वृक्षमहिमा
वृक्षवल्लीदेती,
सुवासिक फुले!
पक्षांना आसरा,
सुमधुर फळे!!
उन्हाळ्यात गर्द छाया
शेकोटी थंडीची!
पावसाचे पाणी मिळे
धुप थांबे जमिनीची!!
आजारात वनौषधी,
अन्न मिळे साऱ्यासाठी!
शेतीसाठी औतभांडी,
दारे खिडक्या घरासाठी!!
प्राणवायू निर्मितीचा
असे कारखाना!
आजन्म मानवाच्या
लाभ त्याचे नाना!!
मोल जाणूनी वृक्षांचे
बोल ध्यानी धरू!
मिळुनिया सारे
वनरक्षण करु!!
वृक्षतोड थांबवूया
नवी झाडे लावूया!
पर्यावरण रक्षिण्या
सारे सज्ज होऊया!!
-प्रा. रमेश वरघट
आदर्श पर्यावरण शिक्षक
करजगाव