Monday, March 9

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
ChatGPT वर केली मजा, पण झाली सजा ! शाळेतून थेट तुरुंगात रजा!
News

ChatGPT वर केली मजा, पण झाली सजा ! शाळेतून थेट तुरुंगात रजा!

ChatGPT वर केली मजा, पण झाली सजा ! शाळेतून थेट तुरुंगात रजा!फ्लोरिडा (अमेरिका) तंत्रज्ञानाच्या युगात ‘हुशारी’ दाखवायची हौस एका १३ वर्षांच्या मुलाला तुरुंगाच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन गेली आहे. “मी माझ्या मित्राला कसा मारू शकतो?” असा प्रश्न त्या मुलाने ChatGPT वर टाईप केला आणि पुढच्या काही मिनिटांतच शाळेत पोलिस दाखल झाले.डेलँड शहरातील साऊथ वेस्टर्न मिडिल स्कूल मध्ये घडलेल्या या प्रकाराने शाळा प्रशासन आणि पालक दोघांनाही हादरवून सोडलं आहे. शाळेच्या डिजिटल मॉनिटरिंग सिस्टीमने हा प्रश्न पकडला आणि ताबडतोब प्रशासन व पोलिसांना अलर्ट पाठवला.तपासानंतर मुलाने सांगितले की तो फक्त ‘मजेत’ करत होता आणि आपल्या मित्राला चिडवण्यासाठी ChatGPT काय उत्तर देतं हे पाहायचं होतं. मात्र पोलिसांनी ही गोष्ट अजिबात हलक्यात घेतली नाही. संभाव्य धोक्याचा इशारा म्हणून त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन बाल सुधारगृ...
प्रिय वरुण… वसुंधरेचं हृदयस्पर्शी पत्र; पावसाशी संवाद साधणारी धरणीमातेची कहाणी!
Article

प्रिय वरुण… वसुंधरेचं हृदयस्पर्शी पत्र; पावसाशी संवाद साधणारी धरणीमातेची कहाणी!

प्रिय वरुण… वसुंधरेचं हृदयस्पर्शी पत्र; पावसाशी संवाद साधणारी धरणीमातेची कहाणी!प्रिय वरुण,मी आता इथे आयसीयुमध्ये असताना, श्वास कोंडत असताना, तुला पत्र लिहू कि नको, या विचारात असतानासुद्धा, शेवटी माझ्या मनातल्या भावना तुझ्यापर्यंत पोचवायच्या असतील तर दुसरा पर्याय नाही. या माझ्या लेखनाने तुला काही फरक पडेल कि नाही? माहित नाही. आणि तसेही मी तुला काही सांगत असताना तू कधी काही ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नसतो, तर कधी मला जमत नाही. कधी तू ऐकून न ऐकल्यासारखं करतो. पण असो.माझ्या प्रिया, मागच्या वर्षी तू दिवाळीत आला होतास. म्हणजे धावपळीत ओझरते दर्शन देऊन गेलास. पण अहाहा! काय रम्य दिवाळी होती ती. तुला बघून मी आणि माझी मुलं किती रे सुखावून गेली. तू आलास ना तर तुझ्या प्रेमळ स्पर्शाने आणि मायेने आम्हांला तसं फील होतंच. परत लवकरच येतो, असं सांगून तू गेलास, नाताळ संपून नवे वर्ष सुरु झाले. कडाक्याची...
बँकेत ठेवला चेक… आणि तोच झाला ‘चोरांचा बोनस’! सोलापुरात शेतकऱ्याला ४ लाखांचा फटका, CCTVने उघड केला कलियुगाचा खेळ!
News

बँकेत ठेवला चेक… आणि तोच झाला ‘चोरांचा बोनस’! सोलापुरात शेतकऱ्याला ४ लाखांचा फटका, CCTVने उघड केला कलियुगाचा खेळ!

बँकेत ठेवला चेक… आणि तोच झाला ‘चोरांचा बोनस’! सोलापुरात शेतकऱ्याला ४ लाखांचा फटका, CCTVने उघड केला कलियुगाचा खेळ!सोलापूर : "बँक म्हणजे सुरक्षितता" असं म्हणतात, पण आता बँकेचे ड्रॉप बॉक्सही चोरट्यांच्या हाती खेळण्यासारखे झाले आहेत! सोलापुरातील एका शेतकऱ्याचा चार लाख रुपयांचा चेक बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतूनच चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.सोयाबिन विकून कंपनीकडून मिळालेला ₹४ लाखांचा चेक बँकेत जमा करण्यासाठी शेतकरी गेला. काही दिवसांनी खात्यात पैसे जमा झाले नाहीत, म्हणून तपास घेतल्यावर धक्काच बसला “खात्यात पैसेच नाहीत!”चौकशी दरम्यान समजलं की, ड्रॉप बॉक्समध्ये टाकलेला तोच चेक एका हुशार चोरट्याने "स्लिपमध्ये दुरुस्ती"च्या बहाण्याने बाहेर काढला आणि दुसऱ्याच खात्यावर वटवला! बँकेने सुरुवातीला शेतकऱ्याचाच दावा फेटाळला, पण CCTV फुटेजने सत्य उघड केलं.या प्रकार...
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस! ४७१ कोटींची लॉटरी, पण आंदोलनाचं दिवा विझेल?
News

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस! ४७१ कोटींची लॉटरी, पण आंदोलनाचं दिवा विझेल?

