Wednesday, April 15

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Story

अधुरा न्याय…!

आज त्या अधिका-याजवळ भरपूर मालमत्ता होती. सर्व मालमत्ता ही भ्रष्टाचारानं मिळविलेली. त्याला सर्व कर्मचारी घाबरत होते. कारण तो गुंड्यांसारखी त्या कर्मचा-यांकडून खंडणी वसूल करायचा. एखाद्या कर्मचा-यांनं खंडणी न दिल्यास त्याला भयंकर त्रास दिला जाई. त्यांचा पगारही अनिश्चीत कालावधीसाठी बंद केला जाई. तसेच त्याच्या बढत्या, वरीष्ठ श्रेण्याही बंद केल्या जाई. तसा तो जाणूनबुजून कोणाच्याही वाट्याला जात असे. त्यात त्याला मजा वाटायची. नव्हे तर न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर अशा कर्मचा-यांकडून मिळालेल्या खंडणीतील दहा टक्के भाग इतर कोर्ट व पोलिसस्टेशनच्या कामासाठी तो अधिकारी खर्च करीत असे. हा त्याचा व्यापार जरी असला तरी त्याला व्यापार म्हणून सिद्ध करता येत नव्हतं. तो न्यायालयातील कमरा. सुहास पाय-या चढून तिथं आला होता. त्याला धाप लागली होती. कारण तो कमरा फारच उंचावर होता. त्यामुळं त्याला पाय-या चढाव्या लागल्...
Story

सतर्क

शैलाकाकू व मंदा वहिनी भिकाऱ्याला जेवण द्यायला निघाल्या. रात्रीचे आठ वाजले होते. रस्ता ओलांडताच समोर भिकारी बसलेलाच होता. दोघींनी आणलेले जेवण त्या भिकाऱ्याच्या पुढ्यात ठेवले. त्याला बोललेले काही समजत नव्हते. त्यावरून तो मुका किंवा बहिरा असण्याची शंका वाटत होती. जेवण देऊन दोघी मागे वळणार एवढ्यात राजे वाहिनी समोर आल्या. म्हणून शैलाकाकू व मंदावहिनी तिथेच उभ्या राहिल्या. " काय म्हणता शैलाकाकू----? बऱ्याच दिवसांनी दिसली तुमची जोडी----" राजे वाहिनी हसत हसत म्हणाल्या. " नाही हो---आम्ही तर हा भिकारी आल्यापासून रोज येतो या भिकाऱ्याला जेवण द्यायला---" शैलाकाकू म्हणाल्या. " बरं आहे या भिकाऱ्याचे---मी रोज बघते या भिकाऱ्याला---कधी इकडे तर कधी आमच्या इथे तर कधी चहाच्या टपरीवर बसलेला असतो. काय करणार बिचारा----? लोकं रोज त्याला हाकलवून लावतात. सकाळचं जेवणाचे पाकीट एक पोलीस आणून देतो. काय क...
शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर
Article

शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर

शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या तसेच जगाच्या इतिहासात अद्वितीय व अजरामर असे स्थान आहे. मानवी जीवनाच्या अनंत पैलूचे त्यांनी निरीक्षण केले आहे. त्याच्या कार्यकर्तृत्वाने अनेकांचे प्रेरणास्थान बनले आहे.शिक्षणाचे प्रेरणास्तंभ,भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्ञानपुरुष ,निस्सीम ग्रंथप्रेमी,विचार स्वातंत्र्याचे खरे समर्थक,थोर समाज सुधारक,प्राख्यत अर्थतज्ञ, आंतरराष्ट्रीय संबंधाचे माहितगार,ऊर्जा व ज्ल संसाधनाचे नियोजक, अंधश्रद्धाचे कर्दनकाळ, सद्भावना सांप्रदायिक व सहिष्णुता प्रेरक, महिलाच्या समान हक्कासाठी संघर्षरत, शेतकरी/शेतमजूर व कामगाराच्या न्याय अधिकाराचे लढवय्ये,शांतता व अहिंसेचे समर्थक, बहुजन समाजाचे उद्धारक प्रज्ञासूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचे व व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहे.गरीब वंचित,शोषित,पीडित, महिला, कामगार आणि सर...
Story

आजही अधांतरीच..!

