📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

पुन्हा एकदा नोटबंदी? २००५ पूर्वीच्या ‘महात्मा गांधी’ मालिकेतील जुन्या चलनी नोटा १ जुलैपासून सामान्य बँकांमध्ये स्वीकारल्या जाणार नाहीत.!

On: June 27, 2026 11:42 AM
आम्हाला फॉलो करा:
२००५ पूर्वीच्या महात्मा गांधी मालिकेतील जुन्या चलनी नोटांबाबत RBI चा मोठा निर्णय – १ जुलैपासून सामान्य बँकांमध्ये सुविधा बंद

मुंबई | प्रतिनिधी

देशात पुन्हा एकदा नोटबंदीची चर्चा रंगू लागली आहे. मात्र यावेळी सर्व चलनी नोटांवर बंदी नसून २००५ सालापूर्वी छापण्यात आलेल्या ‘महात्मा गांधी’ मालिकेतील (Mahatma Gandhi Series) जुन्या चलनी नोटा टप्प्याटप्प्याने चलनातून बाद करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ९ जून २०२६ रोजी देशातील सर्व बँकांच्या प्रमुखांना पाठविलेल्या परिपत्रकानुसार १ जुलै २०१६ पासून २००५ पूर्वीच्या ‘महात्मा गांधी’ मालिकेतील नोटा सामान्य बँकांमध्ये स्वीकारणे किंवा बदलून देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. आता अशा नोटा केवळ रिझर्व्ह बँकेच्या देशभरातील १९ प्रादेशिक कार्यालयांमध्येच स्वीकारल्या किंवा बदलून दिल्या जाणार आहेत.

या आदेशानंतर व्यापारी बँकांनीही आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाने १२ जून २०२६ रोजी अंतर्गत परिपत्रक जारी करून सर्व शाखा, क्षेत्रीय कार्यालये आणि करन्सी चेस्टना २००५ पूर्वीच्या नोटांबाबत कठोर सूचना दिल्या आहेत.

यामुळे आर्थिक क्षेत्रात ही प्रक्रिया म्हणजे टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणारी ‘छुपी नोटबंदी’ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोणत्या नोटा प्रभावित?

रिझर्व्ह बँकेने १९९६ मध्ये प्रथमच सर्व मूल्यांच्या चलनी नोटांवर महात्मा गांधींचे चित्र असलेली ‘महात्मा गांधी मालिका (MG Series)’ सुरू केली होती. १९९६ ते २००५ या कालावधीत छापण्यात आलेल्या नोटा आता या निर्णयाच्या कक्षेत आल्या आहेत.

यानंतर २०१६ च्या नोटाबंदीनंतर नवीन रंग, आकार आणि आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह ‘महात्मा गांधी (न्यू) सिरीज’ नोटा चलनात आणण्यात आल्या.

जुन्या आणि नवीन नोटा कशा ओळखाल?

२००५ नंतर छापलेल्या नोटांच्या मागील बाजूच्या तळाशी छपाईचे वर्ष (Year of Printing) स्पष्टपणे नमूद केलेले असते. त्यामुळे ग्राहकांना २००५ पूर्वीच्या आणि त्यानंतरच्या नोटांमध्ये सहज फरक ओळखता येतो.

नागरिकांनी काय करावे?

जर तुमच्याकडे २००५ पूर्वीच्या ‘महात्मा गांधी’ मालिकेतील चलनी नोटा असतील, तर त्या सामान्य बँकांमध्ये स्वीकारल्या जाणार नाहीत. अशा नोटा बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या १९ प्रादेशिक कार्यालयांशी संपर्क साधावा.

महत्त्वाची सूचना: या निर्णयामुळे सोशल मीडियावर विविध अफवा पसरत आहेत. त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत सूचनांची खात्री करूनच पुढील निर्णय घ्यावा.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!