Wednesday, March 11

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
महाकुंभात मृत्यूचा मेळा.!
Article

महाकुंभात मृत्यूचा मेळा.!

मौनी अमावस्येनिमित्त गंगातिरी पवित्र शाही स्नान करण्याकरता जमलेल्या भाविकांमध्ये बुधवारी (२८/१/२५) पहाटे चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. यात अनेकजण गंभीर जखमी असून अनेक८-१० भाविकांचा मृत्यू झाल्याचीही भीती वर्तवली जात आहे.याआधीही कुंभमेळ्यात अनेक चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत.प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळाव्यात मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मौनी अमावस्येला स्नान करण्यासाठी अनेक भाविक संगमावर जाण्यासाठी गर्दी करू लागले. त्यावेळी मोठी चेंगराचेंगरी अनेकांचा मृत्यू  झाला असून भक्तांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीनंतर भाविकांचा सर्वत्र आक्रोश दिसून आला.महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्...
ऊर्जायान : वर्तमान धर्मांधतेला उत्तर देणारे मुखपत्र -यशवंत मनोहर
News

ऊर्जायान : वर्तमान धर्मांधतेला उत्तर देणारे मुखपत्र -यशवंत मनोहर

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : "ऊर्जायान हा विशेषांक पूर्वीच प्रकाशित व्हायला हवा होता. पण तो आज प्रकाशित झाला. त्यालाही संदर्भ आहेत. वर्तमान धर्मांधतेने ग्रासलेला असताना एक नवा सर्वकल्याणकारी विचार लोकांपर्यंत घेऊन जाणारे लेखन ऊर्जायानात यायला हवे. असे झाले तर ऊर्जायन हे वर्तमान धर्मांधतेला प्रखर बुद्धिवादी उत्तर देणारे मुखपत्र ठरेल" असे विचार प्रख्यात तत्त्वज्ञ डॉ. यशवंत मनोहर यांनी मांडले. भीमा कोरेगाव शौर्यदिन व मुलींच्या शिक्षणाच्या आरंभदिनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या संदीप गायकवाड संपादित 'ऊर्जायान विशेषांक - २०२५' चे प्रकाशन करताना  अध्यक्ष या नात्याने बोलत होते. ते पुढे म्हणाले, "ऊर्जायन भविष्यात समाजप्रबोधनाचे काम करणारे नियतकालिक व्हावे, वर्तमानातील वणव्याचे प्रतिबिंब रेखाटणारे आणि भारतीय समाजाला नवी दिशा देणारे मुखपत्र व्हावे आणि जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व भा...
कुंभमेळ्यातील मोनालिसाचे चाहते.!
Article

कुंभमेळ्यातील मोनालिसाचे चाहते.!

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ पहिल्या दिवसापासूनच देशात आणि जगात चर्चेचा विषय ठरला आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महाकुंभ चालणार आहे.  यावेळी संगम नगरी प्रयागराजमध्ये लाखोंच्या संख्येने ऋषी, संत, भिक्षू, भक्त आणि भक्तांची गर्दी पाहायला मिळते.  प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर श्रद्धेने स्नान करण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून लोक येत आहेत.महाकुंभ काळात ऋषीमुनींसह भाविक आणि सर्वसामान्य नागरिकही त्यांच्या खास वैशिष्ट्यामुळे आकर्षणाचे केंद्र बनले होते.  नुकतेच हर्षा रिचारिया, आयआयटी वाले बाबा, छबी वाले बाबा, कांटे वाले बाबा आदी व्हायरल ब्युटीसोबतच, दरम्यान, महाकुंभात वस्तू विकायला आलेल्या एका साध्या मुलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले.  महाकुंभमध्ये व्हायरल झालेल्या या मुलीचे नाव मोनालिसा असल्याचे सांगितले जात आहे, ...
मंतरलेले दिवस 
Article

