नुकताच फेब्रुवारी सुरू झाला होता. उन्हाच्या झ्यावा चांगल्याच आंगाले झोंबत होत्या. झाडांची पानगळ होऊन सारा फफुळळा वावटयी संग झिंगझिंग झिंगाट करत होता. गरम सुटणारा वारा चांगलाच रन्नावला होता.बायामाणसांनी मोठ्या कष्टाने सोंगलेले गहु, हरभरयाचे कवटे आपल्या संग घेऊन जात होता. मोठमोठ्या वावटया सुटून पालापाचोळा दुरवर आकाशाले गवसनी घालत होता.मजूरांना भिववीत होता.जो तो आपापल्या कामात गर्क होता.समोर मार्च महिन्यात धूयमाती असल्यानं सणासुदीच्या दिवसांत चार पैसे गाठीले रायले पायजे तेवढीच आपल्या संसाराले मदत होईल.या आशेने आपल्या हरभरा सोंगूनसोंगून हरभरयाच्या खारानं हातापायांच्या फुटलेल्या जखमांवर बिबे भरत होता. काहींनी हाताले पालू गुंडाळले होते. सारया हातापायाची खारट खारानं आगाआग होत होती.हरभरयानं पिवळेधम झालेले वावरं मजूरांच्या ईव्यच्या दणक्याने भराभर खाली होत होते.
जागोजागी बैलबंडीनं कवठे जमा करून एका जागी गंज मारणं चालू होते. थरेशर मशीन,आईला इंजीनची मळणी यंत्र जागोजागी सुरू होते. त्याचा टूकटूकटूक आवाज रानावनात दूर स्पष्ट जाणवत होता. दिसत होत्या.जंगल माणसांशी बोलत होता. काही निंबाच्या सावलीत पायटून संग आणलेली भाकर खात होते. काही पाणी पीत होते.काही मजाकी मोठमोठ्या आवाजात गाणी म्हणीत.घरमालकानं वावरं खाली झाल्यावर खाली सांडलेल्या धान्याले सावळसूवळ करणया साठी बटईनं नाही तर रोजानं बाया सांगुन दायदांणा येचून घरी आणला जात होता.मातेरं नदीवर धूवून पाण्यानं साफसुफ करून वाऊचिऊ घातल्या जात होतं.कोणी टैकटरनं रिकामं झालेलं वावर नांगरून घेत होतं.तर कोणी धूरेधारे पेटोत होतं.जनावरं उलंगवाडी झालेल्या वावरात पोट भरण्यासाठी जमीन फुकुफुकु खात होती.जमीनीत खाली पडलेला दायदाणा खाऊन शेतात खोदलेल्या तया तलं पाणी पेऊन झाडाखाली सावलीत ईसावत होती.काही हिरव्या गवताच्या शोधात नाल्या नाल्यानं पांगली होती. भिकाजीनं वावरात खंदाळी करून कवठे भरायले सुरूवात केली.आज बैलजोडी त्यानं काही आणली नव्हती त्याचा बुढा कडबयाच्या गुळाले काटयांचा कुप भरायसाठी पायटीच गेला होता.कुप भरला की उन्हायाभर मोकाट ढोराईचा तरास कमी होतो.पाणी पडेलोक फिकीर रायतं नाही.एखांद अचाट ढोरं तर कुपावरून उडी मारून पेंडया घोऊन काढते.कोंडवाडयात नेऊन नेऊन कितीक न्याल. काहीनी हा मस्त जोडधंदाच केला होता.
● हे वाचा – धामंत्री येथील प्राचीन शिवमंदिर
लोकाईचया भरोशावर ढोरं वागवाईचे पिकात चूपचाप सोडून द्यायचे.संडमंड झाले की पैसे कमवायचे.कासतकारी करणं काही सोपं यातलं नव्हतं.मोकाट,जंगली जनावरांचा बराच त्रास होत होता.कूंपण भरा की काही करा शेवटी हाती धूपारणंच यायचं भिकाजीचा एकरभरच हरभरा होता.सोयरयाले त्यान दहा हजार उसने मांगितले होते.पिकाईवर आपला सोयरा पैसे देईन या बोलीवर सोयरयाईनं त्याले उसने पैसे देले होते.तसा तो ईमानदार होता.कोणाचा एक पैसाही हरामाचा नाही पायजे हेच भिकाजीचं तत्व होतं तेच तो आतापर्यंत जोपासत आला होता.आपलं काम आणी आपण कोण्या पुढार्यांचया मांग पुढे कराच नाही कोणाची दारू पिऊन पैसे घेऊन मिंध रायचं नाही. यंदा त्याचा हरभराही जोरात आला होता.गंजी मारून झाकून ठेवला.पाणीपावसाचा काही भरोसा नव्हता.अभाय भरून आलं होतं.लोक म्हणे की “”महाशिवरात्रीचा वार येते काय सायाचा”. “जेव्हा पायजै तेव्हा नाही मरणार आता माल काढणीले आल्यावर जोर करुन रायलं; दुपारपर्यंत भिकाजीनं मस्त काम केलं व दुपारी घरी येऊन न्हाणीत हातपाय धुवून तालुक्याच्या आठवडी बजारात गेला.तसही त्याले दोनतीन कामं होती.हरभरयाची खरेदी लेव्ही सुरू झाली की नाही हेही पाहायचं होतं मालाचे पैसे उशीरा भेटतात पण भाव म्हणजे हमीभाव भेटतो.पोराचा रिझल्ट ही पाहायचा होता.खाजगी शाळेत त्यान त्याले चौथीत टाकलं होतं. गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळा वसान पडल्या होत्या.सारं आधूनीक वारं वाहायला लागलं होतं .
