Tuesday, March 10

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
आशेचा कुबडा: माणुसकीचा खरा चेहरा
Story

आशेचा कुबडा: माणुसकीचा खरा चेहरा

मंदिराबाहेर नेहमीप्रमाणेच भिक्षेकरी तपासत होतो... तपासुन घेण्यासाठी, औषधांसाठी नेहमीचीच भिक्षेकर्यांची झुंबड ....सहज लक्ष गेलं एका कोपऱ्यात, तिकडे दगडावर एक बाबा बसलेले दिसले... बसणं ताठ, नाक तरतरीत आणि सरळ, घारुळे डोळे, अंगावर साधे पण स्वच्छ कपडे... बराच वेळ मी तिरक्या नजरेने पहात होतो, हे भिक्षेकरी नक्कीच नव्हेत.... ! सहज दिसलं, उजव्या घोट्यापासुन पाय नव्हता त्यांना, बाजुलाच कुबडी टेकवुन ठेवली होती....थोड्या वेळानं सहज लक्ष गेलं, कोणीतरी काहीतरी देत होतं आणि ते घेत होते... अरे ! माझा अंदाज चुकला तर....उत्सुकता वाढली म्हणुन त्यांच्याजवळ जायला लागलो तर कुणीतरी म्हणालं, डॉक्टर, नका जावु, वेडा आहे तो !उत्सुकता स्वस्थ बसु देइना म्हणुन गेलो, मला वाटलं ते मला पाहुन हात पुढे करतील....पण त्यांचा हात पुढं आलाच नाही तीथंही अंदाज चुकला माझा....मीच म्हणालो, बाबा काही त्रास ? कुबडी घेत हळु...
नाटकासाठी मातीशी जपलेलं नातं.!
Article

नाटकासाठी मातीशी जपलेलं नातं.!

हा माझा विदर्भातला जिगरी दोस्त. वर्ध्याचा. हरीश इथापे ! लै भारी माणूस. आम्हा दोघांच्या दोस्तीचा एकच धागा - 'नाटक' ! हरीशला शेती, घरच्या जबाबदार्‍या सोडून लांब पुन्यामुंबैला जाऊन 'नाटक' करणं शक्य नव्हतं आनि गांवाकडं शेती करता-करता नाटकाचा 'किडा' स्वस्थ बसू देईना ! काय करायचं?... मग त्यानं शेतातच शेतकरी मित्रांना सोबत घेऊन जगावेगळं 'ॲग्रो-थिएटर' सुरू केलं ! ...हरीशचं टॅलेंट एवढं जबरदस्त की नादखुळ्या, भन्नाट 'ॲग्रो थिएटर'ची ख्याती हळूहळू दूरवर पसरत गेली. आता महाराष्ट्रासहित आसपासच्या सहा-सात राज्यातून इथे नाटकाचे ग्रुप त्याच्या शेतात येतात. शेतात एक हाॅल बांधलाय. रहाण्या-जेवण्याची, रिहर्सलची सोय तिथंच आहे. पोरंपोरी महिना-महिना रहातात. नाटकाची वर्कशाॅप्स, लेखन, रिहर्सल्स करतात. बांधावर-विहीरीवर-तळ्याकाठी 'मोनोलाॅग्ज' पाठ करत बसतात... झाडांशी-पक्षांशी बोलायला शिकतात.. मग कलाकार बहर...
तरुणाईचे लग्न जुळे ना.!
Editorial

तरुणाईचे लग्न जुळे ना.!

तरुणाईचे लग्न जुळे ना.!तरुणाईचे लग्न जुळणे हा एक सामाजिक आणि मानसिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा विषय आहे. भारतीय समाजामध्ये लग्न हा एक पवित्र आणि महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. पूर्वीच्या काळी, विवाह हा कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे पालनपोषण करणारा एक आधारस्तंभ होता. तरुण वयात एकमेकांशी जुळणारे विवाह हे समाजाच्या नैतिकतेचे, संस्कृतीचे आणि परंपरेचे पालन करत होते. त्याचबरोबर प्रेमविवाह, जो आजच्या काळात स्वीकारला जातो, पूर्वी फारसा सामान्य नव्हता. प्रेम, मैत्री आणि भावना इत्यादी गोष्टी विवाहाच्या पारंपरिक संकल्पनांमध्ये येत नव्हत्या.आजच्या तरुणाईची जीवनशैली आणि विचारधारा पूर्वीच्या पिढीच्या तुलनेत खूप वेगळी आहे. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून साऱ्या जगाशी कनेक्ट होणे हे एका बाजूला सुविधा असले तरी दुसऱ्या बाजूला जीवनशैलीला प्रगल्भतेसाठी पुरेसा वेळ देणे आणि कुटुंबाशी...
कदम मामा श्रद्धांजली.!
Article

कदम मामा श्रद्धांजली.!