मंतरलेले दिवस 

तालुक्या पासून अगदी दहा बारा कोसावर आमचं गाव.गावाला लागूनच सडक,जवळच बस स्टॅण्ड व स्टॅण्डला लागूनच एक दोन तुराटया,पऱ्हाटया व मेनकापडानं छाकारलेल्या हॉटेली. त्या समोर भट्टीवर ठेवलेल्या व तयणानं काया ठिक्कर झालेल्या भजे,आलुबोंडा तळायच्या मोठमोठ्या कढई व्हॉटेलीच्या समोर लावलेल्या हिरव्यागार कडू बदामीच्या झाडाखाली नाश्ता करणार्या गिऱ्याहाईकासाठी तुटका,फुटका एखादा बेंच टाकलेला समोर पाणी थंड रहावं म्हणून एखादा बोंदरी बांधलेला रांजन ठेवलेला.समोरच लागून एक दोन दाढी कटींगची दूकानं. शेतात जाण्यासाठी गावशिवाराचाही एकच रस्ता असल्यान दिवसभर माणसाचा नुसता राबता‌. चार दोन म्हातारे कोतारे शाळेच्या व्हरांड्यात थंड फरशीवर आंग टाकलेली दिसायची तर काही पानटपरीवर आलेला पेपर वाचण्यात आनंद घेणारी. शाळेतली चार दोन चिंगरी पोरं गोया,बिस्कीटा,व पोंगा पंडिता साठी मास्तरांचा डोळा चुकवून येजा करताना मधेच दिसायची.एक ...
चंद्रपूरचे कवी एम.ए.रहीम(बंदी) याचे अभंगास प्रथम पुरस्कार
News

चंद्रपूरचे कवी एम.ए.रहीम(बंदी) याचे अभंगास प्रथम पुरस्कार

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : नुकतेच ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र आयोजित तिसरे राज्यस्तरीय युगस्री. फातिमाबी शेख मुस्लीम मराठी साहित्य संमेलन दिनांक १२-०१-२०२५ रविवारी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक येथे सुप्रसिद्ध साहित्यिक कवयित्री मलेका महेबुब शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.उद्घाटन प्रसिद्ध विचारवंत मा.प्राचार्य नागोराव कुंभार यांनी वृक्षाला जलदान देवून केले.या संमेलनात प्रमुख पाहुणे प्रा.फ.म.शहाजिंदे सर ज्येष्ठ साहित्यिक,मोईजभाई शेख, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे लातूर, केंद्रीय अध्यक्ष ॲड.हाशम पटेल, संस्थापक कवी, लेखक श्री.शफी बोल्डेकर सर, संस्था उपाध्यक्ष युवा कवी खाजाभाई बागवान, पहिल्या संमेलनाध्यक्षा कवयित्री अनीसा सिकंदर शेख, डॉ.ई.जा.तांबोळी, डॉ.एहसानुल्ला कादरी, ज्येष्ठ कवी जाफर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाण...
सुधाकर कांबळे यांना आचार्य पदवी
News

सुधाकर कांबळे यांना आचार्य पदवी

पिंपळखुटा/ स्वाती इंगळे    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलोडी (दारव्हा) येथील मुख्याध्यापक सुधाकर रा.कांबळे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा नुकताच राज्यशास्त्र या विषयात आचार्य पदवी बहाल केली आहे.शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावतीचे डॉ.कुंवरलाल वासनीक यांच्या मार्गदर्शनाखाली "भारताच्या परराष्ट्रीय धोरणात अलिप्तवादी चळवळीचे चिकित्सक अध्ययन" या विषयावर संशोधन करून ही पदवी प्राप्त केली आहे.प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सुधाकर कांबळे यांनी आपले पदवी व पदव्युत्तर शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नासिक आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली विद्यापीठातून पूर्ण केले आहे.तसेच त्यांनी राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र व इंग्रजी या विषयात प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली पात्रता नेट सेट या परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केल्या आहेत.डॉ. सुधाकर कांबळे ...
फक्त कवितेवर जगणारा कवी महाराष्ट्राचा हास्यसम्राट डॉ.मिर्झा रफी अहमद बेग
Article

फक्त कवितेवर जगणारा कवी महाराष्ट्राचा हास्यसम्राट डॉ.मिर्झा रफी अहमद बेग

मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत तालुक्यातील धनज माणिकवाडा या लहानशा खेड्यात राहणारा डॉ.मिर्झा रफी अहमद बेग आज महाराष्ट्र मधील लोकप्रिय कवींच्या पदवीला आणि झी टीव्हीच्या हास्य सम्राट पदवीला पात्र झाला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड मानधन घेणारे जे कवी आहेत त्या कवीमध्ये आज मिर्झा रफी अहमद बेग याची गणना होते. हा कवी फक्त कवितेवर जगत होता.जगत आहे आणि जगत राहणार आहे. अगदी आड वळणाच्या माणिकवाडा नावाच्या गावात राहणारा व आता अमरावतीला स्थायिक झालेला हा कवी सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय झाला असून कोट्यावधी रसिकांच्या हृदयात त्याने स्थान मिळविले आहे.हा कवी कुणी प्राध्यापक नाही. अध्यापक नाही .व्यावसायिक नाही. पण आज कवितेच्या बळावर अमरावतीच्या वलगाव रोडवर त्याचा दोन मजली बंगला आहे .याशिवाय खालच्या मजल्यावर मुलाचे स्टील सेंटर आणि हार्डवेअरचे प्रशस्त मोठे दुकान आहे. नुकताच मिर्झा रफी अहमद ...
लढा नामांतरांचा
Poem

