पारावरच्या गप्पा….!
पारावरच्या गप्पा....!अय.....चेरमन आर कुड चालला ! तू तर मोकार बाता मारीत व्हता. आपला लै वट, खासदार ,मंत्री आन आमदार साह्यबा जवळ. ! मस सारी दुन्या येऊन गेली की गावात कुड गेली मदत .ती पन तात्काळ की फात्काळ येणार व्हती नव्ह . आता त ,थेट नागपुरात हाय हिवाळी अधिवेशनात समद मंत्री संत्री, आन आमदार ! तिथं काय ठरलं का ? तुला फोन केला असलं की तुह्या ..साह्यबानि.. रामभाऊ थोडा हसला आणि म्हणाला अस पण तुमची इज्जत काय त्य माहीत हाय.जवळून जाणाऱ्या कुत्र्याला जोरदार हाड, आर हाड....! अस म्हणत त्याने विषय बदला आणि पुन्हा बोलू लागला. नाय तरी तिथं जाऊन तरी काय करत्यात म्हणा .सरकारी खर्च उगाच यर्थ अशी गत हाय भो नागपूर अधिवेशनात नाय का चेरमन!चेरमन हसला,आणि बोलू लागला. गारपीट झाली त्या येळी तुह्या थोबाडाव" गार का नाय पडली भली मोठी. .? गप्प.. तरी राहिला असता. सारखी वलवाल लावली गावभर . इरोधी पार्टी नि खर्च...









