पनवेलमध्ये रंगला भव्य साहित्य महोत्सव | लेखक-कवींच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन व सत्कार सोहळा

बंडूकुमार धवणे
On: June 22, 2026 10:32 AM
आम्हाला फॉलो करा
पनवेल साहित्य महोत्सवात पुस्तक प्रकाशन आणि साहित्यिकांचा सत्कार सोहळा

पनवेल : सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल व सर्जनशील पब्लिकेशन, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांचे कवी संमेलन व प्रकाशन सोहळा कर्नाटक आंध्र संघ हॉल, सेक्टर-२, नवीन पनवेल येथे मोठ्या उत्साहात व साहित्यप्रेमींच्या उत्स्फूर्त उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष प्रा. राजन लाखे होते. तर राज्यस्तरीय निमंत्रित कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त कवी मा. एकनाथ आव्हाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या सोहळ्यात लेखिका रंजना कराळे यांच्या ‘झिली’, कवी अमोल जीजा प्रभाकरराव चरडे यांच्या ‘जश्न डोळ्यात आसवांचे’, कवयित्री दिपाली विवेक घाडगे यांच्या ‘काजळतीट’ तसेच लेखक विलास नरहर पुंडले यांच्या ‘दान निसर्गाचं’ या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक, सुप्रसिद्ध युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे, विचारवंत प्रा. एल. बी. पाटील, संपादक संजय एम. देशमुख, सुप्रसिद्ध गझलकार रविंद्र यशवंतराव यांची विशेष उपस्थिती लाभली.

राज्यभरातून आलेल्या अनेक निमंत्रित कवी-कवयित्रींनी आपल्या कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. सामाजिक, सांस्कृतिक, निसर्ग, प्रेम, मानवी मूल्ये आणि समकालीन विषयांवरील कवितांना रसिकांकडून भरभरून दाद मिळाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनीका काळे व सौ. अश्विनी अतकरे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचे संयोजन कवयित्री माधवी मोतलिंग व कवी रामदास गायधने यांनी केले.

कार्यक्रमाचे निमंत्रक प्रवीण जगन्नाथ बोपुलकर (अध्यक्ष, सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल) तर स्वागतोत्सुक देवेंद्र इंगळकर (प्रकाशक, सर्जनशील पब्लिकेशन, नवी मुंबई) यांनी उपस्थित साहित्यिक, कवी, लेखक व रसिकांचे आभार मानले.

संपूर्ण दिवस साहित्य, कविता आणि पुस्तकांच्या सहवासात रंगलेल्या या कार्यक्रमाने नवोदित व प्रस्थापित साहित्यिकांना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. उपस्थित साहित्यप्रेमींनी अशा उपक्रमांचे कौतुक करून भविष्यातही अशा साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

बंडूकुमार धवणे

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

व्हाट्सएप से जुड़ें

अभी जुड़ें

टेलीग्राम से जुड़ें

अभी जुड़ें

इंस्टाग्राम से जुड़ें

अभी जुड़ें

हे वाचा

NEET परीक्षा केंद्राबाहेर मुलीला प्रवेश मिळावा म्हणून सुरक्षा रक्षकांच्या पाया पडून विनवणी करणारी आई – Viral Video

NEET गेट बंद, आईची हंबरडा फोडणारी धडपड! मुलीच्या भवितव्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या पाया पडली; व्हिडिओने देशाला हेलावले.!

कै. लक्ष्मीबाई नामदेव पवार यांच्या निधनानंतर गटेवाडी परिसरात शोककळा

पवार कुटुंबाच्या आधारवड कै. लक्ष्मीबाई नामदेव पवार यांचे निधन; गटेवाडीत शोककळा

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने श्रीलंका अ विरुद्ध अवघ्या 11 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत लिस्ट ए क्रिकेटमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केला

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा क्रिकेट विश्वाला धक्का ! अवघ्या 11 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकत रचला जागतिक विक्रम

• Agriculture News Maharashtra • Akola weather • Amravati Weather • Buldhana Weather • El Nino Effect India • farmer advisory Maharashtra • IMD Weather Alert • Maharashtra Monsoon 2026 • Maharashtra Weather Update • Monsoon Delay Maharashtra • Monsoon News Marathi • Rain Forecast June 2026 • Vidarbha Heatwave • Vidarbha Rain Forecast • Yavatmal Rain Update

मान्सूनचा ब्रेक वाढला! विदर्भात ४२°C उष्णतेचा तडाखा; शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला.!

बौद्ध संस्कारांवर मोठा निर्णय सहावी धम्मसंगीती सोलापूर 2026

सोलापूर धम्मसंगीतीत मोठा निर्णय | बौद्ध संस्कारांमध्ये एकसूत्रतेची मागणी

सह्याद्री पर्वतरांगांतील राजमाची किल्ल्याचे निसर्गरम्य दृश्य

ऐतिहासिक राजमाची किल्ल्यावर एकजूट टीमचा रोमांचक ट्रेक; इतिहास, निसर्ग आणि साहसाचा अविस्मरणीय संगम