📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

कामगार दिनानिमित्त सिमेन्स वर्कर्स युनियनकडून प्रेरणादायी उपक्रम

On: May 11, 2025 7:11 AM
आम्हाला फॉलो करा:
कामगार दिनानिमित्त सिमेन्स वर्कर्स युनियनकडून प्रेरणादायी उपक्रम

कामगार दिनानिमित्त सिमेन्स वर्कर्स युनियनकडून प्रेरणादायी उपक्रम

गौरव प्रकाशन ठाणे, (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सिमेन्स वर्कर्स युनियनतर्फे एक विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सिमेन्स वर्कर्स संघटनेचे अध्यक्ष मनोज बोडके, उपाध्यक्ष जयंतीलाल गुप्ता, सहचिटणीस भास्कर कोतवाल, सेक्रेटरी महादेव गेजगे, सांस्कृतिक विंगचे अध्यक्ष राकेश मांजरेकर, युनिट सेक्रेटरी शिनोज नायर, विश्वनाथ शिर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ठाणे विभागाचे प्रमुख नितीन पाटील, उल्हासनगर केंद्र प्रमुख वीणा तरेकर, शहाड केंद्र संचालक गजेंद्र आहेर, वर्तक नगर (ठाणे) केंद्र प्रमुख प्रवीण सकट, पनवेल केंद्र प्रमुख दयानंद कदम आणि गुणवंत कामगार अरविंद मोरे हेही उपस्थित होते.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नितीन पाटील यांनी कामगार कल्याण मंडळाच्या उपक्रमांची माहिती देत कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. त्यानंतर गजेंद्र आहेर यांनी मंडळाच्या शैक्षणिक, क्रीडा, शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक अनुदान, साहित्य संमेलन व इतर योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.

गुणवंत कामगार अरविंद मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “श्रम आणि भांडवल यांची सांगड घालून देशाचा विकास होतो. उद्योगधंद्यांमध्ये कामगारांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.” त्यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने राबवलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करत कामगार कल्याणासाठी त्यांचा मोलाचा वाटा अधोरेखित केला. तसेच, त्यांनी आपल्या स्वयंलिखित कुतूहलाचा करिश्मा या पुस्तकाची प्रती सिमेन्स वर्कर्स युनियन व मंडळास भेट म्हणून दिली.

कार्यक्रमात महेश शिखरे व भूषण पाटील यांनी कामगार जीवनावर आधारित कविता सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमोल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले, तर आभार प्रदर्शन विश्वनाथ शिर्लेकर यांनी केले.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

RailOne App द्वारे जनरल रेल्वे तिकीट बुकिंगवर भारतीय रेल्वेने सवलतीची मुदत वाढवली

जनरल रेल्वे तिकीट बुकिंगवर सूट कायम, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा.!

NEET UG 2026 Result Aryan Gupta Panshul Bansal Topper Medical Entrance Exam Marathi News

NEET UG 2026 निकाल जाहीर! आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल देशात अव्वल, 11.21 लाख विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेशाचा मार्ग मोकळा

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील नव्या खुलाशाची प्रतीकात्मक छायाचित्र - स्लो पॉयझन कट आणि जपानी व्हिडिओ तपास

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा! ‘स्लो पॉयझन’चा कट, चौकशी टाळण्यासाठी पाहिला जपानी व्हिडिओ.!

यवतमाळ येथे सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देत संविधान चौकात विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक संघटनांचे धरणे आंदोलन

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला यवतमाळचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक संघटनांचा हुंकार

तिवसा येथे बोगस बियाणे प्रकरणावर झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख भरपाईची मागणी

तिवसात बोगस बियाण्याचा फटका! बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख भरपाईची जोरदार मागणी

NEET पेपरफुटीविरोधातील उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानंतर दिल्ली हायकोर्टाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली.

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली; दिल्ली हायकोर्टाची केंद्र व दिल्ली सरकारला नोटीस

Leave a comment