📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

साहित्य सन्मानाचा मुकूट सजला – शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर

On: May 10, 2025 5:53 PM
आम्हाला फॉलो करा:
"येवल्यात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा: अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड"

साहित्य सन्मानाचा मुकूट सजला – शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर

गौरव प्रकाशन येवला, (प्रतिनिधी) – पिंपळगाव जलाल (ता. येवला) येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार २०२५ चे निकाल कामगार दिनाचे औचित्य साधून दि. १ मे रोजी जाहीर करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संजय वाघ यांनी ही माहिती दिली.

या चौथ्या वर्षीच्या पुरस्कार स्पर्धेसाठी राज्यभरातून साहित्यिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण १४३ साहित्य कलाकृती स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये कवितासंग्रह – ७८, कथासंग्रह – २२, कादंबरी – १६, ललित लेखसंग्रह – २२ तसेच इतर ५ प्रकारांचा समावेश होता. परीक्षकांच्या परीक्षणानंतर प्रत्येक प्रकारातील एक उत्कृष्ट कलाकृती निवडून प्रथम क्रमांकाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे –

  • कवितासंग्रह : “जामिनावर सुटलेला काळा घोडा” – कवी धनाजी धोंडीराम घोरपडे, वाळवा, जि. सांगली
  • कथासंग्रह : “कोंडमारा” – डॉ. अनंता सूर, वणी, जि. यवतमाळ
  • कादंबरी : “घरंगळण” – डॉ. भीमराव वाघचौरे, वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर
  • ललित लेखसंग्रह : “काळीजफुल” – मा. वर्षा किडे-कुळकर्णी, हिंगणा रोड, नागपूर

या कलाकृतींच्या परीक्षणासाठी प्रतिष्ठित साहित्यिक परीक्षकांची निवड करण्यात आली होती. परीक्षक म्हणून प्रा. रामप्रसाद वाव्हळ (परभणी) – कवितासंग्रह, प्रा. सुवर्णाताई चव्हाण (येवला) – कथासंग्रह, डॉ. भाऊसाहेब गमे (प्राचार्य, येवला महाविद्यालय) – कादंबरी, व डॉ. धीरज झाल्टे (नाशिक) – ललित लेखसंग्रह यांनी जबाबदारी पार पाडली.

प्रतिष्ठानने सर्व परीक्षकांचे आभार मानत पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

या विजयी साहित्यिकांचा राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार वितरण सोहळा दि. ४ जून २०२५ रोजी पिंपळगाव जलाल (ता. येवला) येथे पार पडणार असून, त्यावेळी त्यांचा औपचारिक सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष श्री. संजय वाघ यांनी दिली.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!

Leave a comment