New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

धावत्या बसमधून गुटखा थुंकायला डोकं बाहेर काढलं अन्… 17 वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

On: July 3, 2026 8:00 AM
आम्हाला फॉलो करा:
धावत्या बसच्या खिडकीतून डोकं बाहेर काढल्याने 17 वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा भीषण अपघातात मृत्यू

बेळगाव | प्रतिनिधी

धावत्या बसमधून गुटखा थुंकण्यासाठी डोकं बाहेर काढणं एका 17 वर्षीय विद्यार्थ्याच्या जीवावर बेतलं. कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील कुंदगोळ परिसरात झालेल्या या भीषण अपघातात आयटीआय शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत विद्यार्थ्याची ओळख फक्कीरेश चन्नय्या मुत्तळीमठ (वय 17, रा. शिरूर) अशी झाली आहे. तो आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. लक्ष्मेश्वर डेपोची केएसआरटीसी बस प्रवाशांना घेऊन जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

प्राथमिक माहितीनुसार, बसच्या बाजूने वाळूने भरलेली लॉरी ओव्हरटेक करत होती. त्याचवेळी फक्कीरेशने गुटखा थुंकण्यासाठी बसच्या खिडकीतून डोकं बाहेर काढलं. याच क्षणी त्याच्या डोक्याला लॉरीची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कुंदगोळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

या दुर्घटनेनंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, धावत्या वाहनातून हात, डोकं किंवा शरीराचा कोणताही भाग बाहेर काढणे किती धोकादायक ठरू शकते, याची पुन्हा एकदा जाणीव या घटनेतून झाली आहे.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

अमरावतीत काळ्या खाद्यतेलाचा पुनर्वापर करणाऱ्या हॉटेल्सवर FDA कारवाई

काळ्याकुट्ट तेलात वडे-भजे तळणाऱ्यांवर एफडीएची नजर; नियम मोडल्यास दंड, परवाना निलंबनाची कारवाई

अमरावती आदिवासी विकास विभागातील 500 कोटींच्या टेंडर प्रकरणावर विधानसभेत सुलभाताई खोडके यांनी चौकशीची मागणी केली.

अमरावती आदिवासी विभागातील 500 कोटींच्या योजना रखडल्या? विधानसभेत सुलभाताई खोडकेंची चौकशीची मागणी

कामणापूर घुसळी, काशी खेड आणि वाढोणा गावातील ग्रामस्थांचा नारगांवडी MSEB कार्यालयावर संताप व्यक्त करताना

नारगांवडी MSEB कार्यालयावर ग्रामस्थांचा संताप; ’24 तासात 12 तास वीज बंद, तरीही हजारोंचे बिल.!’

आमिर खानचा PK चित्रपट 85 कोटींच्या बजेटवर 792 कोटींची कमाई करत ठरला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर

12 वर्षांपूर्वी आमिर खानने रचला बॉक्स ऑफिसवर इतिहास! 85 कोटींच्या ‘PK’ ने कमावले तब्बल 792 कोटी रुपये

सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्या लग्नाच्या चर्चांना मामाचा दुजोरा

रजनीकांत यांच्या घरात वाजणार शहनाई? ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण काव्या मारन आणि अनिरुद्धच्या लग्नाला मामाचा दुजोरा

झारखंडच्या पाकुरमध्ये विवाहित महिला आणि तरुणाला अर्धनग्न करून गावभर फिरवल्याचा व्हायरल व्हिडिओ

‘इज्जती’च्या नावाखाली अमानुष कृत्य! विवाहित महिला-तरुणाला अर्धनग्न करून गावभर फिरवलं; व्हिडिओ व्हायरल, पोलिसांची मोठी कारवाई