जिल्ह्याच्या ठिकाणावरून गावाकडे परत येत होतो.वाटेतच दिपाचे गाव लागले.गाडीचा रोख तिच्या गावाकडे वळवून दीपाच्या घरी आलो.तिच्या घराजवळ गाडी थांबताच आणि तिच्या घरात प्रवेश करताच तिला आश्चर्यचा धक्का बसला.कारण तिने वारंवार घरी येण्याचे निमत्रण देऊन सुध्दा तिच्या कडे जाण्याचा योग काही येत नव्हता.अचानक तिच्याकडे जाण्याचा योग आला.आम्ही घरात प्रवेश करताच ती करीत असलेली कामे बाजूला सारून आमचे आगत-स्वागत केले. आदर सत्कार केला.इकडील-तिकडील विचाराच्या देवाणघेवाणीनंतर तिच्या वैभवशाली घराकडे नजर फिरवून अलगदपणे विचारले की,छान संसार थाटला.चांगली प्रगती दिसतेय.तुम्ही तर चांगलाच जम बसविल आहे.शून्यातून विश्व निर्माण करून दाखविले आहे.त्यांची अल्पावधीतील प्रगती पाहून मन भरून आले.तुमच्या कर्तृत्वला दाद द्यावी लागेल.खरोखर तुम्ही ग्रेट आहात.ममतेचा सागर आहात. प्रेमविवाह करणाऱ्यां जोडप्यासाठी खरा आदर्श आहात.असे बोलत...
आंबेडकरी चळवळीला गतिमानतेची गरज
Article

आंबेडकरी चळवळीला गतिमानतेची गरज

आंबेडकरी चळवळीला गतिमानतेची गरजभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सर्वव्यापक नेते होते.विषमतावादी समाज रचना असलेल्या बहुजन समाजातील शोषित,पिडित,उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले महान कार्य अद्वितीय आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी कडवी झुंज देत देश-परदेशात उच्च शिक्षण घेतले. अगाध बुद्धिमत्तेचा परिचय देत देश-विदेशातील शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटविला. डॉ.आंबेडकर ज्ञानी होते.त्याची विद्वत्ता अद्वितीय होती.प्रखर देशभक्त,अंधश्रद्धेचे विरोधक,विज्ञाननिष्ठ, शिक्षणक्षेत्राचे प्रेरणास्रोत, संविधानाचे शिल्पकार,विचार स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते,बहुजन समाजाचे कैवारी, सांप्रदायिक सद्भावना,सहिष्णुतेचे प्रेरक, महिला सक्षमीकरणाचे कट्टर समर्थक, आर्थिक-सामाजिक व राजकीय विचारवंत,आंतरराष्ट्रीय संबंधाचे जाणकार, झुंजार पत्रकार,संपादक,लेखक लो...
स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
Article

स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..! बैठय़ा कामाचं वाढतं प्रमाण, व्यायामाचा अभाव तसंच आहारातील बदल या प्रमुख कारणांमुळे अलिकडेस्थूलतेची समस्या वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. खरं तर स्थूल असण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. अनेक प्रकारचे कॅन्सर, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कोलेस्ट्रोल अशा अनेक विकारांचं मूळ स्थूलपणात आहे. भारताबद्दल बोलायचं तर सर्वच वयोगटात स्थूलतेचं प्रमाण वेगाने वाढतंय. जवळपास ३0 लाख भारतीय स्थूलतेने ग्रस्त आहेत. पुढच्या पाच वर्षात हे प्रमाण दुपटीनं वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याबाबत केलेल्या एका संशोधनात जगभरात दर वर्षी पाच लाख लोकांना स्थूलतेमुळे कॅन्सरची लागण होत असल्याचं आढळलं.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाया संशोधनात १८४ देशांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार २0१५ मध्ये तीन लाख ४५ हजार महिलांना स्थूलतेमुळे कॅन्सर झाला. पुरूषां...
नसाब एक परंपरा…!
Article

नसाब एक परंपरा…!

नसाब एक परंपरा...!चोहीबाजूने डोंगरपायथ्याशी वसलेले यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील अंदाजे 4000 हजार लोकसंख्या असलेले करजगांव. गावातील बंजारा समाजातील आदर्श परंपरा म्हणजेच ‘नसाब’ होय. यवतमाळ जिल्ह्याला नक्षलग्रस्त, आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या याच यवतमाळ जिल्ह्याने याच जिल्ह्यातील बंजारा समाजाने महाराष्ट्राला दोन माजी मुख्यमंत्री म्हणून हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक साहेब, कै. सुधाकररावजी नाईक साहेब, राज्यपाल म्हणून कै. सुधाकररावजी नाईक, मा. मनोहरराव नाईक अन्न व शिक्षण मंत्री, संजयभाऊ राठोड वनमंत्री, इत्यादी मंत्री दिलेत याचा आम्हास आज गौरव वाटतो.हे वाचा – आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केलं.?बंजारा समाजातील तांड्यातील नायक, कारभारी, असामी व गावातील प्रतिष्ठीत नागरीक यांचा जमलेला एक प्रकारचा समन्वय म्हणजेच ‘नसाब’..! आपल्या तांड्यात कोणत्याही प्रकारचे छोटे...
Article