लोकांचे लेकरांनी खेडं सोडून शहराचा रस्ता पकडला होता.तशी परिस्थिती सरकारनं त्यांच्या वर आणली होती.खाजगीकरण केलं की पैसा आडमाप येत होता.शिक्षकांना पगार पाणीही द्यायचं काम नव्हत.चारपाच हजारात बिए बिएड झालेला मास्तर शिकवायले भेटत होता. तालुक्याले आल्यावर तो पयले शाळेत आला.खिडकीतून बाबूनं त्याले पाहिल्यावर त्याची सारी कुंडली रजिस्टर उघडून वाचून दाखवली.”तुमची मागची किस्त थकीत आहे.ती भरल्यानंतर रिझल्ट भेटीन”.भिक्यावर चांगलीच आफत आली होती.कारण रिझल्ट घेऊन दुसर्या म्हणजे गावच्या शाळेत पोराने तो टाकणार होता.तसा हा शहरातील खर्चही त्याले झेपावत नव्ह्ता.बाबू आयकाले तयार नव्हता.”हरभरे ईकुन मी चार आठ दिवसांत तुमचे पैसे चूकते करतो;अजून सरकारची खरेदी लागली.नाही” “आमहाले लयच बहयाड समजता काहो तुम्ही”! “अशांन तर आमचे दूकानं बंद होऊन जातील; मास्तर लोकांचा पगार पाणी शिक्षणविभागाचा एखांदा बोक्या आला की त्याले ही पाचपन्नास हजाराचा निवद दाखवल्या शिवाय मान्यतेची फाईल जागची हलत नाही.
● हे वाचा – सुतारपक्षास (Woodpecker) जंगलचा डॉक्टर का म्हणतात?
तुमच बरं आहे फुकट फाटक हे ईकतो ते ईकतो.चला जा घरी”हातात मयका झोरा पायातील चपलीचे आंगठे तुटलेला भिकाजी एकदम कानकोंडा झाला होता. त्याच पोरगं त्याचा हावभावाचं बारीक निरीक्षण करतच होतं बाजूनं उसने पासने मांगा. म्हणून चाचपणी केली.पण भिकाजीची पयलेच खुठी फसलेली होती.तसाच त्यानं हरभरा भरायचा बारदाना फक्त ईकत घेऊन घरची वाट पकडली. संध्याकायचं चांगलच अभाय अंधारून आलं होतं.ईजा चमकत होत्या.शेवटी गारपिटीचा रट्टा बसलाच होता.जयाईनं वावरं सोंगले गंज मारले ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पाण्यानं सडले कोंब फुटले.जे हरभरे उभे होते.ते पार नुकतीच कटींग केलेल्या पोट्टयावानी भोंडे करून टाकले होते.भिकयाची चांगलीच खुटी अटकली होती. पाणी उघडल्यावर दोन दिवसानं उन पडल्या वर त्यानं मशीन लाऊन हरभरा तयार केला.काही कावा काही दायंबी झालेला पाण्याचा मारा बसलेला असल्याने भावही कमी आला. सोयरयाधायरयाईचं देणंघेणं लेकाराईच शिक्षण पाणी यांनी पुरता बेजार झालेल्या भिकाजीनं मागचा पुढचा जराही ईचार न करता रातची वसरीतल्या नाटीले दोरखंडानं फासी घेऊन जीव देला.भिकाजीच्या घरी एकच गलका झाला.
