📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

सोलापूर धम्मसंगीतीत मोठा निर्णय | बौद्ध संस्कारांमध्ये एकसूत्रतेची मागणी

On: June 14, 2026 11:06 AM
आम्हाला फॉलो करा:
बौद्ध संस्कारांवर मोठा निर्णय सहावी धम्मसंगीती सोलापूर 2026
बौद्ध संस्कारांवर मोठा निर्णय सहावी धम्मसंगीती सोलापूर 2026

सोलापूर | प्रतिनिधी

सोलापूर येथे आयोजित सहावी धम्मसंगीती यशस्वीरित्या संपन्न झाली. बौद्ध धम्म हा लोककल्याणकारी असून बौद्ध संस्कार विधींमध्ये साधेपणा, समानता आणि एकसूत्रता असावी, तसेच विधींमध्ये आलेले भांडवलीकरण टाळले पाहिजे, असे प्रतिपादन उद्घाटक डॉ. रविंद्र मुन्द्रे यांनी केले.

रविवार, ७ जून २०२६ रोजी वेळुवण बुद्ध विहार, शिक्षक हाउसिंग सोसायटी, दक्षिण सदर बाजार, सोलापूर येथे ही धम्मसंगीती पार पडली. बौद्ध समाजातील विविध संघटनांच्या सहभागातून आयोजित या कार्यक्रमाचे संचालन अध्यक्षीय मंडळाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

अध्यक्ष मंडळात भिक्खुणी धम्मचारिनी, देहू रोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीचे अध्यक्ष भीमपुत्र टेक्सासदादा गायकवाड, नागपूर बुद्ध विहार समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक सरस्वती बौद्ध, संभाजीनगरचे प्रा. भारत शिरसाट, कोल्हापूरचे बापूसाहेब राजहंस आणि आनंदा कांबळे यांचा समावेश होता.

बौद्ध संस्कारांवर मोठा निर्णय सहावी धम्मसंगीती सोलापूर 2026

कार्यक्रमाची सुरुवात अशोक सरस्वती बौद्ध यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहणाने झाली. प्रा. विजय झुंमरे यांनी त्रिसरण पंचशील दिले. मुख्य निमंत्रक डॉ. कीर्तिपाल गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

धम्मसंगीतीमध्ये तीन महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये बौद्ध संस्कार विधींमध्ये एकसूत्रता, बौद्ध सणांची निश्चिती आणि व्यवहारातील ब्राह्मणी शब्दांऐवजी स्वतंत्र बौद्ध शब्दावली निर्माण करण्याची आवश्यकता या विषयांचा समावेश होता.

या चर्चासत्रांमध्ये भीमपुत्र टेक्सास गायकवाड, राहुल खांडेकर, अशोक सरस्वती बौद्ध, प्रा. भारत शिरसाट, प्रा. विजय झुंमरे आणि बापूसाहेब राजहंस यांनी मार्गदर्शन केले.

या धम्मसंगीतीत राज्यभरातील शंभराहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. कीर्तिपाल गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!