प्राधान्यक्रम महिला व बालकांच्याविकासाला…

- ॲड. यशोमती ठाकूर, मंत्री, महिला व बालविकासमहाराष्ट्राने सामाजिक, आर्थिक, राजकीय आदी क्षेत्रातील सुधारणांद्वारे देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. या विभागाची मंत्री म्हणून पदभार घेतानाच महिला आणि बालकांचा विकास हा विषय जिल्हास्तरावरच नव्हे तर राज्यातील प्रत्येक विभागाच्या प्राधान्यक्रमावर आणणे हे उद्दीष्ट मी बाळगले आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरात नियोजनबद्ध कामही सुरू आहे. ‘सक्षम महिला, सुदृढ बालक आणि सुपोषित महाराष्ट्र’ या संकल्पाच्या पूर्तीसाठी राज्यातील सर्वच घटकांच्या सहकार्याने राज्य शासन म्हणून आम्ही ठळक असे काम निश्चितच करुन दाखवू. कोविडच्या रुपाने एक मोठे संकट आपल्या समोर उभे असताना आपण सर्वचजण त्याला धैर्याने तोंड देत आहोत. राज्य शासनाने या कालावधीत जनतेचीआरोग्य सुरक्षा तसेच विविध समाजघटकांना दिलासा देण्याच्यादृष्टीनेवेळोवेळी आढावा घेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मुख्य...
Story

प्राक्तन

दोन दिवस लेकराचा ताप उतरेल म्हणून तिने वाट पाहिली. पण ताप काही केल्या हटत नव्हता. तेव्हा तिने कामावरून परतताच बाळाला पदराआड गुंडाळले आणि गाडीतळावर जाऊन उभी राहिली. कुणाची बैलगाडी तरी मिळेल या आशेवर होती ती! पण तिचे दुर्दैव की कोणाचीही बैलगाडी आली नाही. पदराखाली गुंडाळलेले लेकरू तापाच्या भरात बरळू लागले तसे सगुणाने चालत दवाखाना गाठण्याचे ठरविले नि ती झपझप चालू लागली. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. अंधार मी म्हणत होता. पण बाळाच्या स्वास्थ्यापायी तिला कशाची तमा नव्हती. निर्भय बनून सगुणा रस्ता कापत होती. दिवसभर तिच्या पोटात अन्नाचा एकही कण गेला नव्हता. बाळाच्या काळजीने तिने दुपारचा डबाही खाल्ला नव्हता. मालकाकडून तिने थोडीशी उचल आणली होती. पण ते पैसे देताना मालकाने तिच्या चार पिढ्यांचा उद्धार केला होता पण आज सर्व ऐकून घेण्यावाचून तिच्याकडे ...
Article

सिकलसेल एक अनुवंशिक आजार : नियं‍‍त्रित करण्यास तरुणांचे सहकार्य अपेक्षित

 सिकल सेल या आजाराचा शोध अमेरिकेच्या जेम्स बी हेरीक यांनी 1910 साली लावला. सिकलसेल हा अनुवंशिक आजार असून पूर्व विदर्भात या आजाराचे लक्षणीय प्रमाण आहे. हा आजार आई-वडिलांपासून मुलांना होतो. आणि एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतो. महाराष्ट्रात अनुसुचित जाती आणि जमातीच्या लोकांमध्ये या आजाराचे लक्षणीय प्रमाण आहे. रक्तातील लाल रक्तपेशी गोल आकाराच्या असतात. जेव्हा लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबीन मधील ग्लुटॅमिक ॲमिनो ॲसिडच्या ऐवजी व्हॅलिन ॲमिनो ॲसिड येतो, तेव्हा गोलाकार रक्तपेशीचा आकार बदलून वक्राकार किंवा विळ्यासारखा आकार तयार होतो. विळ्यालाच इंग्रजी भाषेत “ सिकल ” असे म्हणतात आणि “सेल“ म्हणजे पेशी त्यामुळे उद्भवणाऱ्या रोगाला “सिकलसेल ”  आजार असे म्हणतात.सिकलसेल आजाराच्या विशिष्ट जाती आणि धर्माशी संबंध नाही गर्भधारणेच्या माध्यमातून सिक...