📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

ग्रामीण मातीचा गंध जपणाऱ्या ‘निपेऱ्या’चे दिमाखदार प्रकाशन; वृक्षप्रेमाचा संदेश देणारी साहित्यकृती ठरतेय चर्चेचा विषय

On: June 23, 2026 6:12 PM
आम्हाला फॉलो करा:
निपेऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळा सिन्नर वारकरी भवन येथे वृक्षमित्र विष्णू वाघ व मान्यवर उपस्थित

गौरव प्रकाशन सिन्नर | प्रतिनिधी |

सिन्नर तालुक्यातील दोडी या छोट्याशा गावातील सुपुत्र तथा वृक्षमित्र लेखक विष्णू वाघ यांच्या ‘निपेऱ्या’ या साहित्यकृतीचे रविवारी (दि. २१ जून २०२६) सिन्नर येथील वारकरी भवनात उत्साहपूर्ण वातावरणात प्रकाशन करण्यात आले. ग्रामीण जीवन, बोलीभाषा, बदलत्या परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देणाऱ्या या पुस्तकाला उपस्थित साहित्यप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले की, “निपेऱ्या या साहित्यकृतीत ग्रामीण मातीचा अस्सल गंध असून, वृक्षप्रेमाची पेरणी करणारा या पुस्तकाचा नायक मराठी साहित्याला वेगळे वळण देणारा आहे.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे अप्पर कामगार आयुक्त रविराज इळवे उपस्थित होते. यावेळी मंचावर पेन पब्लिशिंग हाऊसचे प्रमुख तथा सुप्रसिद्ध साहित्यिक देवा झिंजाड, ज्येष्ठ साहित्यिक विवेक उगलमुगले, समीक्षक प्रशांत वाघ, ज्येष्ठ साहित्यिक संदीप राक्षे, बॉर्डरलेस पॅंथरचे संस्थापक देविदास तांबे, तानाजी वाघ, जनाबाई वाघ, मिराबाई वाघ, संदीप देसले, लेखक विष्णू वाघ आणि वैशाली वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आली. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वटवृक्षाचे पूजन व पाणी अर्पण करून उद्घाटन झाले. विशेष म्हणजे सत्कारासाठी शाल व पुष्पगुच्छाऐवजी झाडांची रोपे भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

प्रकाशक देवा झिंजाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “जे जगले, जे भोगले ते प्रांजळपणे शब्दबद्ध करणारा आणि मायमातीतील जिव्हाळा, गोडवा व ग्रामीण संस्कृतीतील जीवनमूल्ये हृदयस्पर्शी शैलीत मांडणारा विष्णू वाघ हा खऱ्या अर्थाने सच्चा लेखक आहे.”

अध्यक्षीय भाषणात रविराज इळवे यांनी ‘निपेऱ्या’ या पुस्तकाने कामगार साहित्याच्या दालनात मोलाची भर घातल्याचे सांगितले. पर्यावरण रक्षण, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारे हे पुस्तक मराठी वाचकांच्या घराघरात पोहोचले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विवेक उगलमुगले, मसापचे कार्याध्यक्ष रवींद्र कांगणे, किरण भावसार, देविदास तांबे, कवी आत्माराम हारे, कांचन वाघ आणि बाल कीर्तनकार अनुजा उगले यांनी पुस्तकावरील आपले मनोगत व्यक्त केले. लेखक विष्णू वाघ यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास आणि प्रेरणा उपस्थितांसमोर मांडली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कवयित्री जयश्री वाघ यांनी केले, तर सूत्रसंचालन कवयित्री सुनिता सानप सांगळे यांनी केले.

या सोहळ्यास शाहीर स्वप्निल डुंबरे, उडान फाउंडेशनचे भरत शिंदे, गुणवंत कामगार गणेश तांबोळी, भरत मांडे, रवींद्र गिरी, नगरसेवक अनिल सरवार, सुनिता वाळुंज, प्रा. संजय पवार, सत्यजित कळवणकर, सोपान सानप, उद्धव केकाने, अनिल वाघ, कैलास दुधाळे, अमोल चिने, अरुणा सांगळे, लता लहाने, रामदास वाघ, साहित्यिका प्रतिभा खैरनार, माधुरी चकणे, महेश वाघ, अनिल उगले, रामदास सांगळे, विकास गिते, अभिजित गुजराती, डॉ. सचिन गोंदके, डॉ. आनंदा सानप, नामदेव आव्हाड, पी. जी. आव्हाड, श्रीराम आव्हाड, मंगल शेळके, बाळासाहेब नागरे, लक्ष्मण शेळके, डॉ. आंधळे, महेश तांबे, गणेश शेळके, रोशन घुगे आणि सुशीला उगले यांच्यासह मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!