📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

अमरावती रेल्वे उड्डाणपुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच ठेवा; महारेलकडे हस्तांतरण झाल्यास विलंबाची शक्यता – आ. संजय खोडके

On: June 27, 2026 1:52 PM
आम्हाला फॉलो करा:
अमरावती रेल्वे उड्डाणपुल पुनर्बांधणीबाबत विधान परिषदेत मागणी करताना आमदार संजय खोडके | Amravati ROB Reconstruction News

मुंबई :

अमरावती शहरातील अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागालाच कायम ठेवून कामाला गती द्यावी, अशी जोरदार मागणी विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली. महारेल (MRIDC) कडे हे काम हस्तांतरित केल्यास सर्व तांत्रिक मान्यता, आराखडे आणि प्रशासकीय प्रक्रिया नव्याने कराव्या लागतील. त्यामुळे प्रकल्पाला मोठा विलंब होऊन काम रखडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

गेल्या वर्षभरापासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असलेल्या अमरावती रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी मार्च २०२६ च्या राज्य अर्थसंकल्पात १२५.३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता, डिझाईन आणि इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे.

सभागृहात माहिती देताना आमदार संजय खोडके म्हणाले की, अमरावती ते बडनेरा रेल्वेमार्गावर सुमारे १९६३ मध्ये हा रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात आला होता. या पुलामुळे राजकमल चौक, हमालपुरा, रेल्वे स्थानक आणि जयस्तंभ चौक यांसारख्या शहरातील महत्त्वाच्या भागांमध्ये दळणवळण सुलभ झाले होते.

मात्र स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ऑगस्ट २०२५ पासून पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला असून नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नवीन रेल्वे उड्डाणपुलासाठी १२५.३७ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पात निधीस मंजुरी दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष पुनर्बांधणीच्या कामाला सुरुवात केली आहे.

अशा परिस्थितीत हे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MRIDC) अर्थात महारेलकडे वर्ग करण्याचे आदेश काढण्यात आल्याची बाबही आमदार संजय खोडके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

त्यांच्या मते, एजन्सी बदलल्यास नव्याने सर्वेक्षण, डिझाईन, आराखडा, प्रशासकीय मंजुरी आणि विविध तांत्रिक प्रक्रिया पुन्हा कराव्या लागतील. त्यामुळे प्रकल्पाला मोठा विलंब होण्याची तसेच काम रखडण्याची शक्यता निर्माण होईल.

अमरावती शहरातील मुख्य बाजारपेठांना जोडणारा आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रेल्वे उड्डाणपूल नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच काम कायम ठेवून १२५.३७ कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार संजय खोडके यांनी पावसाळी अधिवेशनातून केली.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

मीरा रोडवरील ठाकूर मॉलजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, हिट अँड रन अपघात

मीरा रोडवर भीषण हिट अँड रन; कारने तरुणाला फरफटत नेले, जागीच मृत्यू, आरोपी फरार

मुंबईच्या महापौर ऋतु तावडे विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना पत्रकार परिषदेत बोलताना

मी रील स्टार की रिअल स्टार? मुंबईकरच निर्णय घेतील; महापौर ऋतु तावडे यांचा विरोधकांना जोरदार टोला

रुग्णालयात आजारी चिमुकल्याला भेटताना अरिजित सिंग | Arijit Singh meets sick child in hospital

जीवन-मरणाच्या संघर्षातील चिमुकल्यासाठी अरिजित सिंग धावले; माणुसकीने जिंकली लाखोंची मनं

नाशिकच्या कळवण येथील आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी प्रकरणाबाबत प्रतीकात्मक छायाचित्र

नाशिक हादरलं! आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला दिला जन्म; नात्यातील अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

अमरावती येथे १८-१९ जुलै २०२६ रोजी आयोजित चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अधिकृत पोस्टर

अमरावतीत १८-१९ जुलैला चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन; साहित्य, गझल, कवी संमेलन आणि परिसंवादाची मेजवानी

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावतानाचे प्रतीकात्मक छायाचित्र

विधानसभेत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र, आता राज काय उत्तर देणार?