लढा नामांतरांचा

नामांतर लढ्यांनआम्हां काय दिलंहक्क आणि अधिकारभीम क्रांतीलढण्याचं बळ दिलं .....अस्मिता स्वाभिमानसंघर्षअन्याय अत्याचारलाथाडूनएकीच बळ दिलं ....नामांतर लढ्यांनआम्हाला काय दिलंआंबेडकर नावाचंवादळजीवंत असल्याचंगाव दिलं....नामांतर लढ्यांनआम्हां काय दिलंगुलाम होतो व्यवस्थेचेगुलामीला ठोकरण्याएकीच बळ दिलं...नामांतर लढ्यांन आम्हा काय दिलंमाजलेल्याजातिभेदालागडण्याची बळ दिलं. नामांतर लढ्यांन  आम्हा काय दिलंसमस्त बहुजनांनापाहिजे तस्सत्तेच  ताट दिलं ....नामांतर लढ्यांन आम्हाकाय दिलंशिका संघटित होण्याचफळ दिलं ...नामांतर म्हणजेक्रांतीचा नाराजागृतीचा नगारामाणूस म्हणूनमाणुसकीचंधड दिलं .....- राजेंद्र क.भटकर       बडनेरा*********************हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!...
म्या पाहयलेलं माह्य मरन
Story

म्या पाहयलेलं माह्य मरन

नुकताच फेब्रुवारी सुरू झाला होता. उन्हाच्या झ्यावा चांगल्याच आंगाले झोंबत  होत्या. झाडांची पानगळ होऊन सारा फफुळळा वावटयी संग झिंगझिंग झिंगाट करत होता. गरम सुटणारा वारा चांगलाच रन्नावला होता.बायामाणसांनी मोठ्या कष्टाने सोंगलेले गहु, हरभरयाचे कवटे आपल्या संग घेऊन जात होता. मोठमोठ्या वावटया सुटून पालापाचोळा दुरवर आकाशाले गवसनी घालत होता.मजूरांना भिववीत होता.जो तो आपापल्या कामात गर्क होता.समोर मार्च महिन्यात धूयमाती असल्यानं सणासुदीच्या दिवसांत चार पैसे गाठीले रायले पायजे तेवढीच आपल्या संसाराले मदत होईल.या आशेने आपल्या  हरभरा सोंगूनसोंगून हरभरयाच्या खारानं हातापायांच्या फुटलेल्या जखमांवर बिबे  भरत होता.  काहींनी हाताले पालू गुंडाळले होते. सारया हातापायाची खारट खारानं  आगाआग होत होती.हरभरयानं पिवळेधम झालेले वावरं  मजूरांच्या ईव्यच्या दणक्याने भराभर खाली होत होते.जागोजागी बैलबंडीनं कवठे जमा ...
स्व. प. गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त ‘स्वरगोविंद’ शास्त्रीय संगीत मैफिल संपन्न
News

स्व. प. गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त ‘स्वरगोविंद’ शास्त्रीय संगीत मैफिल संपन्न

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी): सुर सप्तक म्युझिक ट्रस्ट आणि बाबाज थिएटर्स नाशिक आयोजित स्वर गोविंद या शास्त्रीय संगीताच्या मैफलीत प्रथम पुष्प डॉ जस्मीत कौर यांनी गुंफले. त्यांनी राग पुरिया सादर केला. यानंतर राग जनसंमोहीनी सादर केला. शेवटी देवाचिया द्वारी हा अभंग सादर केला.यानंतर पंडित विश्वनाथ कान्हेरे यांनी एकल संवादिनी वादन केले. आपल्या जादूई वादनाने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प श्री विनायक हेगडे यांनी गुंफले. त्यांनी राग जोगकौंस मध्ये विलंबित एकतालात पारंपरिक सुघर बरपा हा खयाल सादर केला त्याची जोड म्हणून तीन तालामध्ये पीर पराई ही बंदिश सादर केली.कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ कलाकार पंडित जयंत नाईक आणि पंडित शंकरराव वैरागकर यांचा सत्कार करण्यात आला.मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाबाज थिएटर्स चे प्रशांत जुन्नरे तसेच सुर ...