📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

घराच्या उंबरठ्यावर सुखाची जत्रा 

On: September 21, 2024 5:09 AM
आम्हाला फॉलो करा:
घराच्या उंबरठ्यावर सुखाची जत्रा 
गोष्ट मे महिन्यातील आहे.रविवारचा दिवस होता.सकाळी सकाळी नऊ वाजता बायकोला घेऊन भाजी आणायला गावात चाललो होतो. मोटारसायकलवर आम्ही निघालो होतो.
आणि हिने मागून बडबड सुरु केली. “ जरा जीवाला चैन नाही माझ्या.जरा जरा म्हणून काही चव नाही आयुष्यात.नुसतं घर घर करून जीव आंबून चाललाय.” मी गाडी थांबवून म्हणलं “काय झालं सकाळी सकाळी.का चिडली आहेस.?” तर हीचे डोळे भरलेले.मी परत विचारलं, “ बोल काय हवंय तुला..?”  भेळ पाणीपुरी तिला आवडतं.म्हणलं खायची का भेळ..?तर म्हणाली “हितं खाऊन काय करू..?” मी म्हणलं मग कुठ खायची आता..? तर म्हणली, “पुण्याच्या सारस बागेत नवऱ्यासोबत भेळ खायची माझी लै इच्छा होती आयुष्यात.”
“पण तुम्ही सतत कार्यक्रमात.सतत चळवळीत.आता पोरं पण मोठी व्हायला लागली.सगळा रंगच गेला माझ्या आयुष्यातला.चला वांगी घेऊ भरलेली वांगी करते.”
    मी किक मारली.गाडी सुरू केली.ती मागे बसलेली होती.गाडी सरळ एस.टी.स्टँडवर आणली.पार्किंगमध्ये गाडी लावली.तसं ही म्हणाली, “ इकडं कशाला आणलं.?” मी शांतपणे म्हणलं आता काहीच बोलू नकोस.माझ्या सोबत शांतपणे चल.” पोरं घरात होती.त्यांना सुट्ट्या सुरू होत्या.आई वडील असल्यामुळे पोरांची चिंता नव्हती.
    समोर कवठेमहांकाळ ते स्वारगेट ही साडे नऊ ची एस. टी.उभी होती.मी हीचा हात धरला आणि थेट एस. टी.बसलो.ही लागली ओरडायला. “ काय चाललंय हे.मूर्खपणा नुसता . चला घरी.”
त्यावर मी म्हणलं.आज काही झालं तरी सारस बागेतच तुला भेळ खायला घालणार. त्यावर ती घाबरली.आणि गाडीतून झटकन खाली उतरली.मी पळत खाली उतरून तिचा हात धरला.म्हणलं “हे बघ घरात काही अडचण नाही.आई आण्णा आहेत पोरांजवळ मी सांगतो त्यांना काय असेल ते.तू शांत रहा” खूप विनवण्या करून तिला गाडीत आणून बसवलं.
घरी आईला फोन करून आईला जे काही सांगायचं ते सांगितलं.
     स्वारगेट चे तिकीट काढले.प्रवास सुरू झाला.सायंकाळी पाच वाजता आम्ही सारस बागेत होतो.हातात भेळ होती.मी तिला भरवत होतो.तिथं बसलेल्या एका कॉलेजच्या पोराला आमचा फोटू काढायला लावला.मी तिला हाताने भेळ भरवली.एक तास थांबलो.परत काही काळ पुण्यात चालत हिंडलो. रात्रीचं जेवण केलं.आणि रात्री अकराच्या गाडीने माघारी निघालो.ते दुसऱ्या दिवशी सकाळी कवठेमहांकाळ.
    बिचारी पार थकून सुकून गेली होती.पण खुलून आणि उजळून निघाली होती.तिची मागणी फार मोठी नव्हती.फक्त ठिकाण आणि अंतर तीनशे किलोमीटर वर दूर होतं.मी फक्त मनाची तयारी करून ते अंतर आमच्या ओंजळीत भरलेलं होतं.कधी कधी संसारात असा वेडेपणा केल्याशिवाय घराच्या उंबरठयावर सुखाची जत्रा भरत नसते.
 – दंगलकार नितीन चंदनशिवे 
070209 09521

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now