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस! ४७१ कोटींची लॉटरी, पण आंदोलनाचं दिवा विझेल?मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीच गोड बातमी आली आहे. एकीकडे १३ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा बिगुल फुंकला असतानाच सरकारने ४७१.०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार वेळेत देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे एसटीच्या तब्बल ८३ हजार कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीपूर्वीच आनंदाची लखलख झळकली आहे.पगारासोबतच आता महामंडळाने कर्मचाऱ्यांना "सण उत्सव अग्रीम" उचल देण्याची घोषणा केली आहे. या योजनेनुसार इच्छुक कर्मचाऱ्यांना ₹१२,५००/- पर्यंतची उत्सव अग्रीम रक्कम मिळणार आहे. मात्र, यासाठी काही अटी आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ₹४३,४७७/- पेक्षा जास्त आहे, त्यांना ही अग्रीम रक्कम मिळणार नाही. तसेच, ज्यांची सेवानिवृत्ती पुढील १० महिन्यांत होणार आहे, त्यांना या योजने...
मराठीची उंची मोठी करूया!
Article

मराठीची उंची मोठी करूया!

मराठीची उंची मोठी करूया!मराठी भाषेकडे लक्ष द्या अशी विनंती करण्याची गरज आज आपल्या सर्वांवर आली आहे. मराठी भाषा मोठी आहे ही बाब सिद्ध करण्याची गरज नसताना आज मोठ्याने ठासून सांगावे लागत आहे की मराठी भाषेला समृद्ध करा. हे आपले किती मोठे दुर्दैव? आपलीच भाषा आज आपल्यासाठी परकी झाली आहे नव्हे ती आपणच परकी करून टाकली मराठी भाषा इतकी समृद्ध असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी कित्येक वर्ष करावी लागली. पुरावे सादर करावे लागले.मराठी भाषेची प्राचीनता व साहित्य समृद्ध असताना देखील राजकीय अनास्तेपायी व मराठी भाषिकांच्या अनास्थेपायी मराठी भाषेवर अवकळा आली आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत एकनाथ या संतांसह अनेक मराठी साहित्यिकांनी एवढे मोठे काम करून ठेवले आहे की ते साऱ्या जगाने पाहावे.मराठी साहित्याचा इतिहास साधारणपणे १० व्या शतकापासून सुरू होतो, जेव्हा प्राकृत भाषेच्या...
‘झुंड’नं दिलं नाव, पण आयुष्याने मारलं ‘फाऊल’; बाबू छत्रीच्या हत्येनं हादरलं नागपूर!
News

‘झुंड’नं दिलं नाव, पण आयुष्याने मारलं ‘फाऊल’; बाबू छत्रीच्या हत्येनं हादरलं नागपूर!

‘झुंड’नं दिलं नाव, पण आयुष्याने मारली ‘फाऊल’; बाबू छत्रीच्या हत्येनं हादरलं नागपूर!नागपूर : सिनेमात ‘झुंड’चा खेळ खेळणारा अभिनेता, पण वास्तवात मात्र आयुष्याच्या खेळात पराभूत झाला. ‘झुंड’ फेम प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीचा निर्घृण खून करण्यात आल्याने नागपूर हादरलं आहे. ७ ऑक्टोबरच्या रात्री जरीपटका परिसरात ही थरारक घटना घडली.पोलिसांना प्रियांशू अर्धनग्न अवस्थेत तारेनं बांधलेला आणि गंभीर जखमी अवस्थेत सापडला. त्याच्या शरीरावर चाकूचे अनेक वार होते. तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयित लालबहादुर साहू याला अटक केली आहे. तपास सुरू आहे. प्रियांशू क्षत्रिय हा नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटात छोट्या पण ठसठशीत भूमिकेत झळकला होता. ‘बाबू छत्री’ या नावाने तो चर्चेत आला. पण प्रसिद्धीच्या प्...
अभिनेता व्हायचं होत, पण झाला ‘लोकलचा रणबीर’! अपंग बनून मुंबई लोकलमध्ये केला सुपरहिट परफॉर्मन्स!
News

अभिनेता व्हायचं होत, पण झाला ‘लोकलचा रणबीर’! अपंग बनून मुंबई लोकलमध्ये केला सुपरहिट परफॉर्मन्स!