परभणीच्या सकाळी एक खास ठिकाण असायचं संजीवनी पोहा सेंटर. कामावर धावणाऱ्या माणसांपासून ते शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांसाठी इथले पोहे म्हणजे सकाळची ऊर्जा होती. या सेंटरचा आत्मा म्हणजे परमेश्वर कदम, सर्वांच्याच आपुलकीने 'कदम मामा' म्हणून ओळखले जाणारे.दोन किलो पोह्यांनी सुरू झालेला त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत गेला. कामगार, विद्यार्थी, छोटे दुकानदार, मोठे व्यापारी, डॉक्टर, वकील, सरकारी अधिकारी सर्व थरांतले लोक संजीवनी सेंटरला भेट द्यायचे. केवळ पोहेच नाही, तर खिचडी, मुगवडा, भजी, मिरची भजी आणि त्यांच्या हातच्या चहाची चव लोकांच्या जिभेवर चढली होती.कदम मामांचं वैशिष्ट्य वेगळं होतं. गरजूंना पोहे देताना त्यांनी कधी पैसे मागितले नाहीत. कोण उपाशी आला तर मामा स्वतःहून त्याच्या प्लेटमध्ये भरभरून वाढायचे. त्यांच्या स्वभावात असलेली माया आणि आपुलकी माणसांना जास्त भावायची.व्यवसाय...
११ मे रोजी झाले ज्योतिराव फुले ‘महात्मा’ पदवीने सन्मानित
Article

११ मे रोजी झाले ज्योतिराव फुले ‘महात्मा’ पदवीने सन्मानित

प्रत्येक दिवस हा काही ना काही नवीन घेऊन येत असतो व आपली छाप पाडून इतिहासामध्ये अजरामर होत असतो. म्हणून तर प्रत्येक दिवसाची दिन विशेष म्हणून एक नाविन्यपूर्ण नोंद केलेली असते. आपण सहज दिन विशेष कडे नजर टाकली तर काही ना काही नावीन्य व वेगळेपण दिसत असते. केवळ ह्या दिवसाच्या नावीन्यपुर्णाने आपण तो दिवस साजरा करत असतो. हा दिवस साजरा केल्यामुळे आपल्याला प्रेरणा, ऊर्जा, उत्साह व काही तरी नवीन शिकायला मिळून आपल्याला ज्ञान प्राप्त होऊन आपली ज्ञानात अधिक भर पडत असते.असाच एक ऐतिहासिक दिवस आहे तो म्हणजे ११ मे १८८८ ह्या दिवशी शिक्षण महर्षी ज्योतिराव फुलेंना मुंबईतील मांडावी कोळीवाडा येथे "महात्मा" पदवी देऊन त्यांच्या चाळीस वर्षाच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला होता. महात्मा ही पदवी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी ज्योतिराव फुले यांना दिली. बडोद्याचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड खुद्द क...
कामगार दिनानिमित्त सिमेन्स वर्कर्स युनियनकडून प्रेरणादायी उपक्रम
News

कामगार दिनानिमित्त सिमेन्स वर्कर्स युनियनकडून प्रेरणादायी उपक्रम

कामगार दिनानिमित्त सिमेन्स वर्कर्स युनियनकडून प्रेरणादायी उपक्रमगौरव प्रकाशन ठाणे, (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सिमेन्स वर्कर्स युनियनतर्फे एक विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सिमेन्स वर्कर्स संघटनेचे अध्यक्ष मनोज बोडके, उपाध्यक्ष जयंतीलाल गुप्ता, सहचिटणीस भास्कर कोतवाल, सेक्रेटरी महादेव गेजगे, सांस्कृतिक विंगचे अध्यक्ष राकेश मांजरेकर, युनिट सेक्रेटरी शिनोज नायर, विश्वनाथ शिर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ठाणे विभागाचे प्रमुख नितीन पाटील, उल्हासनगर केंद्र प्रमुख वीणा तरेकर, शहाड केंद्र संचालक गजेंद्र आहेर, वर्तक नगर (ठाणे) केंद्र प्रमुख प्रवीण सकट, पनवेल केंद्र प्रमुख दयानंद कदम आणि गुणवंत कामगार अरविंद मोरे हेही उपस्थित होते.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!...
अर्ध्या तिकिटाच्या मागे पूर्ण वेदना.!
Article

अर्ध्या तिकिटाच्या मागे पूर्ण वेदना.!