सारया गावात बातमी फयलली जोतो फक्त आ वासून उभा राऊन लटकलेल्या भिकाच्या शरीराले पायत होता. “काहीही केलं हो भिकानं लेकानं घरादाराच्या तं ईचार कराचा होता”. भिकाजीची सकाऊन च्या पाणी ही न झालेली उपाशी तापाशी लेकरं धाय मोकलून लळतपळत होती.बायकोची तर चकच बसली होती.बुढाबुढीचा तर अधारच काढून घेतला होता.पुरं कंबरडं मोडलं होतं.शेवटी पंचनामा,पोस्ट मार्टम होऊन सारा कार्यक्रम निपटला.भिकाजीची तर या फसकटातून सुटका झाली.पण खरी फजीती आता त्याच्या कुटुंबाची होती. होती.. भिकाजीचा आत्मा घरातच भटकत होता.तो सारं निमुटपणे पायत होता.येणारे जाणारे पावणे येत होते.भेटुन जात होते.आपण मेल्यावर कुटुंबाचे झालेले कुत्र्यासारखे हाल तो उघड्या डोळ्यांनी पायत होता.रात्री रडून रडून अर्धपोटी झोपलेली लेकरं त्यानं खिडकीतून डोकावून पायली.लेकराईचया अंगावर चादर देऊन मच्छर अगरबत्ती लाऊन नंतरच तो झोपायचा.पण आता त्याच्या गैरहजेरीत चित्र वेगळं होतं. लेकरांच्या आंगावर मच्छरांची नुसती गर्दी पाहून भिकाजीचं काळीज तटतट तुटलं. बायको तरी गरीबीत काय करणार.माणुस निघून गेल्यावर तीच्या मनाची झालेली अवस्था ही तीलेच माहीत.
● हे वाचा –Dr. Sujay Patil : डॉ सुजय पाटील – ‘ध्येयवेडा डॉक्टर’
मीरगांच धोधो पाणी पडलं होतं. ईजा कडाडत होत्या. लहान लहान तान्ही लेकरं या कडकडाटाच्या आवाजाने दचकत होती.लोकांनी सरते,डवरे तिफना गावच्या सुताराकडून भरून घेतल्या भिकाजीच्या घरात खायचीच सोय नव्हती तर बि बियाण्याची दुरचीच गोष्ट त्याच्या बायकोने सारे पासबुक धुंडाळून काढले. हरभरयाचे भेटलेले पैसे दे दाय करून दिले.लवकर भाकर तुकडा करून आता बैंकेत किती पैसे आहेत हे पहाण्यासाठी तीनै स्टैणड वर जाऊन कालीपीली पकडली खंडीभर कोंबड्यां सारखी खचाखच माणसं भरलेली जीपकार एकदाची निघाली.नाकयावर उतरून ती पयदलच बजारात आली व जवळच असलेल्या बैंकेत तीन पासबुक दाखवलं पण बैंकेतील कर्मचाऱ्यांन “लिंक नाही म्हणून नंतर या” असं सांगीतलं .तशीच उपाशी तापाशी ती तरीच कित्येक वेळ बसून होती.नवरा मेल्यावरच अशी आफत तिच्यावर आली होती.हे दूरूनच भिकाजी तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत होता.व ओक्साबोक्शी रडत होता. कोण्या देवानं आपणास ही बुद्धी देली म्हणून स्वताच्या नशीबालेच दोष देत होता.लिंक आल्यावर पासबुकची एन्ट्री झाल्यावर दोन सरकीचया थैल्या घेऊन सरकी घरी आली.लोकांना नवीन बैंक कर्ज भेटणार होती.
मागच्या वर्षी भिकाजीनं सम्पूर्ण कर्जाची रक्कम भरली होती. यावर्षी नव्यानं बैंकेत कर्ज काढायसाठी बुढा गेला होता.भली मोठी शेतकऱ्यांची लाईन लागली होती. ऊन्हा तान्ह्यात चालून चालून व तरणाबांड पोराच्या मरणाचं दुःख उराशी ठेऊन कायजीनं म्हातारयाला धाप लागली व रांगेतच जाग्या वर कोसळून जीव सोडला.भीकाजीच्या परिवारावर ही फार मोठी आपत्तीच होती. कर्ता धरता कसाही म्हातारा माणूस होता.तोही राहिला नाही.आपण गेल्यावर घराची ईस्कटलेली घडी पाहून त्याने हंबरडा फोडला.भिकाजीच्या आत्महत्येचा अहवाल आला होता. त्यासाठी त्याचा मृत्यूपत्राचा दाखला घेऊन तीनं तहसील गाठलं व तलाठ्याकडे तो जमा करून केस तयार केली. अर्ज जर पात्र ठरला तरच काही महिन्यांनं तीले ही रक्कम भेटणार होती.या कामासाठी तीले बरेच हेलपाटे पुरले काही गावांतील टगे काड्या करतच होते. “आत्महत्या कायची हो काही घरगुती वाद असतील नवरा बायकोचे” असेही म्हणत होते.पण या सर्व प्रसंगाले ती तोंड देतच होती.सकाऊन उठून तीनं ढोरं सोडली.व पोरीले घेऊन बजारात गेली. हाताच्या मुठीत पैशे धरून त्याचा अंदाज घेत ती खरेदी करत होती.शेवटी भातकयासाठी पैसे न उरल्यानं लेकरांची समजूत काढत घरी आली.
● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
कयन्याच्या वडयाईची भाजी व भाकरी टाकल्या.सोबत कांदा चिरला.बजाराचया दिवशी बिना भातक्याची रायलेली पोरं बघून भिकाजीच्या डोयाले धारा लागल्या होत्या.पण आता काही इलाज नव्हता. गावच्या अंगणवाडी तील बाई घरी आली शाळेत चर्चासत्र आयोजित केल्याच सांगून निघून गेली. चर्चासत्रात संजय गांधी निराधार , विधवा, परित्यक्ता आदीसाठी असलेल्या योजना साहेबांन समजावून सांगितल्या.ही योजना तयार करायला तहसीलीत एका दलालांने तीले हजार रुपयाची मागणी केली.शेवटी या सर्व भानगळीले,व परिस्थीतीले कंटाळून तीनं पोरं शाळेत गेल्याचं पाहून गावठानाले लागूनच असलेल्या पोलीस पाटलांच्या विहिरीत आपला जीव देला.एका झटक्यात पोरं अनाथ झाली.भिकाजी सगळं आपल्या डोयानं पाहतच होता. फक्त तो कोणाचे डोयानं दिसत नव्हता.आईबापाच्या एकदम जाण्यानं भेदारलेली म्हातारीनं ही पोरं त्यांच्या मामाच्या गावाला नेऊन द्याव म्हणून पायटूनची एसटी पकडली पण मामाच्या पुढे मामीनच आपली कर्म कथा सांगून नेलेली पोरं तशीच घरी वापस आणली. शेवटी कोण कोणाचं आहे हो.हे सर्व पाहून भिक्या गडबळा लोयन घेत होता. डोकसं घेत होता.आपणच आपल्या परिवाराची हातानं माती केल्याच आता त्याच्या ध्यानात आलं होत.पण आता इलाज नव्हता.भिका शेतातून फेरफटका मारून आला.
शेजारी पाजारी त्याच्या वावरात जनावरे ढोरं चारीत होते.पण तो काहीही करू शकत नव्हता.घरी येऊन कट्टमकाट उपाशी खुटयावर बांधलेले बैलं पाहून रडत होता.पण चारा टाकून शकत नव्हता. त्याची नवीन घेतलेली मोटारसायकल त्याची नातेवाईक फिरवत होते. म्हातारी आई तरी काय करणार हे सर्व पाहून तीन्हे कायमची बाज धरली होती.अंथरूणाले खिळली होती. आपल्या घरी कोणी असतं तर ही अशी भिक मागायची व आयुष्याचा उन्हाया व्हायची परिस्थिती आपणावर आली नसती.हे आठवून लळत होती, आपला ऊर बडवत होती.हे विदारक चित्र पाहून भिका मोठ्यानं ओरडून खोट्या स्वप्नातून दचकून जागा होतो.व घड्याळात पाहतो.तर सकाऊनचे चार वाजलेले, त्याला दरदरून घाम येतो. त्याच्या या मोठ्या आवाजाने बायको घाबरून पयतच येते.व त्याले पाणी प्यायले देते, व तब्येत बरी नाही नाही काय.
● हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!
अशी ईचारते.तो मात्र सुन्नपणे पाहतच राहतो.सकाऊन च्या घेऊन वावरात जातो.व घडलेला प्रसंग आठवतो.हे सर्व जर खरं असतं तर माह्या बायको लेकरांईची किती आफत झाली असती.घरी आल्यावर हातपाय धुवून स्टॅंणड वर जातो लोकं पानटपरी वर पेपर वाचत असतात.विजय मल्ल्या,व आता अदाणीनं बैंकेचं खुप मोठं कर्ज बुडवल्याचे तो लोकांकडून ऐकतो.मनाशी ईचार करतो.हे लुच्चे लफंंगे एवढे घोटाळे करून समाजात ताठ मानेनं जगतात आपण तर हातापायांनं धडधाकट आहो.आपण मरून घरादाराचे प्रश्न सुटत नसतात उलट ते अधिक वाढतात. आत्महत्या आपण एकट्यानं केली होती पण तीने घरातील सारयाच लोकांचा जीव घेतला होता.कुत्र्याईन पकडलेल्या डुकराची ओढाताणीत धड तूटूणही जीवंत राहायची व जीवन जगायची चाललेली धडपड पाहून तो तसाच ताडकन उठला व आंगात नवी उमेद संचारल्या सारखा तडक घराच्या दिशेने निंघाला.
-विजय जयसिंगपुरे, अमरावती.
भ्रमणध्वनी -९८५०४४७६१९