अभिनेता व्हायचा होत, पण झाला ‘लोकलचा रणबीर’! अपंग बनून मुंबई लोकलमध्ये केला सुपरहिट परफॉर्मन्स!मुंबई म्हणजे स्वप्ननगरी — पण इथं स्वप्नं पूर्ण व्हायच्या आधीच अनेक जण ‘नाटकात’ अडकतात! अशाच एका तरुणाने अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट लोकल ट्रेनलाच आपलं फिल्म सेट बनवलं.हा तरुण लोकलमध्ये पाय निकामी असल्याचं नाटक करत भीक मागत होता. मोठं शर्ट घालून, पाय दडवून तो सरपटत प्रवाशांकडे मदत मागत होता. सगळ्यांना त्याची दया आली… पण काही क्षणांनीच सगळ्यांचा धक्का बसला! डब्यातून बाहेर पडताच तो ‘अपंग’ तरुण चक्क आपल्या दोन पायांवर ठणठणीत चालू लागला. आणि लगेच दुसऱ्या डब्यात घुसून पुन्हा ‘अभिनय सुरू’ केला.हा व्हिडीओ “goga_ga” या इन्स्टाग्राम पेजवर शेअर झाल्यानंतर इंटरनेटवर तुफान गदारोळ माजलाय. आतापर्यंत १४ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. नेटिझन्सच्या प्रतिक्रिया म्हणजे एकदम...
विकसित भारताचं नवं उड्डाण, नवी मुंबई विमानतळाचं मोदींकडून उद्घाटन; भूमिपुत्र दि. बा. पाटलांना आदरांजली!
News

विकसित भारताचं नवं उड्डाण, नवी मुंबई विमानतळाचं मोदींकडून उद्घाटन; भूमिपुत्र दि. बा. पाटलांना आदरांजली!

विकसित भारताचं नवं उड्डाण, नवी मुंबई विमानतळाचं मोदींकडून उद्घाटन; भूमिपुत्र दि. बा. पाटलांना आदरांजली!नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भव्य उद्घाटन आज पार पडलं. या ऐतिहासिक क्षणी मोदींनी महाराष्ट्राचे सुपुत्र आणि जननेते दि. बा. पाटील यांचं नाव घेत त्यांना अभिवादन केलं. “दि. बा. पाटील यांनी सेवाभावाने समाजकार्य केलं, त्यांचं जीवन सर्वांना प्रेरणा देणारं आहे,” असे भावनिक शब्द मोदींनी उच्चारले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोदींनी मराठीतून शुभेच्छा देत म्हणाले, “विजयादशमी झाली, कोजागिरी पौर्णिमा झाली आणि आता दहा दिवसांनी दिवाळी — तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!” त्यानंतर त्यांनी मुंबई व महाराष्ट्राच्या विकासाचा गौरव करत म्हटलं, “आज मुंबईची दीर्घ प्रतिक्षा संपली आहे. मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळालं आहे. हे एअरपोर्ट आशियात...
लोकशाही व संविधानावर हल्ला : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूटफेक प्रकरणाने देशभर संताप
Article

लोकशाही व संविधानावर हल्ला : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूटफेक प्रकरणाने देशभर संताप

लोकशाही व संविधानावर हल्ला : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूटफेक प्रकरणाने देशभर संतापभारताच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान भूतो न भविष्यती अशी घटना घडली. जी अतिशय निंदनीय असून या घटनेचा संपूर्ण देशातून निषेध केला जात आहे.सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान राकेश किशोर या वकिलांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी ६/१०/२५ रोजी दुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली .न्यायालयातील सुरक्षकारक्षकानी प्रसंगावधान राखत या वकिलास सरन्यायाधीशांवर हल्ला करण्यापासून रोखलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही घटना अतिशय निंदनीय असून न्यायालयाच्या सुरक्षितता धोक्यात आणणारी आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न हा न्यायालयाच्या इमारतीचे संरक्षण, न्यायाधीशांची वैयक्तिक सुरक्षा आणि न्यायालयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आवश्...
शिवसेना पक्ष चिन्ह वाद: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली; १२ नोव्हेंबरला होणार अंतिम युक्तिवाद
News

शिवसेना पक्ष चिन्ह वाद: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली; १२ नोव्हेंबरला होणार अंतिम युक्तिवाद

शिवसेना पक्ष चिन्ह वाद: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली; १२ नोव्हेंबरला होणार अंतिम युक्तिवादनवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह “धनुष्यबाण” यावरील मालकी हक्काच्या वादावर आज, मंगळवार (८ ऑक्टोबर २०२५) रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद सुरू केला. मात्र, काही कारणांमुळे आजची सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही आणि अखेर न्यायालयाने ही सुनावणी १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल असे जाहीर केले.सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत होणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकर लागणे आवश्यक आहे.” त्यांनी आपल्या युक्तिवादासाठी किमान ४५ मिनिटांचा वेळ देण्याची विनंती केली. तथापि, दुसऱ्या बाजूच्या वकिलांच्या वारंवार हस...