अर्ध्या तिकिटाच्या मागे पूर्ण वेदना.!नेहमीप्रमाणे काल मी एस. टी.ने प्रवास करत होतो.धाराशिव ते छत्रपती संभाजी नगर या बसने मी निघालो होतो.गाडीत गर्दीही बरीच होती. कंडक्टर साहेब तिकीट काढत होते.त्यांचा चेहरा त्रासलेला होता.उन्हामुळे गडी घामाघूम झालेला होता.अधून मधून खांद्यावर टाकलेल्या रुमालाने घाम पुसत पुसत तिकीट काढण्याचे काम सुरूच होते...       गेल्या चार महिन्यापूर्वी एस. टी ने तिकीट दरात वाढ केलेली आहे.पण ही वाढ करताना एक मूर्खपणा केला आहे.आधी तिकीट दर राऊंड फिगर मध्ये असायचा.म्हणजे की जसे पंचावन्न रुपये,साठ रुपये असे..पण आता वाढ झाल्यापासून सत्तावन रुपये त्रेसष्ट रुपये असा दर लागतो.यामुळे सुट्टे पैसे यावरून भरपूर वाद होतात.आणि असा वाद घालत घालत कंडक्टर तिकीट काढत होता. बऱ्याच लोकांकडे वरचा एक रुपया दोन रुपया अशी चिल्लर नसल्यामुळे कंडक्टर वाद घालून वरचा एक दोन...
साहित्य सन्मानाचा मुकूट सजला – शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर
News

साहित्य सन्मानाचा मुकूट सजला – शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर

साहित्य सन्मानाचा मुकूट सजला – शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीरगौरव प्रकाशन येवला, (प्रतिनिधी) – पिंपळगाव जलाल (ता. येवला) येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार २०२५ चे निकाल कामगार दिनाचे औचित्य साधून दि. १ मे रोजी जाहीर करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संजय वाघ यांनी ही माहिती दिली.या चौथ्या वर्षीच्या पुरस्कार स्पर्धेसाठी राज्यभरातून साहित्यिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण १४३ साहित्य कलाकृती स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये कवितासंग्रह – ७८, कथासंग्रह – २२, कादंबरी – १६, ललित लेखसंग्रह – २२ तसेच इतर ५ प्रकारांचा समावेश होता. परीक्षकांच्या परीक्षणानंतर प्रत्येक प्रकारातील एक उत्कृष्ट कलाकृती निवडून प्रथम क्रमांकाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!...
प्राध्यापक नसलेला प्राध्यापक सुदर्शन जैन !
Article

प्राध्यापक नसलेला प्राध्यापक सुदर्शन जैन !

प्राध्यापक नसलेला प्राध्यापक सुदर्शन जैन !लेखाचे शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित नवल वाटेल. पण ती वस्तुस्थिती आहे. हा माणूस आहे खरा आहे उद्योजक .पण प्राध्यापकाच्या ठिकाणी अपेक्षित सर्व गुण त्याच्या ठिकाणी आहेत आणि आणि म्हणूनच अमरावतीच्या सामाजिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये या माणसाचे चांगले नाव आहे. खऱ्या अर्थाने भगवान महावीराचा संदेश केवळ अमरावतीतच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये पोहोचण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे.   सुदर्शन जैन हे नाव आता अमरावतीकरांना अपरिचित राहिलेले नाही. तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर त्यांची भव्य दिव्य अभ्यासिका व ग्रंथालय पाहून तुम्ही चकित व्हाल. स्वतंत्र मजल्यावर मोठ्या सभागृहामध्ये त्यांचे ग्रंथालय व अभ्यासिका आहे. मुद्दाम त्यांनी ती घराच्या वरच्या म...
‘कामगाराच्या श्रमाला तोड नाही’
Article

‘कामगाराच्या श्रमाला तोड नाही’

'कामगाराच्या श्रमाला तोड नाही'"श्रम हे भांडवलाच्या आधीचे आणि तसेच स्वतंत्र आहे. भांडवल हे केवळ श्रमाचे फळ आहे आणि जर श्रम आधी अस्तित्वात नसते तर ते कधीही अस्तित्वात आले नसते. श्रम हे भांडवलापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते अधिक उच्च विचारास पात्र आहे. - अब्राहाम लिंकन"आज जिकडे तिकडे सहज नजर टाकली तर आपल्याला सर्वत्र मोठं मोठ्या इमारती, पुल, फ्लाय ओव्हर, मॉल व भव्यदिव्य इमारती दिसतात. विमानतळांची, रेल्वे स्थानकांची संख्या व विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याचा आढळतो आहे. कुठल्याही शहरात प्रवेश करतांना आपल्याला बायपास तर मोठ्या शहरात एक्सप्रेस वे दिसतो. प्रवास करतांना मग रेल्वे, बस, कार, आणि विमानातून असो आपल्याला सर्व शेती अगदी हिरवीगार पिकांसह डोलतांना आढळते. हे सर्व चित्र बघितल्या नंतर असं वाटत की ह्या पृथ्वीतलावर नंदनवन थाटलेले आहे आणि ही पृथ्वी सुजलाम सुफलाम आहे. सर्व नागरिक अगदी आनंदाने ...