📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

अमरावतीत वन्यजीवांसाठी मोठी खुशखबर! बांबू गार्डनमध्ये अत्याधुनिक बचाव व पुनर्वसन केंद्र उभारणार

On: July 14, 2026 11:33 AM
आम्हाला फॉलो करा:
अमरावतीच्या बांबू गार्डन येथे प्रस्तावित प्रादेशिक वन्यजीव बचाव, उपचार व पुनर्वसन केंद्राबाबत घोषणा

मुंबई प्रतिनिधी :

अमरावती विभागातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. अमरावतीच्या बांबू गार्डन येथे अत्याधुनिक प्रादेशिक वन्यजीव बचाव, उपचार व पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेत केली.

ही घोषणा आमदार संजय खोडके यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना करण्यात आली.

संजय खोडके यांनी विधानपरिषदेत सांगितले की, अमरावती विभागातील जंगल परिसरात अपघात, मानव-वन्यजीव संघर्ष, वन्यजीव तस्करी, विद्युत धक्का, रस्ते व रेल्वे अपघात, विहिरीत पडलेले वन्यप्राणी तसेच अनाथ पिल्ले अशा अनेक घटनांमध्ये जखमी झालेल्या वन्यजीवांवर तातडीने उपचार करण्यासाठी विभागात कोणतीही आधुनिक सुविधा उपलब्ध नाही.

सध्या अशा वन्यजीवांना उपचारासाठी नागपूर येथे हलवावे लागते. त्यामुळे उपचारात विलंब होऊन अनेक वन्यजीवांचा जीव धोक्यात येतो.

अमरावती हे अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांशी उत्तम रस्ते संपर्काने जोडलेले असल्याने संपूर्ण अमरावती महसूल विभागासाठी येथे प्रादेशिक वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्र उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह काटेपूर्णा, कारंजा-सोहोळ, ज्ञानगंगा, पैनगंगा, लोणार, इसापूर, टिपेश्वर अभयारण्य तसेच पोहरा-मालखेड वनक्षेत्रात वाढत्या वन्यजीव बचाव प्रकरणांचा उल्लेख करत त्यांनी शासनाकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, अमरावतीच्या बांबू गार्डन येथे समर्पित वन्यजीव बचाव, उपचार व पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाला आहे. शासन या प्रस्तावाबाबत सकारात्मक असून लवकरच या केंद्राला प्रशासकीय मान्यता व आवश्यक निधी देऊन उभारणीची प्रक्रिया सुरू केली जाईल.

या निर्णयामुळे अमरावतीसह विदर्भातील पाच जिल्ह्यांतील जखमी वन्यजीवांना तातडीने उपचार, सुरक्षित पुनर्वसन आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असल्याने वन्यजीव संरक्षणाला मोठे बळ मिळणार आहे.

आधी आई गमावली, आता वडिलांचेही निधन; ‘तारक मेहता’च्या बाघावर दुःखाचा डोंगर कोसळला

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!