📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

तुकाराम मुंढेंचा ॲक्शन मोड! शेगाव मंदिर परिसरातील प्रसाद-पेढा विक्रेत्यांवर FDA ची धडक कारवाई; मिठाईचे नमुने तपासणीसाठी जप्त!

On: June 28, 2026 11:42 AM
आम्हाला फॉलो करा:
शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरात FDA कडून प्रसाद आणि पेढा विक्रेत्यांची तपासणी करतानाचे दृश्य

भेसळीच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाचा मोठा अॅक्शन; शेगावातील हॉटेल, प्रसाद व खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ

बुलढाणा | प्रतिनिधी

राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्नसुरक्षेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. गुटखा, तंबाखू आणि हॉटेल व्यवसायांवरील कारवाईनंतर आता या मोहिमेचा फोकस धार्मिक स्थळांवरील प्रसाद व मिठाई विक्रेत्यांकडे वळला आहे.

याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत श्री गजानन महाराज मंदिर परिसरात अन्न व औषध प्रशासनाने अचानक धाड टाकत प्रसाद, पेढे आणि इतर मिठाई विकणाऱ्या दुकानांची तपासणी केली. भेसळयुक्त मिठाई विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

तपासणीदरम्यान विविध मिठाई व खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील चाचणीसाठी घेण्यात आले. तपासणीत नियमांचे उल्लंघन किंवा भेसळ आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सांगितले की, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर भेसळमुक्त अन्न विक्रीसाठी विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. धार्मिक स्थळांवरील प्रसाद, मिठाई, पाणीपुरी स्टॉल्स तसेच उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

या कारवाईनंतर शेगावातील प्रसाद विक्रेते, मिठाई दुकानदार, हॉटेल व्यावसायिक आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेतली जात आहे.

दरम्यान, यापूर्वी भिवंडीतील एका मोठ्या गोदामावरही अन्न सुरक्षा विभागाने कारवाई करत मुदतबाह्य अन्नपदार्थ पुन्हा विक्रीसाठी पाठविण्याचा प्रकार उघड केला होता. त्यामुळे राज्यभर अन्न भेसळ रोखण्यासाठी प्रशासन अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!