडले जाण्याची आवश्यकता असते. कारण अशा वातावरणातच त्यांच्यामधले हायड्रोजन आणि कार्बन यांच्यामधले बंध शाबूत राहू शकतात, त्यांच्या पासून हायड्रोकार्बन रूपातल्या खनिज इंधनांची निर्मिती होऊ शकते असं वातावरण नद्यांच्या त्रि...